छटा (गझल)
छटा (गझल)
अश्रू तुझे मला तर तक्रार देत गेले
डोळ्यात साचले पण इन्कार देत गेले
नेत्रातल्या खुणा गुतल्या मैफिलीत होत्या ...
शब्दास घोट ते कडवे फार देत गेले
माझ्या विरुद्ध जे नित माझेच शब्द गेले
राखून ठेवले तर आधार देत गेले!
दुःखास जायचे सवडीने विचारले मी ...
खोटेच त्यातले व्रण हॊकार देत गेले!
आरोह गायल्या वर अंधारले दुपारी
अवरोह आपले स्वर गंधार देत गेले!
गंधास मोगरा...परका वाटला पहाटे ...
गजऱ्यास कोरडे जग आकार देत गेले