चिंब भिजलेले
चिंब भिजलेले
आषाढ घन हे
दाटूनिया आले
थेंब अलवार
आज बरसले
चिंब भिजलेले
मन माझे ओले
जाण अंतरीची
नभांगणी डोले
प्रीत सुमनांनी
भाव गंधाळले
शीत चांदव्यात
सौंदर्य खुलले
शब्द ओसरले
काव्यात सजले
अव्यक्त प्रेम हे
आनंदात न्हाले
निजलेले स्वप्न
वर डोकावले
सुप्त इच्छांचेही
तारे चकाकले
भाव भावनांचे
मोती गवसले
सुखी जीवनाचे
गणित जुळले