गुरुचे महत्व
गुरुचे महत्व
1 min
332
गुरु आहे ज्ञनाचे भंडार
शिष्यांचा जे करतत उध्धार
गुरु शिवाय नाही तरनोपाय
गुरु आहेत जीवनाचा आधार
गुरु आहेत ज्ञानाचा प्रकाश
तेवत असणारा नंदादीप
सुगम करतो वाट जीवनाची
उंचच उंच असा आकाशदीप
गुरु आहे स्वछ वाहणारी नदी
डोईवरचे छत जसे निरभ्र आकाश
पहाडाची निड़र मजबूत छाती
किरणांमधून वाहे जणू प्रकाश
गुरु आहे तेजपुंजाचा गुच्छ
त्यांच्यामुळे गाठातो आपण धेय्य
सन्मानाची ही पायवाट
नाही दुसरा पर्याय
गुरु आहे पारस मणी
धोंड्याचे सोने करतो
शब्द पडताच कानी ज्यांचे
अज्ञानाचा समूळ नाश होतो