आठवण
आठवण
तुझ्या आठवणीच्या पुराने
पुरती वाहुन गेले मी
तुझ्या आठवणींच्या प्रवाहात
दुरवर निघून आले मी
तुझ्या आठवणीच्या पावसत
चिंब भिजुन न्हाहुन गेले मी
ओजंळीत होती फुले तरी
सुगंधित ना झाले मी
आठवणीच्या गावात
एकटीच हुंदडत होते मी
ओघळल्या अश्रुंना
लपुन वाट दाखवित होते मी
भेटत होतास जिथे तू
खिळून नजर तिथेच विसावते मी
पाठमोर्या तुझ्या आकृतिला
स्वप्नात हिणविते उगाच मी
राहुन गेल्यात आठवणी
वळणावर त्या वळुन पाहिले मी
आलास ना तू कधीही
वाट पाहुन थकले रे मी