Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

KAVERI KHEDKAR

Abstract

4.0  

KAVERI KHEDKAR

Abstract

जिजाऊ

जिजाऊ

1 min
309

जन्मला शिवबा | ज्या मायेच्या पोटी | त्यागाची कसोटी दिली जिने । संस्कारांनी जिच्या निर्मिले स्वराज्य | जणू तुळजाईची तलवार ती ॥

आया बहिणींची अब्रु राहिली जिच्यापायी । सती न जाता राखला पत्नीधर्म । घडवला शिवबा शीलवान जिने । वाहिला जिने पुत्र स्वराज्याला ।

मारिला अफजल लोळविला औरंग्या । शूर छाव्यानी त्या मातेच्या ।

मूघल निजाम नमविले जिने ।

निधड्या छातीची वाघीण ती ।

सर्व लेकरांसी पालून मायने हाकला गनिमी कारभार । तलवार-भाला नव्हे । संस्कार जिचे ठायी। न लढता जिंकली लढवैय्या ती ।

पैश्याचा नाही माज जातीचा नाही भेद । 'धर्म तिचा एक | स्वराज्य तो । नमस्कार माझा या शिवबाच्या मायेला । जगाची माऊली झाली जी ।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract