कितीदा तुला नव्याने आठवावे
कितीदा तुला नव्याने आठवावे
कितीदा तुला नव्याने आठवावे
आठवणीत तुझ्या स्वतःला झुरवावे
तुझ्यासवे घालवलेल्या गोड क्षणांना स्मरावे
की तुझ्या आठवणीत मी रडावे
उमजेना मला आता की
एकांतात घालवलेल्या त्या क्षणासाठी कुढावे
की तू नसलेल्या जाणिवेत गढावे
सांग ना कितीदा तुला नव्याने आठवावे