कर्तृत्ववान नारी
कर्तृत्ववान नारी
कधी नाही घेतले पाटी-पुस्तक
कधी नाही घेतले हाती कलम
तिच्या कर्तृत्वापुढे झुकतो आलम
दोन दशके करून बहू परिश्रम
मनगटात एकवटून सारे बळ
आयुष्याचा पालटला खेळ
स्वहिंमतीने बदलली वेळ
मनातील आकांक्षेचे मिळाले फळ
अकोले-कोळंभणे गावातील
एक गरीब आदिवासी माता
कर्तृत्ववान महिलांच्या यादीत
तिने स्थान मिळवले आता
निसर्गाकडून मिळाले होते शहाणपण
हाताशी होती फक्त कोरडवाहू जमीन
पिकेल की नाही देता येत नसे हमी
ज्ञान-संस्काराची जराही नव्हती कमी
जतन करून देशी बियाणांचे वाण
झाला पद्मश्री पुरस्काराने सन्मान
बीजमाता राहीबाई पोपेरे यांना
आता देश-विदेशात असे मान
ना पैशाची हाव, ना प्रसिद्धीची
कर्तव्यापुढे रास पडली पुरस्कारांची
फाटकाच संसार आपला सावरत आहे
बियाण्यांची बॅंक साऱ्यांना आवडत आहे
सलाम तिच्या कर्तृत्वाला-सादगीला
सलाम तिच्या संग्रही-संशोधन वृत्तीला
आरोग्य रक्षणासाठी-सुदृढतेसाठी
जगाला एक नवा मंत्र दाविला