महागाईचा भडका
महागाईचा भडका
महागाईचा भडका
जनसामान्यांना तडका
खिशात नाही पैसा अडका
कसे जीवन जगावे प्रश्न कडका ।।१।।
पेट्रोल ने घेतली गगन भरारी
डिझेल म्हणते मी बहू करारी
साखर तेल म्हणतं आम्ही लयच भारी
महागाईच्या चरख्यात ऊसापरी
पाचट झालीय जनता सारी ।।२।।
बेजरोजगार हिंडे दारोदारी
संतापात भांडणे घरोघरी
शिक्षण घेऊन सुद्धा नैराश्यच पदरी
महागाईने काढला लयबद्ध सूर
भरडली जात आहे त्यात जनता बेकसूर ||3||
शेतकरी कष्टकरी झालाय चकणाचुर
महागाई होईल कधी आपल्यापासून दूर
करितो पार्थना भगवंताला नष्ट होण्या महागाई
जीव झाला लाही लाही नष्ट होवो महागाईची खाई ||4||