Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

3  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

मी जिजाऊ, 'स्वराज्यमाता'

मी जिजाऊ, 'स्वराज्यमाता'

2 mins
312



माझ्या मायभूमीच्या लेकरांनो,

स्वातंत्र्याचा आस्वाद घेणार्‍या माझ्या प्रिय पाखरांनो,


मी जिजाऊ बोलत आहे...


सिंदखेडी जाधवांच्या राजघराण्यात उमललेली मी ब्रह्मकळी,

माता-पित्याने पुत्रापरी जपणूक माझी केलेली,

स्वराज्यसंकल्पनेच्या मशालीने "जिजाऊ" नावाची पणती प्रज्वलित झालेली,

माझी मायभूमी,

सुलतानशाही, मुघल सत्ता व इंग्रजी छावणीने कालवलेल्या विषामुळे तडफडू लागली,

गुलामगिरी, चाकरीची विषबाधा समस्त राष्ट्राच्या सर्वांगात फोफावत चालली...


कळत नव्हते मला तितकेसे, पण वळत मात्र नक्की होते,

नायनाट करण्या शत्रूपक्षाचे मनात माझ्या एक वादळ थैमान घालत होते...

प्रशिक्षण घेतले अश्वारोहण, युद्धशास्त्राचे,

झाले सज्ज कणा मोडण्या ह्या विष कालवणार्‍या शासकांचे,

माझ्याचं मायभूमीवर, मला गुलागिरीत धाडणार्‍या ह्या पाषाणहृदयी बादशाही प्रवृत्तींचे...


कोण तो निजाम, 

आदिलशाह, 

कोण ते फिरंगी?

माझी जन्मभूमी, 

मराठ्यांच्या रक्ताने पेटलेली होती एक ठिणगी...


भिनलेल्या विषाला तरणोपाय होती, ती अमृतावानी स्वराज्यक्रांती !

ह्या क्रांतीची पेटवली होती मी दारोदारी पणती...

वैर्‍यांचा करण्या जुलमी ईलाज मी शिकले होते राजनीती...


शौर्यधैर्य, आत्मविश्वास जागवलेला मी माझ्या ठायी,

लढवली खिंड, 

कित्येक किल्ले ही चढले पायी...


धाडले आमंत्रण दौलताबादी, 

माझी होती लगीनसराई,

जाधवांची पुत्री मी, 

झाले प्रतिष्ठित भोसलेंची सूनबाई,

शहाजी राजे भोसलेंची मी अर्धांगिनी,

धन्य झाली भोसलेंची ही धनी...


पचत नव्हते मला चाकरीचे हे कडवे कारले,

रयतेच्या कल्याणासाठी मी स्वराज्याची ढाल झाले...


पराक्रमी सेनानी, माझे शहाजी राजे,

त्यांच्या एका डरकाळीने लाल महाल गर्जे...

स्वाभिमानाने उभा होता आमुचा राजवाडा,

प्रजेच्या हितार्थ करावयाचा होता न्याय निवाडा...


माझ्या उदरी स्वराज्याचे भावी रक्षक श्वास घेत होते,

सत्वगुणांचे बाळकडू त्यांना उदरातचं मी पाजत होते...

आई भवानीमातेच्या कृपेने पराक्रमाचे नवे पर्व आरंभिले,

माझ्या पोटी गौरवशाली संभाजी व शिवाजी जन्मले...

माझ्या पोटच्या लेकींचे आयुष्यमान कमी होते,

नाहीतर त्यांच्या प्रकाशाने सुलतानशाहीचा अंधःकार हा कधीच मिटला असता...


शिवाजीच्या मर्दमावळ्या सवंगड्याना मी वात्सल्याने जपले,

विखुरलेल्या देशबांधवांना मी एकसूत्रात गुंफले...


विजापूर युद्धभूमीवर माझा संभाजी पडला धारातीर्थी,

पवित्र झाली त्याने ही महाराष्ट्राची माती...


एक दिवा विझला, 

एक दिवा खंबीरपणे जगला, 

माझ्या शिवाजीच्या स्वरूपात...


स्वराज्य प्राप्तीसाठी केली मी प्रयत्नांची पराकाष्ठा,

शिवाजीअंगी बाणवली मी मायमराठी निष्ठा...


हिंदवी स्वराज्याचा संस्थापक माझा शूरवीर शिवाजी,

सारी शक्ती लावून पणाला, मी घडवला हा फौजी...


माझा छावा खेळू लागला गनिमी कावा,

धर्मकर्म सर्वस्वी मानून न्यायमार्गे केला पाठपुरावा...


केली सुटका शिवबाने शहाजी राजेंची, 

वाघनखांनी सूड घेतला अफझलखानाचा,

हा सूर्य आगीसारखा तळपला, 

हिंदवी स्वराज्याला हा मुजरा मानाचा...

छत्रपतीने माझ्या दिला शह शत्रूपक्षाला,

आज पुन्हा नव्याने भवानीआईचा भक्त हा जागला...


शिवबाने उधळले सुलतानांचे मनसुबे,

आता मरण माझे हे मज समोर उभे...

शेवटचा हा श्वास माझा स्वराज्यासाठी अर्पिला,

धन्य मी झाले, 

शिवाजीसारख्या वीरपुत्राला माझ्या पोटी जन्म दिला.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational