मनु
मनु
परिस स्पर्श व्हावा जणू
अन् आयुष्याचं सोनं व्हावं
लाभली तुझ्या मैत्रीची देण ऐसी
माझ्यातील सुप्त-मी ला जागवावं
हातात हात घेऊनी
पदोपदी पावलांचा ठाव घेेणं
निसटता हात तुझा
मज स्वबळाची जाणीव देणं
झुंज ही हसती-खेळती
तत्वास ठाम उभं राहणं
निर्भय वाटसरू तू
तुजसंगे मज निर्धास्त वाटणं
जडलीय सवय मला तुझी
न कळे तोडायचं कसं आठवणं
सांग सखे फेडू कसं
तरुण क्षणांच्या भागीदारीचं लेणं