नारी
नारी
पाणिनी 'स्तै' शब्दे गर्भिली
स्त्री नामे प्रस्थापित जाहली
मातृसत्ताक प्राचीन प्रजा
कालांतरे परिवर्तन समाजा
आर्यकाले स्थिती ती सुदृढ
ऋग्वेद काली ब्रह्मज्ञानी दृढ
वैदिक काले अधिकार समान
उच्चशिक्षण,यज्ञकर्म संपादन
एकविश गुणी विदुषी जाहल्या
अदिती, अरुंधती वा अपाला
मध्यकाले किमया कालांतरे
स्थिती पालटली जनविचारे
उत्सववारे चारदिशी आज
घुमतो कार्ये तुझ्या पखवाज
पाय धरेवर, चित्त आकाशी
करकचून बेडी पदकमलांशी
समसमान भाव जन वर्तती
तरी पराधीन तू या जगती...