Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nalanda Wankhede

Inspirational

4  

Nalanda Wankhede

Inspirational

प्रजासत्ताक

प्रजासत्ताक

1 min
331


प्रजासत्ताक दिवस आला

देशभक्तीचे वारे वाहु लागले

दोन दिवस उदोउदो

तारे दिवसा दिसु लागले ।।


प्रजासत्ताक सव्विस जानेवारीला

सविंधान आले अस्तित्वात

मिळाला अधिकार लोकशाहीचा

आपले सरकार निवडून देण्याचा ।।


मतदान करण्याचा हक्क

प्रजासत्ताकाने निर्धारित केला

पारतंत्रातुन स्वातंत्राच्या उद्रेक झाला ।।


लोकशाही प्रजसत्ताकाने दिली

हुकुमशाही नष्ट केली

स्वातंत्राचि पहाट झाली

मानवी मुल्यांची स्थापना झाली ।।


बंदिस्त पहाट लुप्त झाली

भारतमातेची बेड़ी सुटली

सविंधानाने हिंदूस्थानाला मुक्त केले

भारत देशाला उदयित केले ।।


प्रजासत्ताक सोनेरी किरणे घेवुनि आली

खऱ्या स्वातंत्राचि नजरेला नजर भिडली

आता मात्र वेगळेच दृश्य नजरेस पड़ते

प्रजसत्ताकाचे प्रेम दोनच दिवस उमळते ।।


जातिभेदाच्या दंगली

विषमतेचे कीड़े पसरवितात

झेंडाच्या दंगली

विविध रंगात रंगतात ।।


प्रजसताकाने भारताला तिरंगा दिला

तिरंग्याच्या अर्थ देशाला माझ्या 

कळलाच नाही

धर्मभेद, जातिभेद विसरलेला माणुस

देशात मला कधी दिसलाच नाहीं ।।


लाल रक्त सांडते रस्त्यावर

माणुस माणुसकीला विसरला

गावगुंडांच्या जोरावर

सेवक लोकशाहीचा माजला ।।


आयाबहिनींवर अत्याचार बलात्कार

रोजचेच रडने झाले

गोरगरीबांचे जगने मुश्किल झाले ।।


शिक्षणाचा झाला बट्याबोळ

आरक्षण संपुष्टात आले

बेरोजगारी ने जनता त्रस्त झाली

बळी राजाला गळ फांस लागले ।।


प्रजासत्ताकाणेच आहे मानसन्मान

प्रजासत्ताक देशाचा अभिमान

राहिले प्रजासत्ताक जीवंत तरच

मानवांचे होणार कल्याण ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational