सैनिक
सैनिक
स्वप्न भंगले जरी माझ्या सुखी संसाराचे
खंत उरली ना कशाची आता मजला
युद्ध जुंपलेय रणांगणी शत्रूशी आमुचे
सारी सुखस्वप्ने कुर्बान भारतमातेला
काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री मज दिसे
युध्दभूमिवर अग्निकल्होळ आज
बॉम्ब-तोफगोळ्यांचा भडीमार बरसे
' धडाम-धुडूम ' कर्णकर्कश आवाज
हजारोंचे शत्रूसैन्य ठाकलेय समोरुनि
घोंघावतायत फाईटर विमाने माथी
शत्रुभूमित घुसलो निखराने लढूनि
पिटाळत शत्रुला मागे, गनिमी साथी
संख्येने कमी तरीही झु़ंजलो प्राणपणाने
केले शत्रुस चारी मुंड्या चीत एकसाथ
विजयासमीप शत्रूच्या बॉम्ब वर्षावाने
रणगाडे उध्वस्त, विखुरले देह इतस्थ !
वाटले भंगले स्वप्न विजयाचे आपुले
क्षणात उध्वस्त झाली शत्रुची विमाने
हाती तिरंगा घेऊनि सैन्य दिसु लागले
गुंजतेय रण 'भारतमाता की जय' घोषाने
शरणांगती निशाण फडकवलेय शत्रूने
फडकतोय तिरंगा शत्रुभूवरी डौलाने
हे विधात्या, दे मज पुनर्जन्म अनेकदा
सेवा करण्या भारतमातेची सदासर्वदा !