शब्दश्वरी..
शब्दश्वरी..
अशांत जगण्यात फक्त,
शब्द माझा सोबती.
मी छंद जपतो शब्दा तुझा
कोणी मोठा वारसा नाही मला..
जगण्याचा एक भाग नाहीस तू
तुटलेल्या शब्दांचे नवे नाते जोडणारा दुवा आहेस तू..
जगवे तुझ्या दुनियेत..
कधी कोणच्या मुखात
तर कधी रदीच्या दुखनात
मुखातून आलो तरी वजनात
चिल्लर भावात विकलो तरी वजनात
शब्दा तू माझा सच्या सोबती.
तूला माझा हृदयातून उजळत,
निखऱ्यात चालवतोय.
बस तू जळत रहावं
आणि मी रचत.
कोणी डाव लावतो तुझावर
तूला कोणी समुद्रच्या तळात शोधतो
तर कोणी ढगांच्या पड्याल आभाळात.
मी पहातो तूला माझ्या आईच्या चेऱ्यात...
आणि भाबड्या बाबा च्या कष्टात.
चालूया भेडू
कधी मागे कधी पुढे,
प्राण आहेत तो पर्यंत जिवंत,
अशील तू माझ्या श्वासांत..