Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prathamesh Bobhate

Drama Fantasy

3.8  

Prathamesh Bobhate

Drama Fantasy

संध्या - संभाषण

संध्या - संभाषण

1 min
167


एक संध्या आपुलीशी, तिला संवाद करू म्हटलं;

पटकन बोल म्हणे, काय असं मनी तुझ्या आज दाटलं...???


पानं सारी आजवरची, मग उलटून पाहू वाटलं;

आलो येथवर तसा साठवत; पण मागंही बरंच सुटलं...!!!


लांबलचक यादी ती, ज्यात सर्वांत 'उपर' मीच;

तक्रारच गं, काय म्हणू? आता गत अमुची हीच...!!!


सहज यातलं काहीही, तसं मिळण्याजोगं नाहीच;

पुन्हा संघर्ष, पुन्हा तडजोड तशी वाट अडवू पाहीच...!!!


समाधानी म्हणशील आम्हां की समजशील अल्पसंतोषी ???

अनामिक मेहनती असा की केवळ एक नशीबवान आळशी ???


सरलेल्याची अन् उरलेल्याची, किंमत असे फार;

फरक त्याचा का पडावा; आजही तितुकाच वाहतोय भार... ???


सरू नकोस संध्ये, अगं प्रश्नांत केवळ माझ्या,

शोधू देत की उत्तरेही, तुझ्या प्रतिसादात अगं या...!!!


संवाद आहे नं..., हितगुज माझे-तुझे;

सरतेस काय कपटे; नाव तुझेही यादीत जुने...!!!


हिशोब नको, किंमत नको, मात्र कारण तेवढे दे पटण्याजोगे;

निरुत्तरशी तेव्हाही, क्षणही आज जे पुन्हा स्तब्ध उभे...!!!


फितूर तू ही, फितूर तू ही, काय 'नाही' बोलशील???

"वेळ सरली, काळ सरला"; वेगळे याहुनी ते तू काय सांगशील???


गाणी फसवी नको गं, माफी तुझी नको गं;

इथून पुढे संवादच, मुळी 'एकपक्षी' नको गं...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama