Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prathamesh Bobhate

Drama Romance Tragedy

3  

Prathamesh Bobhate

Drama Romance Tragedy

व्यथा

व्यथा

1 min
218


वाटले होते, तितके काही अगं असे अडत नाही,

नाही जमले; पण म्हणून काय मैत्री तोकडी पडत नाही


रोजच्या रोज आधीसारखं बोलणं असं जमत नाही,

अंतर आहे, अंतर नाही, भेटून बोलू की बोलून भेटू तेच आता उमजत नाही


साद तुझी आजही आनंद तितकाच देते;

यायची जी न चुकता; चुकुनचं हल्ली कधी आवाज देते


निर्मळ, निखळसे स्मित तुझे; आजही त्यापुढे जाववत नाही,

क्वचित का होईना, आभासी तर आभासी पण पाहिल्याविना काही करमत नाही


तक्रार अजिबात नाही हं..., गोंधळून पुन्हा तशी जाऊ नकोस;

तोच अनामिक, तोच उर्मट म्हणुनी मजला असा पाहू नकोस


दिवसागणिक प्रत्येक या, अनुभवले खरंच 'नाही' त त्या एका; अगं बरकत किती?

कळून चुकलेय 'हो' पेक्षा त्या 'नाही' तच अवघडशी हरकत किती?


कठीण सौदा नात्याचा त्या, कायमचीच रेष मर्यादेची मध्ये;

पुसून टाकून पुन्हा नव्याने बहरेल सारे, स्वप्नवतच नव्हे ?


असो..., हरकत काय - बरकत काय; चालूच राहिल खेळ;

भावना, आठवणी मोकळं यांना करू शकण्या, हक्काची ही आजचीचं वेळ !


पुन्हा नवे वर्ष, आणि पुन्हा तसचं सारं...;

सवयीचंच जे झालंय आता, पुरे की रडगाणं !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama