स्तब्ध झंकार
स्तब्ध झंकार
1 min
397
हाक माझी आज मलाच आली
येऊनी परत ओठातच शांत झाली
श्वास विरला क्षणात स्तब्ध झंकार हाक झाली
ना शब्दांनाही पाझर फुटला ,
ना मला तो थांब म्हटला ,
ना मी ही वळूनी पाहिले
ना शब्द ओठी फुटले
फिरत्या पाठी जरी मी चालले
हृदयात काहूर वादळं माजले
ना मोजत्या वेदनेच्या भावना
तुझ्या चेहऱ्यावर का मला दिसल्या
स्वप्नांचा गाव तू निखळ माझा
माझाच गाव रडला मिठीत माझ्या
परी ना आसवे ना शब्द इतका
दुष्काळ कोरडा काहूर आकांत
मनात माझ्या क्षणक्षणाला जगला
©