सुर निनादता तुझे
सुर निनादता तुझे
1 min
466
मन मोरपीस छोई
सूर निनादता तुझे
शब्द शब्द अर्थ घेई
स्पर्श ओठी होता तुझे
तुझ्या गळ्यात गंधार
लाभे शब्दांना आकार
मूर्त काव्यातून होई
नाद ब्रह्म्याचा साक्षात्कार
संत ज्ञानेशाच्पा ओव्या
तुझे ओठ त्यांना छेडे
जशी वीणा झंकारते
तुझ्या गळ्यातून गडे
माय मराठीला लाभे
लता रूपी अतंकार
मराठीच्या डोक्यावर
भारतरत्न पुरस्कार