Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jagruti Sarang

Inspirational

2.5  

Jagruti Sarang

Inspirational

ती ऑलराऊंडर

ती ऑलराऊंडर

2 mins
758


थकली असशील कधीतरी

आज आत्ता या क्षणी

एका जागी बसशील का?

सांगते तुला काहीतरी

जरा ऐकून माझं घेशील का?


ऐकणार असशील तर सांगेन तुला

कहाणी कलियुगातल्या सबलेची,

एकच आयुष्यात तिने

कैक जन्म जगल्याची...


अबला म्हण कि सबला म्हण

कदाचित ते असेल तुझंच दर्पण...

तुझ्याचसाठी केलंय मी

माझ्या या शब्दांना अर्पण....


लेक असो वा बहीण असो

गृहिणी असो वा माता,

दामिनी असो वा सौदामिनी

किती सांगावी तिची गाथा....


सागर कन्या, हवाईसुंदरी,

धावण्यात सुद्धा तीच पुढे...

धावता धावता बघ कशी ती

आकाश भेदण्या नासात जाते....


टेबल टेनिस, बॉक्सिंग अन्

बॅटसुद्धा ती हाती घेते,

घरट्यात आपल्या परतल्यावर

तव्याचे ही चटके खाते....


इतकेच कशाला? अगं इतकेच कशाला?....

हल्ली ती सुद्धा सीमेवर

लढता लढता शहीद होते,

अवतीभवती फिरून बघ

प्रत्येक क्षेत्रात ती दिसून येते....


जबाबदाऱ्यांचे ओझे हल्ली

ती सुद्धा वाटून घेते,

रिक्षा चालक, बसवाहक,

राजकारण, समाजकारण,

साऱ्याच क्षेत्रात ती स्वतःला

बिनधास्तपणे झोकून देते....


पोटच्या गोळ्याला शिकवण्यासाठी

मजबूरी मध्ये देह सुद्धा विकून देते,

मनातून जरी पूर्ण खचली तरी

जिद्द मात्र टिकवून ठेवते....


कॉर्पोरेट जगतातही ती

मर मर मरते,

सोबत कुणी नसलं तरी

एकट्यानेच सारं उभं करते....


ट्युशन घेते, पार्लर चालवते,

घर बसल्या उद्योग करते,

धुणीभांडी, खाणावळीच्या जोरावर

महिन्याचं ती राशन भरते....


नोकरी सुटली, नाती तुटली म्हणून

दारूच्या आहारी ती जात नसते,

रणचंडीची एक ललकार देऊन

पुन्हा नव्यानं भरारी घेत असते....


मोबाईल असो, लॅपटॉप असो,

पळा, कढई सुद्धा हाती असते,

सुई दोरा हाती घेऊन ती

संसार आपल्या शिवत असते....


जीन्स-टॉप घालणारी ती

नऊवारीतही नजरेत भरते,

सणासुदीची हौसमौज ती

लोकलमध्येच साजरी करते....


आसवांना तिच्या आता ती

स्वतःच्याच ओंजळीत पाहून घेते,

बाबाच्या पार्थिवाला स्मशानात

तीच खांदा देत वाहून नेते....


फिगर असो वा नसो

तिनं भरारी घेतलीय बघ,

तिच्यासारखीच तू सुद्धा

मुक्त मुक्त होऊन जग....


तुझं तूच ठरव आता

तुला कसं जगायचंय,

तुझं तूच ठरव आता

तुला कसं जगायचंय...

या जगाकडे आता तुला

सांग कसं बघायचंय....




Rate this content
Log in

More marathi poem from Jagruti Sarang

Similar marathi poem from Inspirational