विठ्ठला मायबापा
विठ्ठला मायबापा
"मायबापा" हाथ कटेवर,पाय विटेवर,
किती सुंदर वाटे तुझे सावळे ध्यान रे |
धावरे पावरे पांडुरंगा बा विठ्ठला,
लागली तुझ्या पंढरीची मज आस रे ||
मनी अंधारला प्रकाश हा सारा,
दिव्यत्वाची तुझी आम्हां ज्योत दे |
तुझ्या वारीची लागे भक्ता ओढ ही,
देहास स्फूर्ती देऊनी राहो मुखी नाम रे ||