vinod mohabe

Tragedy

3  

vinod mohabe

Tragedy

आणि मला अश्रू अनावर झाले

आणि मला अश्रू अनावर झाले

2 mins
170


“ अजीब दास्तान है इस जिन्दगी की

  ना जाने कितने मौको पर तकदीर बेवजह रूलाती है

  जिसकी कभी कल्पना भी ना की हो जीवन में

ऐसे ऐसे अनोखे मंजर भी दिखाती है ! ”

 

            एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुहूर्त साधून आई-वडिलांनी शिर्डीला भेट देण्याचे ठरवले होते. तेव्हा मी जेमतेम १४-१५ वर्षाचा मुलं असेन. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व शिर्डीला पोहचलो.

     शिर्डीला पोहचल्यानंतर बघितलं कि, मंदिरांच्या पायऱ्यांवर खूप सारे भिकारी बसलेले होते. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू तराळत होतं. काहींना हत्ती रोगाचा त्रास होतं तर काहींना क्षय रोग, तर काहींना कुष्ठरोग, तर काही अपंग, काही मानसिक कमकुवत, तर काही अतिशय म्हातारे होते. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक रेष दिसत होती. त्यांच्या बाजूला एक ७-८ वर्षाचा एक मुल होतं. गरिबीच्या विळख्यात गुंफाळलेल्या ह्या भिकार्यांची काय दैनिय अवस्था होती. त्या मुलाचे डोळे पाणावलेले,चेहऱ्यावर भाकरीची आस लागली असावी. भुकेने व्याकूळ असलेलं तो मुल. जणू असे भासले कि त्या लहान मुलाच्या पोटांत भूकेचीच आग पेटलेली असावी. तो तडफडत होता काही तरी खायला.

 

 पोटात भूक भाकरीची 

 ओठावर पाण्याची तहान 

 तरी लोक म्हणतात

 “मेरा भारत देश महान” .....!

       रस्त्याच्या कडेला बसून काही लोकं भाकरी, अन्न खात होते. तो चिमुकला त्या भाकारीकडे एकटक बघत होता. काही लोकांनी बाजूला उरलेलं भाकरी व अन्न फेकून दिलं. हे बघताच तो चिमुकला धावून ते अन्न खाऊ लागला.

“ हि भूक कशी रे ?

 लाडक्या शाही हि भूक कशी रे ?“

    लगेच बाजूला असलेले कुत्रे जोर जोरात भुकु लागले व त्या भाकरीवर झेप घेतली. चिमुकल्या मुलाच्या हातातील ती भाकरी ओढू लागली. काही कुत्रे त्या चिमुकल्या मुला चावा घेऊ लागले. जणू तो मुलच त्यांचा खाद्य आहे. त्या मुलाचे लोचके काढू लागले. काही कुत्रांनी सामोरून तर काहींनी मागच्या बाजूने हल्ला केला. चिमुकला रक्त बंबाळ झाला. हे बघताच माझे वडील त्या मुलाकडे धावू लागले व त्यांच्या पाठीमागे काही लोक सुद्धा धावू लागले. त्या कुत्रांना कसं तरी तेथून पळवून लावण्यात आले. तो चिमुकला अंतिम श्वास घेत होता. सगळे लोकं गोळा होऊन बघत होते. माझे वडील त्या चिमुकल्याला पाणी पाजत होते. मी सुद्धा त्याच्या जवळ गेलो, बघतो तर काय तो लहानसा मुल स्वर्गवासी झालेला. हे बघतच माझ्या डोळ्यातून आणि माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातून अनावर अश्रू ओसळू लागले.

            आज हि ती घटना आठवलं कि डोळ्यातून अनावर अश्रू ओसळू लागतात.

 

“ क्या करिष्मा है कुदरत का

 कौन किसके करीब होता है 

 दुनिया मी वही होता है 

 जो जिसके नशीब में होता है !” 

     

        आजही ह्या कवितेतील ओळी माझ्या ओठांवर रेंगाळत असतात आणि अनावर अश्रू ओसळू लागतात.

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy