Dev music

Inspirational

3.3  

Dev music

Inspirational

आत्मभान

आत्मभान

2 mins
179


चार भावांडा मधलीच ती एक. पण रंगाने तिघापेक्षा जरा , जरा नाही जास्तच डावी थोडक्यात काळी होती.. काळी याकरिता , की कधी या भावंडांमध्ये भांडण झाले की सगळे तिला काळी काळी म्हणून चिडवायचे. तिलाही कधी याचा राग नाही यायचा कारण भावंडच ती... तीही कमी न्हवती त्या सर्वांना चिडवण्यात.

"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होतें तयात एक, पिल्लू वेडे कुरूप एक"

तिला परीक्षेत नेहमीच सर्वापेक्षा चांगले मार्क मिळायचे, त्यात शेंडेफळ त्यामुळे तेवढीच लाडकीही होती.

लग्न झाल्यावर मात्र सगळेच बदलले. घरातल्या परिस्थितीच्या जाणिवेनं ती आणखीनच धाडसी झाली. ती नेहमी स्वत:च्या विचारवर ठाम असायची. तिची मत पक्की असायची. पण तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी वाटायचा.कारणही तशीच होती. ती जे काम हातात घेई ते ती यशस्वी पणे पार पाडायची. पण त्यामध्ये सलगता न्हवती.. त्यामुळे एक ना अनेक असे तिने बरेच व्यवसाय केले , त्यात यशही मिळत गेले..पण त्यात सातत्य कायम राहत नसल्याने ती मनातल्या मनात खचून जात होती. त्यामुळे सहज जरी कोणी काही बोललं तरी तिला फार वाईट वाटायचे. ति स्वतः ला जरी कमी समजत असली तरी तिच्या प्रत्येक गोष्टीचे सगळे भरभरून कौतुक करायचे..घरातल्या पेक्षा बाहेरचे च जास्त कौतुक करायचे. सतत मनाला उभारी देत,

 तीं पून्हा नव्या जोमाने कामाला लागायची.. 

तिचे लेखन ही उत्तम होते. पण कधी तिने फारसे मनावर घेतले नाही.. नोकरी नसल्यामुळे आता तिच्याकडे वेळच वेळ होता आणि अचानक तिच्या समोर एक नामी संधी चालून आली.. काय करावं या द्वंद्वात असताना तिने लिहायला सुरुवात केली. आणि तिला भरभरून प्रतिसाद ही मिळाला. तिला आता मनाला चांगलीच उभारी मिळाली होती..

आता तिने मनाशी पक्के केले होते की काहीही झाले तरी लिखाण सोडायचे तर नाहीच..पण मागे ही वळून पाहायचे नाही.

"पिल्लास त्या कळाले ,तो राजहंस एक" आता ति या काळया रंगा मध्येही जास्त सुंदर भासत होती ती तिच्यातल्या वाढलेल्या आत्मविश्वासानं, आत्मभाना मुळे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational