Arun Gode

Tragedy

4  

Arun Gode

Tragedy

अडाणी कृत्य

अडाणी कृत्य

4 mins
457


    एका मध्यम परिवारातील सर्वात लहान मुलगा आपले शिक्षण पूर्ण करुन स्पर्धा परिक्षा पास करतो आणि आपल्या मिठ-भाकरीची व्यवस्था चोख करतो. त्याच्याकडे सिमित पितर मालमत्ता पण असते. त्याच्या वडिलांनी सर्व मुलांना योग्य ती वाटणी करुण दिली होती. तरी त्यांनी स्वतःसाठी छोट्या शहरात घर आणि जमिन आपल्या नावावर ठेवली होती. तो नवयुवक नौकरी करत असतांना त्याच्या वाडवडील संपत्तीची विशेष काळजी घेत नव्हता. त्याचा एका जेष्ठ भावाने त्याची शेती आपल्या कडे ठेवूनघेतली होती. त्याची परिस्थिति फारशी चांगली नव्हती. त्यामुळे तो त्या शेतीकडे त्याला काही मदत व्हावी हा दृष्टिकोण ठेवुन दुर्लक्ष करत होता.


     घरात सर्वात लहान असल्यामुळे तो आपल्या आई-वडिलांचा लाडका पण होता. त्याचा आपला परिवार होता. आई-वडिल त्यांच्या म्हातारपणी त्याच्या कडे राहत होते. आई-वडिलांची इच्छा होती कि ते दोघेही देवाघरी जाण्या आधी त्यांच्या उरलेल्या संपत्तीचा विलेवाट लागला पाहिजे. पण त्यांचा धाकटा मुलगा त्याकडे विशेष लक्ष्य देत नव्हता. तो सेवानिवृत्ति होण्याच्या आधीच त्याचे आई-वडिल मागे-पुढे स्वर्गवासी झाले होते. आता तो काही महिन्यातच सेवानिवृत्त होणार होता !. त्याला संपत्ती सबंधीचे काही कागद पत्र मरण पावलेल्या वडिलांच्या पेटीत दिवाळीची साफ-सफाई करतांना मिळाले होते. त्याच्या सर्व पितर-संपत्ती मधे आजोबाच्या नांवाचा घोळ झाला होता. शेति मधे पण ज्या भागा वर सर्वांचा व्यक्तिगत ताबा होता. त्या प्रमाणे सरकारी रेकार्ड नव्हता. त्याने हे सर्व दुरस्ती करण्याचे ठरविले होते व तो तसे कागद-पत्र जमा करण्याच्या कामी लागला होता. तस्या त्याच्या त्या मार्गाने हालचाली सुरु होत्या.


    अचानक एका नातेवाईकाच्या मुलाचे लग्न त्याच्या मूळगांवा जवळ वर्धेला होते. त्याने विचार केला की सकाळचे लग्न आटपल्या नंतर मूळ गांवी जाऊन आवश्यक कागद-पत्रे कार्यालयात जाऊन जमा करु वापस येता येईल. त्याचा एका गोट्याने दोन पक्षी ठार करण्याचा बेत होता. म्ह्णुन तो सकाळी सर्व दिनचर्या आटपुन रेल्वेस्थानकावर आला होता. पन त्याच्या विचाराधीन असलेली गाडी त्या दिवशी उशिराने धावत होती. ती परिस्थिति बघुन त्याने विचार केला की आता लग्न वैगरे आटपुन नंतर कार्यालयाचे कार्य होणे अवघड झाले होते. अचानक त्याच फलाटावर त्याच मार्गाने जाणारी पण वर्धा-पूर्व वरुण वळण घेवुन दक्षिणेत शिरणारी गाडी येऊन ठेपली होती. त्याच्या जुन्या माहितीनुसार जवळ-पास सर्वच गाड्या वर्धा-पूर्व, दक्षिणेकडील महत्वपूर्ण जंकशन असल्यामुळे सर्वच सवारी गांड्याचा थांबा होता. ती सुपर फॉस्ट गाडी बघुन आता आपले काम फत्ते होण्याची लक्षणे त्याला दिसू लागली होती. त्याने गाडीत प्रवेश घेतला होता. लगेच एक रिकामी जागा बघुन तो त्यावर स्थानापन्न झाला होता. पण गाडी मधे त्याला पहिजे तशी गर्दी दिसत नव्हती. आनंदाच्या भरात त्याने त्याकडे विषेश लक्ष्य दिले नाही. गाडी लगचे फलाटावरुन निघाली होती. तो त्याचा नेहमीचाच मार्ग असल्यामुळे स्टेशन येण्याच्या आधीच तो डब्याच्या दारावर जावुन उभा राहिला होता. आता स्टेशन थोड्याच वेळत येणार म्हणुन गाडीचा वेग पण मंदावला होता. जसा गाडीने स्टेशनात प्रवेश केला होता ,तसाच तिने पुन्हा वेग पकडला होता. बघता-बघता स्टेशन त्याच्या डोळ्या समोरुन ओसरु लागले होते.


   तो आता घाबरला होता. त्याच्या लक्षात आले होते की गाडी या स्टेशन वर थांबणार नाही. तो घामने लथ-पथ झाला होता. आता त्याची पूर्ण योजना फिसकटली होती कारन समोरचा थांबा तिथुन जवळ-जवळ दोनशे किलोमिटर वर होता. आता तेल गेले, तुप गेले आणी हाती धुपटने आले होते. इतक्या दूरुण पुन्हा वापस येने म्हणजे पूर्ण-दिवस वाया जाणार होता. चेकरने पकडल्या नंतर त्याला दंड भरावा लागणार होता !. त्याला आता काय करावे काही सुचत नव्हते. आलीया भोगाशी असावे सादर म्हणुन तो हिम्मतेने पुन्हा जागेवर जावुन बसला होता. त्याच्या अचानक लक्ष्यात आले की गाडीचा वेग पुन्हा मंदावला होता. त्याने बघितले की समोर मोठे वळन असल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला होता. मरता क्या न करत ?. यालाच म्हणता विनाषकारी विपरित बुध्दी. त्याने जास्त विचार न करता मंदावलेल्या गाडीतुन उतरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले होते. आणी तो उतरत असतांना गाडी सोबत पुष्कळ दूरपर्यंत सरपटत गेला आनी शेवटी समोरच्या रुळावर जावुन कोसळला होता. बरेच प्रवाशी हे दृष्य बघुन हादरले होते. सुदैवाने त्या वेळेस समोरुन कोणीच दुसरी गाडी येवुन नव्हती राहिली होती. त्याला गिट्टीचा मुखा मार लागला होता. मोठ्या हिम्मतेने त्याने स्वतःला सांभाळले होते. आपन फार मोठी जोखिम पत्करली होती याची त्याला अनुभुती झाली होती. सुदैवाने आपली वेळ आली होती पण काळ आला नव्हता म्हणुनच आज आपण जीवंत आहो !. 


   सर्व शक्ति लावुन तो लंगडत-फेंगडत रेल्वपटरी ओलांडुन रस्तावर आला होत. रस्ताने जाणा-या एका स्कूटरवाल्याला त्याची दया आली होती. त्याने त्याला लिफ्ट दिली होती. ती त्याने मुकाट्याने स्वीकारली होती. नंतर त्याने त्याला शहरात सोडले होते. शेवटी तो प्रथम दवाखाण्यात गेला होता. डॉकटरला दाकवले होते. त्याने परिक्षण केल्या नंतर मलम-पट्टी केली आणि काही औषधी पण लिहुन दिली होती. जर काही जास्त त्रास झाला तर एक्स –रे काढण्याचा सल्ला पण दिला होता. शेवटी त्याने घरी परत जान्याचा निर्यय घेतला आनी तो घरी परतण्यासाठी पुन्हा रेल्वेस्टेशन वर गेला होता.


  रेल्वे स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी आपल्या गाडीची वाट बघत असतांना घडलेल्या प्रसंगामुळे त्याच्या अंगावर सारखे शिवारे येत होते. ते सर्व दृष्य एकसारखे त्याच्या डोळ्या समोर जात होते. त्याने जे अडाणी कृत्य एखाद्या बालका सारखे केले होते त्याची त्याला सारखी खंत व खिच वाटत होती. माणुस साठीला टेकला की त्याची बुध्दी भ्रष्ट होते असे तो ऐकत होता. त्याचे प्रात्यक्षिक त्याने त्या दिवशी अनुभवले होते. त्याला सारखा पसतावा होत होता कि समजा तो लग्नात नसता गेलो तर काय नातेवाईकाचे लग्न थांबनार होते ?. मालमत्तेचे कागदपत्र तर पुन्हा कधी जमा करता आले असते. समजा जर त्याचे पाय चुकुन चाकत गेले असते तर तो कायमचा जीवन भरासाठी अपाहिज झालो असता. कदाचित समोरुन येना--या गाडी सोबत जर भिडंत झाली असती, तर तो जागीच ठार झालो असता. त्याला सर्वांनी नककीच अति मूर्ख समजले असते !. यालाच म्हनतात, अती शहाणा त्याचा बैल रिकामा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy