saru pawar

Inspirational

3  

saru pawar

Inspirational

अंधार भेदतानां..

अंधार भेदतानां..

4 mins
144


    समोरचा डोंगर जणू आज खुनावत होता ,बघ मि कसा उंच ,ऐकटा तरी निर्भिड अस्तित्व जपलेला माझच.प्रकाश माझ्या पर्यंत पोहचतो आपोआप मी नाही त्याला शोधत किंवा दारबिर उघडत त्यानं आत यावं म्हणून ,तो येतोच माझ्याही नकळत माझ्या शिरावर आणि नंतर नतमस्तक होत नाहीसा होतो .

    ति ऐकटक ! एकांत अनुभवत, तासंतास बाहेर त्या डोंगरा कडे कधी आजुबाजुच्या निसर्गाकडे बघत बसायची.

आपल आयुष्य आपण अंधारत ,अनामिका सारख घालवतोय का ? हा प्रश्न तिला अनेकदा पडायचा पण थोडा वेळच ,मग काहीश्या मंध्यांतरा नंतर परत आजुबाजुला माणसं परतायची घरातली आणि पडलेले प्रश्न परत आतल्या अंधारात झाकले जायचे, निजायचे ,हरवायचे.

   आज अचानक ऐक जाहिरात समोर आल ,"स्वत:च अस्तित्व शोधताय ? ,तुमचा शोध संपला 👇खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणुन घ्या तुमच्यातला स्पार्क ! फक्त महिला आणि महिलां साठी ,आम्ही तुमची स्वप्न शोधुन देऊ हि गँरंटी...

    'ति ' आता तशीही ऐकटीच होती ,तिला वाटलं हे देवानंच योजल असेल माझ्या साठीच, म्हणून संपर्क केला .तर तिकडून ऐणारा आवाज लेकीचा ,ति कंपनीच्या सामाजिक दायित्व विभागात मिडिया कनेक्टिव्हीटी विभागात काम करत होती.

   मना आता आक्रोश करू की मौन या द्वंद्वात ति ' , समोरून परत आवाज आला ," मँम तुम्ही योग्य जागी संपर्क केलाय ,न अडखळता मोकळ बोला .मी आहे तुमची मदत करायला .बोला मँम .."

  

ति ,मनाचा ठिय्या करून ,"मी ,मी बोलतेय "

आता लेकिनं आईचा कातर होत जाणारा आवाज ओळखला आणि परत तिला प्रोत्साहन देत ,"मँम बोला ,प्लिज .तुमच अर्धवट सोडलेल ,राहिलेल स्वप्न जे आजही तुम्हाला खुणावतय."

ति ,"खरच बोलु ?बोलु का ?"

लेक ," हो ,हो नक्कीच बोला मँम मि ऐकतेय."

ति ,"मला माझे विचार ,आवाज लोकां पर्यंत पोहचवायचाय ,काही तरी करायचय .काय करता येईल ?"

 लेक ,"अच्छा !नक्कीच तुम्ही पाँडकास्ट वर हे करू शकता ,------ अँपच्या माध्यमातनं तुम्ही तुमचे विचार तुमच्या आवाजातनं लोकां पर्यंत पोहचऊ शकता ."

   ति ,"हे खरच होईल ?"

लेक ," हो नक्कीच ,तुम्ही ते अँप डाऊन लोड करा आणि मदत लागल्यास माझ्याशी बोला ,तसही मी तुमच्या साठी हजर असेन नेहमिच __"

लेकीनं शेवटी हळूच आई म्हटल्याच तिला ऐकू आल

     लेकिच्या सांगितलेल्या अँपवर तिनं आपल काही तरी करायचा प्रयत्न केला पण या गोष्टी हाताळणं तिच्या सवईच नव्हत म्हणून संध्याकाळी लेक आल्यावर करू म्हणत त्याला बाजूला सारल.

   संध्याकाळी लेकिनं छानसा ड्रेस ,माईक आणि पुष्प गुच्छ देत आईला ,"मा ,खुप खुप शुभेच्छा गं..तुझ्या नव्या वाटचाली साठी ,You are the feature shining star on podcast ....#मेरी सोच मेरी आवाज ,तुझ्या पाँडकास्टच Title,समझी मेरी जानं"

आईला हातानी धरत खुर्चिवर बसऊन लेक ,"अग तु का नाही माझ्याशी बोललीस ,तुला अस काही तरी करावस वाटतय ते ,हो मी कधि जाणून घेतलय म्हणा ,बर असो ,मी फ्रेश होते आणि तु ही हो छान चहा कर आणि आपण तुझ पहिल पाँड रिकार्ड करू ,चल चल" 

दोघी थोड्या वेळातच परत तयार होऊन टेरेसवर. आईन आणलेला चहा घेत लेक ,"So are you rady mam ?"

ति ,"हो "

लेक ,"अग जरा आत्मविश्वासानं "

ति ,"हो हो .."

लेक, "मग कर सुरू पहिल अस तुझ मनातल मांडायला ज्यातनं पुढच्या प्रवासाची मुहूर्तमेढ ठेवता येईल "

ति ," मी ......मी फक्त आता मी असेन नो #ब्ला ब्ला ..तर मैत्रिणिनों आणि ऐकत असाल तर मित्रानों, आज माझाच आतला आवाज ऐकुन स्वत:च्या आतला आणि बाहेरचा अंधार भेदायचा हा प्रवास सुरू करतेय.खरच आम्ही बायका बिंडोक म्हणून आणि म्हणऊन घेऊन घरात राबतो ,तश्या बाहेर काम करणा-या जरा कमी बिंडोक आणि आम्ही पूर्णच ,दिवसातले काही तास ,आयुष्यातली इतकी वर्ष राबतो किंवा वाया घालवतो , परत प्रश्न असतोच काय करतो ते ??खरच का नवरे ,मुलं आम्हाला उगाचच पोसतात..विचारा हं हा प्रश्न तुम्ही स्वत:ला ...आणि आठवा जेव्हा " ति" घरात नसते तेव्हा काय कराव लागत आणि अडचण होते किंवा भासते की नाही?

  आमच्या साठी वेतनं हा विषय येतो तेव्हा घरात व्यापार येईल ,घरपण हरवेल अस म्हणून तो विषय मागे पडला पण ,कमवायची अक्कल नाही ,अस म्हटल्यावर बाहेर पडून घरात जे करतो तेच पैसे कमावण्या साठी केल तर आठ ते पंधरा हजार नक्कीच मिळतिल Working hours जास्त तर पगार जास्त मग कदाचित विसपंच्चविसही ,मग करा हिशोब ,बिंडोक लोकानां इतके पैसे मोजावे लागतात.सो आज पुरते ऐवढेच ,परत भेटुया याच प्रश्नांनच्या तुमच्या उत्तरां सोबत ,आनंदी रहा ,काळजी घ्या .."

लेक ,"ओ !! माय माय ,अरे किती छान बोललीस ग.पण तुझ्या मनात हे इतक सलतय ? मला कधी जाणिवच झाली नाही याची ,पण मम्मा हा संवाद कित्येक मनानां साद घालेल.काही स्वत:च्या आतला हाच संघर्ष चाचपडतिल तर काही आत्मपरिक्षण करायला लागतिल ,तु वैचारिक खाद्य पुरवलयस ,जस्ट ग्रेट यार मम्मा ,I am proud of you and proud to be a daughter of you too."

     "ति " ,"खरच मनात कुठे तरी हलक झाल्या सारख आणि सोबत काही तरी संचारल्या सारख वाटतय ..कदाचित मनातला गडद होऊ पाहणारा अंधार भेदण्याची हि सरूवात असावी ...मिटेल फिटेल हे अंधाराचे जाळे ....आणि मोकळ होईल माझ आकाश ,मनातल आणि भोवतालचही ..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational