Annapurna manoj Lokhande

Abstract Crime Thriller

4.0  

Annapurna manoj Lokhande

Abstract Crime Thriller

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

2 mins
237


   आम्ही सगळे लहान असताना ची ही गोष्ट आहे. चौथीला असतानाची. लहान असल्यामळे घरची कामे जास्त करावी लागत नव्हती. सकाळी शाळेला जायचं 5ला. शाळा सुटली की आजीला आणि काकूला थोडीशी मदत करायची, आणि खेळआयचं आमचे दुकान होते . ते खुप चांगले चालायचे.

    आमचं घर त्याच्यावर चांगल चालायचं. सगळ काही नीट चालत होत. एकेदिवशी आमच्या पप्पांच्या काकाने पण दुकान टाकल. जरा जवळ जवळ घरे असल्यामुळे त्याचा परिणाम दुकानावर होत होता. त्यांनी दुकान चालू केल्यापासून आमच्या दुकानात लोकं यायची कमी होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून दोन्ही कुटुंबात वाद होऊ लागले.

 आधी आम्ही सगळे खूप चांगले राहायचो. दोन्ही कुटुंब एकमेकांशिवाय राहतच न्हवते. दोन्ही कुटुंबातील मुल एकत्र खेळायचे. प्रत्येक सण एकत्र साजरा करत होतो.

    दुकानामुळे खुप अंतर पडला होता. आमच्या दुकानात लोकं येण्याची कमी झाली म्हणून, आमच्या अजजीने त्यांच्यावर पाळत ठेवायचं ठरवलं एक दिवस पौर्णिमा होती. आणि पप्पांची काकू रात्री गडबडीत कुठे तरी चालली होती अजजिने तिचा पाठलाग केला. तर ती एका देवृश्या कडे गेली होती. त्याने तिला आमच्या दुकानापुढची माती आणायला सांगितली होती आणि तीने ती घेतली. आणि देवृष्याला दिली. त्याने त्यावर काहीतरी मंत्र टाकले आणि ती माती उधळली. आणि सांगितलं की आता त्यांचं दुकान चालणार नाही. हे सर्व बगून अजजीला धक्का बसला.

    ती गडबडीने घरी आली आणि हा प्रकार सर्वांना सांगितला. आमच्या घरच्यांनी ही हेच करायचे ठरवले. आणि आम्ही मुल खेळत खेळत त्यांच्या दुकानाजवळ गेलो आणि तेथील माती घेतली आणि आजजिला दिली. ती माती घेऊन देवृष्याकडे गेली आणि त्यांचे दुकान बंद करून टाकायला सांगितले. त्याने त्याचे पैसे मागितले. तेही दिले.

   असच करत दोघी पैसे देत होत्या आणि त्याला एकमेकींच नुकसान करायला लावत होत्या. पैसे देऊन ह्यांचं नुकसान होत होत. आणि तो देवृषी मात्र त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेत होता. हे सगळ त्या दोघिंच्याही लाक्षात यायला फारच उशीर झाला होता.

    एकमेकींना खाली पडायच्या नादात त्या स्वतः च खुप खाली जाऊन पोहोचल्या. आणि जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा पश्छताप करण्यावाचून दुसरा पर्याय न्हवता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract