Annapurna manoj Lokhande

Comedy Tragedy

4.5  

Annapurna manoj Lokhande

Comedy Tragedy

पुनर्जन्म

पुनर्जन्म

1 min
489


     एक मुलगा आणि त्याचे वडील बाजार आणण्यासाठी गेले होते. जरा अंतरावर गेल्यावर तो मुलगा म्हणाला की बाबा गाडी थांबवा. तर बाबांनी

त्याला कारण विचारलं तर तो काहीच बोलला नाही. शांत बसून राहिला. बाजार घेऊन माघारी येत असताना तो पुन्हा एकदा गाडी थांबवा अस म्हणाला . त्याच्या बाबांनी गाडी थांबवली.

       गाडीवरून उतरून तो मुलगा समोरच्या इमारतीकडे बघत बसला. त्याच्या बाबांनी विचारलं की असा का बघत आहेेस? तर तो मुलगा म्हणाला, मला असं वाटतं की मी इथे आधी आलो होतो. मला राहावलं नाही आणि मी इथे आलो. मला असं वाटत की माझा पुनर्जन्म झाला आहे. माझ्या मागच्या जन्मी ह्या इमारतीचा आणि माझा काहीतरी संबंध नक्की आहे. हे ऐकून त्याच्या बाबांनी त्याला जोरदार चापट मारली आणि म्हणाले मूर्खा ही तुझी ह्या जन्मीची शाळा आहे जी कोरोनामुळे 1वर्षापासून बंद आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy