Rajashri Sutar

Tragedy Others

4  

Rajashri Sutar

Tragedy Others

बाजार

बाजार

8 mins
478


एक गरीब परिस्थितील कुटुंब त्या कुटुंबातील कर्ता खूप काबाडकष्ट करणारा अगदी वेळ आलीच तर दगडही फोडणारा कुठल्याही कष्टाची लाज न धरणारा तसेच त्याची कष्टाळू त्याला सुखदुःखात हे साथ देणारी त्याची पत्नी तो करता खूप राब राबूनही त्याचा मालक त्याला वेळेवर पैसे देत नसतो त्यामुळे तो कष्ट करू नही त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नसतो गरिबी ना त्याच्या कुटुंबाला जणू विलखाच घातला होता हा करता काबाडकष्ट करून देखील त्याला पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे उपासमारीला त्यांना वेळोवेळी तोंड द्यावं लागायचं म्हणतात ना कष्टाला यश असतं कष्टातही लक्ष्मी कमी पडत नाही कष्टाचे घाव सोसले की सुखच सुख येत. परंतू इतके कष्ट करूनही त्या कुटुंबावर गरिबी न घवच घातला होता जणू

   त्या गरीब कुटुंबात शेजारीच एक चांगल्या परिस्थितीतील कुटुंब राहत होतं त्या श्रीमंत परिस्थितीतही करता म्हणजे तात्या. तात्या श्रीमंत परिस्थितीतील करता. तात्या बरी स्वभावाचे त्यांच्याजवळ थोडीफार माणुसकी उरलेली असते तसे तात्या प्रेमळही परंतु ते उपकार करणारे अन् ते उपकार बोलून फेडणारे ही

        परंतु त्या गरीब कुटुंबातील स्त्री बाळंत होते दुर्दैवाने घरात काहीच धान्य नसतं त्याच्या कुटुंबात त्या स्त्रीची एक लहान कोमल असे गोंडस मुलगी ही असते की तिच्याकडे पाहिलं तरी हेवा वाटण्याजोगी मुलगी सर्वकाही जाणत होती कि आपली आई बाळंत झाली आपल्या आईलाही भूक लागून ही घरात काहीच नाही ताना भाऊ खूप रडत होता आपले बाबा हे खूप कष्ट करत आहेत तरीही आपल्या घरात असं का परस्थिती ची तिला चड होती. गरीबी शेतीची कोमल मनाची झुंज चालली होती की आपला बाबा काम करतो तरीही भुकेने डोंब उठायच. पण आईला म्हणायचा

    आय, बघ मी मुटी झाली ना बाबाला किती नोटा देती बघ लई शिकणार आपल्या सोन्याला बि लेय चांगली कापड आन आण घरात आपल्या लई बाजार आणणार. तू वाईट वाटून घिव नकु मी बघ किती शिकतेय मंग दोन पिशव्या घरात बाजार आननार

      त्या मुलीला लाडू खाऊ वाटला की मुलगी म्हणायची आय, आज बाबाला लाडू आणाय सांग मला लाडू खाऊ वाटतंय ग. आज मी आता तात्याच्या त लाडू बगितल

      आई उठायची बाजरीच भाकरीच तुकड उखळात कुटायचं अन् चाळणीन चालायच. त्यात गूळ घालून त्याचा लाडू बांधून त्या पोरीला द्यायचा आणि तिचं मन शांत करायचं एवढेच की लाडू गोड असतो गोल असतो एवढा ठव असतं पोरीला तिक उड्या मारून तो लाडू आवडीने खायची अन तिची आई कोपटात कोपऱ्यात जाऊन ढस ढसा रडायची कधीकधी घरात बाजरी शिजवून त्याला तिखट-मीठ लावून कुटुंब शांत निजायचं पोरगी रहात होती परंतु तीच मन उडत होतं आकाशात झेप घेण्यासाठी लहान गाजिव लहानपणीच गरिबीच्या काळोखातही काजव्या गत चमकू लागला होता बापाच्या आणि आईच्या कष्टाची कठोर कष्टांची तिला जाणीव होती ती लहानपणीच अन्यायाच्या विरुद्ध झुंज देऊ पाहत होती परंतु घरी बीन मात्र तिच्या मनाच्या ठिकऱ्या केल्या होत्या एखादा असा वरून पडून खळकन फुटावा अगदी तसंच कधी कधी तिच्या बाबांना पैसे मिळायचे मग काय त्या कुटुंबास दिवाळीच की. तिचे बाबा भरपूर खाऊ आणायचे सहा वर्षांची मुलगी तिच्या 

बाळंत आईला मदत करू लागायची. दारातल्या गुरांचे शेण काढणं गवत अण् न. लहान बाळाला घेऊन थोपटन. त्याला खेळवणं सर्वकाही जाणवत होती ती मुलगी तीन ठरवलं खूप शिकायचं . मोठ्ठं व्हायचं. बाबांना भरपूर पैसे द्यायचा. आई बाबांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलय. कारण तिच्या त्या कोमल मनावर खडतर प्रसंगाचे एक काहूर माजलं होतं आपल्या कुटुंबावर इतके अन्याय का

       एक दिवस घरात काहीच नाही म्हणून तिची आई शेजारच्या तात्या कडे गेली आणि म्हणाली अहो तात्या जरा पैसे पाहिजे होते. घरात खूपच आलीय. ह्यांचा पगार झाला की तुमचे पैसे नक्की मी चुकते करीन.

   किती पाहिजेत पैसे. खिशात हात घालून तात्या म्हणाले.

    द्या पन्नास एक रुपये.

   हा बस झाले 50 यांचा पगार होईलच की, पण बारक्याला रात्रीपासून भात नाही तो रात्रभर रडतोय थोडं फार सामान आणीन

     हे घ्या पैसे. तात्या.

   पैसे घेऊन बिचारी तडफड इन घरी निघाली, तो वरच तात्यांची आई घरातून मिसरीचा तोबरा लावत लावत बाहेर आली. आणि बिचारी वर जोरात खेकसली.

    ये तुला सांगून ठेवते आली एवढी आली स माझ्या तात्या कडे पैसे मागाया. इथं काय पैशाचं झाड लावलं नाह य तुझ्या बापान. घाब डी बी तात्या कडं सारखी यात्याती. तात्या तात्या करत आता आलिया व्हय. गाब डी संभाळ न होतं नाहीत तर काढायची कशाला. दुसऱ्याला का ताप त्यांचा.

    अहो आजी आम्ही हे पैसे उसने चालविलेत. मी परत करणार आहे.

    बीचार रीच्या डोक्यात आजीच्या प्रश्नाचे उत्तर घोळत होतं. पैसे घेण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय नव्हता घरात तिचा ताना भुकेलेला होता त्या कुटुंबाला भात म्हणजे श्रीमंताचं खान वाटायचं कारण भात देखील त्या कुटुंबाला पहायला देखील मिळत नव्हता केवळ बाळाच्या भातासाठी ती जड पावलाने पैसे घेऊन गेली तात्या एक पुरुष असून त्यांना मुलांची आणि त्या बिचारीची दया आली तात्या म्हणजे वयस्कर माणूस नसून एक साधारण राहण्याचा आणि आमदार तगडा पुरुष दुःख काळजाला झोबात होतं. ते एकच म्हणजे आजी एक आजी असून एक आई असून एक स्त्री असून त्यांनी मला हा घाणेरडा प्रश्न केला. ह्या प्रश्नाचे उत्तर आजीजवळ देखील होतं स्त्री एका स्त्रीला हा घाणेरडा प्रश्न कशी करू शकते. तिला मुलांची कीव कशी आली नाही म्हणतात ना स्त्रीचे हृदय हे दुधाच्या साई सारखं मऊअसतं.

       त्या कुटुंबात बाजार तर नसायचाच परंतु उपासमार ओळखीचे जिवाभावाची असल्याप्रमाणे होतं आठवड्याच्या बाजारासाठीच ती बिचारी आठवडाभर एरंडाच्या बिया रगडून त्यातील बिया साठवायचे एरंडाच्या बियांना वरून कूस म्हणजे काट्यांत रमाने काटे असतात ते हातात घुसून हात रक्तात तात अशा बिया आठवडाभर रानातून आणून त्यासाठी होऊन बाजार दिवशी तात्या जवळ घ्यायची आठवडाभर राबराब राबून माप्त भर नाहीतर चिपटभर बिया साठाये च्या तेवढ्याच बिया घेऊन तात्यांना द्यायची तात्या दर बाजारी जायचे

      बिचारीने उन्हातानात जाऊन साठवून रगडून ठेवलेल्या बियांचा चुंबद तात्या जवळ आणून दिलं तात्यांनी वेळ लावतात सांगायचे

    ताई या बियांच फकस्त तीन रुपये येथील.

बिचारी नुसती मान हलवायची.

    बाजार त्यात कमी येईल सांगितलेलं बरं असतं आधीच सांगून असावं पुन्हा हिसोबाचा घोळ नग. म्या येवढाच दिल त अन्न बाजार येवढाच कसा. सांगा काय आणायचा बाजार, तात्या.

          आना काय येईल ती येल.

     मग तात्यांनी चार-पाच रुपयांप्रमाणे एरंड बिया विकल्या आणि त्याचा पाच रुपयांचा बाजार ..

      दोन रुपये पाव प्रमाणे रुपयाची वांगी दोन रुपयाची मोकळी शेव. एका कागदाच्या पुडीत बांधून दोन-तीन टोमॅटो. झाला बाजार.

      चार वाजता बाजारला तात्या गेले ले. संध्याकाळी सातला यायचे पिशव्या गच्च भरलेल्या. चार-पाच पिशव्या गच्च भरलेल्या. तात्या बाजारच्या ओझाने वाकायचे . ते सायकल वर न बसताच यायचे. सायकलवर मागेपुढे एकच बाजार असायचा. बाजार मध्ये एक-दोन तरकारी. तंबाखूची काटक. केळ 4 डझन. मोठ्या ची मोठ्या गाजर भुईमुगाच्या शेंगा दोन-दोन एक किलो खुराक दोन पिशव्या भाजीपाला वेगळाच.

     तात्या बाजार वरूनआले की पोरगी पळतच जायची तात्या तात्या मला एक क क्या ळ द्या की. किती केलं तरी लहान निष्पाप लेकरू किते. परंतु त्यांची आई त्या मुलीवर खे कसायची.

     मद्यानो काग छळताय माझ्या लेकराला माझ्या तात्यांनतुमचा पटकुर उचललाय होय. बाप मोकळा सोडला माझ्या तात्याचा च पिछा धरलाय होय त्याआजीच्या कर्कश आवाजाने पोरगी थरथरत तात्यांच्या दारात तशीच दारा आड उभी राहिली कारण तिला माहीत होतं की आपल्या आईने तात्या जवळ बियाहे काय दिल्या होत्या मग तात्यांन आपला बाजार आणला असणार च.

      तात्या त्यांच्या आईला बोलले असू दे आय तिच्या आईन मजजवळ दिया दिल त्या. त्याच पैशात म्या त्यांचा बाजार आणलाय. तिच्या बापाचा आज पगार झाला नस ल. ही दी तिला यक केळ. ही बाजार ची कॅरीबॅग. मग त्याची आई शांत झाली. तिने ती कॅरीबॅग उचलली. दारामागे उभे राहिलेल्या त्या मुलीला अलीकडं कचकन ओदून हातात दिली मनाली बाजार घी.जा दे आय ला.जा .   

     ती मुलगी बिचारी पळतच आईकडे गेली लांबूनच ओरडत होती. आय, तात्या न बाजार दिला.

    या बाजाराने ह्या लहान मुलीच्या मनाला एक भेग पाडली. ती भेग दिवसेंदिवस वाढतच गेली. ती छोटीशी भेग नंतर तिचं दरीत रूपांतर झालं

    कारण त्या कोमल मनावर त्या कुटुंबावर ह्या अन्यायाने आणि गरिबीने वार केला म्हणून या बाजाराची घृणा वाटू लागली.

     एकदा तर काय झालं त्या मुलीची आई बाळंतीन असूनही उपाशी होती चुलबंद पाऊस पडत होता कोपट गळत होतं आई पंधरा दिवसांची बाळंत. पोरगी भूक जून गेलेली.

    मुलीचा बाप मालकाकडे पगारासाठी पेढे घालीत होता वणवण भटकत होता की घरात माझी बाळंत बायको उपाशी आहे माझं कामाचं पैसे द्या परंतु कोणीही च्या पंधरा दिवसात पैसे दिले नाहीत. विचारीन बाळंत असून बाजरीची भाकरी चा तुकड खाल्लं. दिवस रेटलं. पण माणुसकी ही कुठे तरी असते ना. परंतु त्या कुटुंबाला तर माणुसकी कधीच मिळाली नाही आणि कुठेच मिळाली नाही.

   पाऊस वाढत गेला एप्रिल महिन्यातील ही गोष्ट दुपारची तीनची वेळ विजा कडाडू लागल्या कोपटा तून पाणी वाहू लागलं ज्याने त्याने आपापले घराची दारे बंद करून घेतली हाक मारली तर कोणाला ऐकू ही जात नव्हती. वाऱ्यान हाहाकार माजवला होता. कर्ता पुरुष कामासाठी बाहेर गेला होता कोपटात माता माऊली आणि तिची दोन पाडस,

संकटात सापडली होती. पाऊस वाढला अन क्षणातच ते कोपट त्या तिघांच्या अंगावर कोसळत गेलं बिचारीला मरणच दिसलं . तिने दोन्ही पोर तिच्या गुडघ्यांच्या मध्ये घेतली. आणि स्वतःचे डोके गुडघ्यापर्यंत वाकवले तिच्या अंगावर एकदम लाकडी पडली तिच्या अंगाला बऱ्याच ठिकाणी खरलतल गेलं. पाऊस कमी झाला माणसं बाहेर आली म्हणू लागले की अरेरे कोपट पडलं की काय. पोरं बाळ बाहेर काढली का बघा. बिचारी बाळांचा संगतीने त्या पडक्या कोपटा तून लाकडे बाजूला सारून दोन्ही लेकरांना बाहेर काढले पोरगी मुसमुसत होती ती पावसाच्या व अंगावर कोपट पडल्याच्या भीतीने आईचं काळीज उडत होतं पोराच्या अंगावर कोपट पडलं पोरांना लागला तर नाही ना. परंतु बिचारीला सर्व स्वतःवर दुःख घेतलं काही मोठी लाकडे ही कोपटावर छताला होती. त्यामुळे विचारी ला अनेक जखमा झाल्या होत्या. ते कोपट फार जुनाट होतं 

     जीव तर वाचला होता पाऊस पडून भगभग लेली आणि पुन्हा न तापलेली काळी आई शांत झाली होती कारण तो गारांचा सडा क्याचा पाऊस होता. पाणी पाणी पाणी केलं होतं पावसामुळे पोपटात पाणी-पाणी झालं कोपट भुई सपाट झालं त्या कोपटा टल. बिचारी चं पीठ मीठ सर्वकाही भिजून वाहून गेलं चुलीत पाणी साचलं अन्नपाण्यावाचून बिचारी तिचा नवरा व पोरगी रात्रभर उपाशी पोटात मात्र भुकेने वनवा पेटला तसा आगीचा डोंब उठला होता

    सकाळी सकाळी बिचारी न तीन दगड मांडून त्याच्यावर बाजरी शिजवून शिजवून सर्वांनी तिखट मीठ लावून पोटभर खाल्ली. परंतु माणुसकीच्या नात्याने कोणीही त्या लहान मुलीला चिमुरडीला कोरभर तुकडा आणून दिला नाही.

    त्या कोमल जीबान कुणाचा काय गुन्हा केला होता. म्हणून त्यालाही अशी शिक्षा हे सर्व दुःख वेदना काळजात साचनशा अशा झाल्या. ओसंडून वाहू लागल्या मनात तिरस्काराची वावटळ निर्माण झाली ती कोमल चिमुरडीच्या मनात ही माणसं आपल्या अशीच असं का वागतात. का तर आपली गरिबी आहे म्हणूनच ना.

     ह्यांना देव चांगली बुद्धी का देत नाही चिमूटभर तरी माणुसकी ईश्वर यांच्या वाट्याला का देत नाही. माझे बाबा खूप गरीब आहेत म्हणूनच हे लोक माझ्या आई-बाबांशी असं वागतात ही तिरस्काराचे ठिणगी मनात पडली तिने शिक्षण भरपूर घेण्याचा निर्णय घेतला आणि गरीब बापाला न्याय मिळवून द्यायचा मी मुलगी असली म्हणून काय झालं मुलगी ही आई-वडिलांचा आधार होऊ शकत नाही का. त्यो बाप माझ्यासाठी रक्ताचं पाणी करतोय. आई चंदनासारखी झिजते .

       बाजार गुरांचा ही भरतो

       बाजार स्त्रीच्या इज्जतीचा भरतो

       बाजार प्राण्यांच्या आतड्याचा

        बाजार माउसांचा भरतो

        बाजार माळ वांचा ही भरतो

        मग बाजार माणुसकीचा च का

       भरत नाही

    ह्या बाजारा नीच माणसांनी माणसांना तराजू तोलायला शिकवलं त्यामुळे माणूस स्वार्थी झाला.

   बाजार भरतो देण्या-घेण्याचा

   बाजार भरतो पैशांचा

   श्रीमंताचा पण त्या बाजारात गरीब मात्र भाव कमी-जास्त करीत पायाखाली चे गरून जातो.

    ही कथा काल्पनिक नाही.


Rate this content
Log in

More marathi story from Rajashri Sutar

Similar marathi story from Tragedy