Sneha Kale

Children Stories Children

3  

Sneha Kale

Children Stories Children

बाळाचा समजूतदारपणा

बाळाचा समजूतदारपणा

2 mins
147


गौरीची सकाळपासून काम लवकर आवरायची घाई सुरु होती...आज जेवण करणाऱ्या मावशी आल्या नव्हत्या...सगळं काम तिलाच करावं लागत होतं...त्यामुळे तिची चिडचिड होतं होती..12 वाजण्याच्या आत पूर्ण करायची होती...कारण 12 वाजता तिचं client बरोबर con-call होतं..ही meeting खूप important होती...त्यातून तिला खूप मोठी order मिळणार होती...

   गौरी fashion designer होती...तिचं बाळ लहान असल्यामुळे ती घरून order घेऊन काम करत होती...तिच्या बाळाला सांभाळायला एक care taker होती...तिलाही आज उशीर होणार होता...म्हणून अद्वैतसाठी, तिच्या 4 वर्षाच्या मुलाचे आणि स्वतःचे जेवण आज तिला स्वतःलाच करायला लागत होतं...घाईघाईत ती सर्व काम आवरत होती...त्यात अद्वैतचे मध्ये मध्ये येऊन मला हे दे, ते दे हेच सुरु होते..ती त्याला सारखं समजावत होती की मला माझं काम पूर्ण करू दे,तू तुझ्या खेळण्याबरोबर खेळ...पण अद्वैत काही ऐकेना...मग मात्र गौरी त्याच्यावर ओरडली...अद्वैत खाली मान घालून तिथून निघून गेला..

   गौरीने पावणे बारा पर्यंत सर्व काम आवरली..आणि लॅपटॉप समोर बसली...बरोबर बारा वाजता तिची meeting सुरु झाली...जवळपास दोन तास meeting सुरु होती.Meeting संपल्यावर अचानक तिला काहीतरी आठवलं...ती पटकन उठली...आणि...अद्वैतला शोधू लागली...Meeting मध्ये ती इतकी गुंतून गेली होती की तिला बाळाची आठवणच आली नाही...ती घरभर अद्वैतला शोधत होती...कुठेच सापडत नव्हता तो..घराचा प्रत्येक कोपरा तिने पाहिला...कुठे गेला अद्वैत...ती वेड्यासारखी त्याला हाक मारत होती...पण त्याचा आवाज काही येईना..

आता मात्र ती पुरती घाबरली...

   तेवढ्यात बेडरूमच्या खिडकीजवळ हालचाल जाणवली...ती पटकन तिथे गेली...खिडकीचा पडदा बाजूला सारला....तर तिथे अद्वैत बसला होता...सोबत खेळणी, बिस्कीटचा डब्बा आणि पाण्याची बाटली होती...कामाच्या नादात ती विसरूनच गेली होती की अद्वैतच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती..गौरीला खजील झाल्यासारखं झालं होतं..हे सर्व पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं..तिने अद्वैतला कवटाळलं...अद्वैत तिचे डोळे पुसत म्हणाला, मम्मा तू काम कर, मी तुला नाही त्रास देणार... हे बघ, मी स्वतःच्या हाताने खाऊ खाल्ला...

     आपलं बाळ किती समजूतदार झालंय, या जाणिवेने तिने त्याला खूप खूप लाड केलं...आणि मग दोघांनी सोबत जेवण केलं...


Rate this content
Log in