Sneha Kale

Romance Tragedy

4  

Sneha Kale

Romance Tragedy

नियती

नियती

7 mins
333


रोहन ऑफिसमधून लवकर निघाला..आज जुईचा वाढदिवस होता...त्याने आधीच सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं...आता घरी जाऊन तयारी करायची होती...त्याने घरी जाताना केक आणि थोडं snacks घेतले...आणि जुई च्या आवडीचा चाफा पण...

    कॉलेजमध्ये ओळख झाली होती दोघांची...जुई खूप मनमिळाऊ, हसतमुख मुलगी...नेहमी दुसऱ्यांना मदत करायला तत्पर....तर रोहन मनमौजी, मजा मस्करी करणारा पण कोणाचं मन न दुखावणारा होता. दोघांच्या मनातही नसेल अश्या अनपेक्षित वळणावर दोघांची ओळख झाली...

     एकदा जुई कॉलेजला निघाली होती...थोडं अंतर गेल्यानंतर ट्रॅफिक मध्ये ती अडकली..कॉलेजला जायला उशीर होतं होता...ती वैतागली होती..ती कसबसं वाट काढत पुढे आली तर तिला कळलं कोणाचं तरी accident झाला आहे..पण मदत करायला कोणी पुढे सरसावत नव्हतं..ती पुढे होऊन त्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली...त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि त्यांच्या घरचे येईपर्यंत तिथेच थांबली होती...तेवढ्यात रोहन आणि त्याची आई आली..रोहनला जुईने फोन केला होता..दोघांनी एकमेकांकडे पाहिले तेव्हा दोघे एकाच कॉलेज मध्ये आहेत हे कळले..रोहनला कळत नव्हते जुईचे आभार कसे मानावे...ती होती म्हणून आज त्याचे बाबा जिवंत होते...

     दुसऱ्या दिवशी जुई नेहमीप्रमाणे कॉलेजला आली...रोहन पण आला होता..त्याला thanks बोलायचं होतं..तो भेटला तिला...जुई म्हणाली, मी माझं कर्तव्य केलं..रोहनला तिचा स्वभाव खूप आवडला..मी काहीतरी खूप मोठं काम केलं,याचा लवलेशही नव्हता तिच्या चेहऱ्यावर...रोहन आणि जुई रोज भेटू लागले...

      अश्यातच कॉलेजच शेवटचं वर्ष आलं...दोघांची मैत्री अजून टिकून होती...एकदा जुई कॉलेजला आली नव्हती..रोहन रोजच्याप्रमाणे तिची वाट बघत होता....काही काम असेल म्हणून आली नसेल असा विचार करून त्याने विषय सोडून दिला...दुसऱ्या दिवशीही ती नाही आली...असेच 5-6 दिवस निघून गेले..जुईचा काहीच पत्ता नव्हता....रोहनला थोडं चुकल्यासारखं झालं...तिचा फोनही बंद होता...काहीच कळायला मार्ग नाही...कुठे असेल जुई...तो सतत तिच्याच विचारात असायचा...कशात लक्ष नसायचे त्याचे...ना मित्रांमध्ये ना जेवणात ना अभ्यासात...तो शांत शांत राहू लागला...त्याच्या मित्रांना त्याची काळजी वाटू लागली होती...रोहन असा पूर्वी कधीच वागला नाही..मग आता काय झालंय याला...रोहनचा मित्र अमित पण सारखं त्याला विचारी पण तो काहीच सांगायचा नाही...गप्प राहायचा...

      रोहनला थोडा change मिळावा म्हणून सगळ्यांनी दुपारी बाहेर जेवायला जायचे ठरवले...सगळे एका हॉटेल मध्ये जमले...रोहन पण आला...सगळे गप्पा मारत होते तरी हा शांतच होता..तेव्हा अचानक त्याला एक auto दिसली.त्यातला चेहरा त्याला ओळखीचा वाटला...जुई...तो उठला आणि त्या auto च्या मागे धावायला लागला...त्याला हे ही भान नव्हते की रस्त्याच्या मधून धावतोय.....त्याला फक्त जुईला भेटायचे होते..वेड्यासारखा तो auto मागे धावत होता...बघता बघता auto निघून गेली..त्याचे मित्र धावत आले आणि त्याला रस्त्याच्या बाजूला ओढलं...मागून गाडी आली होती हे कळलंच नाही त्याला..

अमित ओरडला त्याला, ''काय चाललंय तुझं...असा का धावत सुटलास त्या auto मागे...तुला काय वेडबिड लागलाय का''

''अरे जुई होती त्या auto मध्ये... मला भेटायचं होतं रे तिला...अरे आठवडा झाला तिला पाहिलं नाही...बोललो नाही तिच्याशी '',असा म्हणून रोहन लहान मुलासारखा रडायला लागला..रोहनचे बोलणे ऐकून सगळा प्रकार अमितच्या लक्षात आला...

''वेडा रे वेडा'', असा बोलून अमित हसायला लागला..''तर असं आहे, साहेब, तुम्ही प्रेमात पडला आहात...तरीच म्हटलं एवढा शांत कसा काय झाला...जुई madamne वेड केलंय तुम्हाला''

"ए अमित असं काही नाहीये...आणि हे प्रेमबीम मला नाही जमत...तुला तर माहितेय ना..."

"हो रे..मला माहितेय..पण हे जे काही तू वागतोयस ना...तसं प्रेमात पडल्यावरच होतं...इतके दिवस तुला जुई दिसली नाही,तू कासावीस झालास.. तिच्याशी बोलायला नाही मिळालं, ती भेटली नाही म्हणून तू अस्वस्थ झालास...आणि आज तर चक्क भर रस्त्यात जीवाची पर्वा न करता धावत गेलास. हे काय आहे मग.. यालाच प्रेम म्हणतात ना...तू आजपर्यँत प्रेमाला कधी समजू शकला नाहीस...जुई मुळे तुला ते कळलं...आता जा सांग तिला.."

रोहनला काय बोलावं हे सुचत नव्हतं...खरंच मी प्रेमात पडलोय...तो खूप खुश होता...कधी हे जुईला सांगतो असं झालं होतं...पण एक भितीही होती..तिच्या उत्तराची..काय बोलेल ती...होकार की नकार...त्याला tension आलं...काय करू.. कस सांगू...

      याच विचारात असताना त्याला कळलं की 4 दिवसांनी जुई चा वाढदिवस आहे....त्या दिवशी जुईला propose करायचं त्याने ठरवलं...तिच्यासाठी surprise party ची तयारी त्याने केली...जुई ची मैत्रीण तिला तिच्या घरी घेऊन गेली काहीतरी कारण सांगून....तिथे पोचताच सगळे ओरडले, surprise....आणि रोहन केक घेऊन उभाच होता...ती खूप खुश झाली...असा birthday तिचा कोणीच केला नव्हता...तिला खूप आवडायचं celebrate करायला...तिने केक cut केला...रोहन तिच्या जवळ गेला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला ring दिली आणि propose केलं...

I love u जुई....

रोहन असं अचानक तिला विचारेल असं तिला वाटलंही नव्हतं...ती स्तब्दच झाली...काय बोलावं हे तिला कळत नव्हतं...रोहन उत्सुकतेने तिच्या काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता...पण जुई मात्र निःशब्द होऊन नुसतेच रोहनकडे पाहत होती...रोहन उठला आणि तिला म्हणाला, "जुई, मी फक्त माझ्यातली भावना व्यक्त केली...खरं तर ही सुंदर भावना मी कधी अनुभवलीच नसती...जर तू भेटली नसतीस...आपण जेव्हा सोबत होतो म्हणजे रोज भेटायचो तेव्हा मला तसूभरही जाणीव नाही झाली...ती तू नसताना झाली...तुला माहितेय तू इतके दिवस भेटली नाहीस तर माझी काय अवस्था झाली होती.मला काय होतंय हे माझंच मला कळतं नव्हतं...मीच मला समजू शकलो नाही...या अमित ने मला तुझ्यावरील प्रेमाची जाणीव करून दिली...तुला माहितेय ना माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता...तो तुझ्यामुळे झालाय"....रोहनने हलकेच जुईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, जुई, मला माहित आहे हे सगळं तुझ्यासाठी अनपेक्षित आहे...No worries...तू आता उत्तर दे असं मी म्हणणार नाही...तू विचार कर आणि मला सांग...तुझं उत्तर काहीही असो मी तुझी मैत्री सोडणार नाही...

  अजूनही जुई शांत होती...तिने आपला हात सोडवला...तिने रोहनच्या डोळ्यात पाहिले...तिच्या डोळ्यात अश्रू होते...ती म्हणाली, रोहन, माझा विचार सोडून दे...मी तुझ्या प्रेमाला न्याय नाही देऊ शकत...नियतीने आपल्याला सोबत आणलं आणि आपली मैत्री झाली, हेच खूप आहे...पण यापुढे मी नाही जाऊ शकत...i am sorry..."

   रोहनला जुईवरील प्रेमाची जाणीव होण्याच्या खूप आधीपासूनच जुईच्या मनात रोहनविषयी feelings होत्या...पण तिने त्याला कधीच या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही...ती मित्रत्वाच्या नात्याने त्याला भेटत असे, बोलत असे...एकदा जुई कॉलेजला यायला निघाली तेव्हा तिला अचानक चक्कर आली...गाडीवरून पडली ती...रस्त्यावरच्या लोकांनी तिला घरी पोचवलं...तिच्या घरच्यांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं..औषध वगैरे घेऊन ती घरी आली...तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचा mobile हरवलाय...कदाचित रस्त्यात पडला असणार...पुढचे काही दिवस तिला सतत डोकेदुखी, चक्कर, चालताना तोल जाणे अश्या गोष्टी होतं होत्या...तिला कॉलेजलाच जायला जमलं नाही...आणि mobile नसल्यामुळे कोणाला कळवताही आलं नाही...ती अशक्त झाली होती...डॉक्टरकडे सतत जावं लागायचं...

      जुईच हे बोलणं ऐकून रोहन काहीसा दुखावला..पण त्याने मनाची तयारी केली होती...तो काहीच न बोलता तसाच उभा राहिला...हातातली ring ठेवत जायला निघाला तेव्हा जुईने त्याला थांबवलं...रोहन, मला brain tumor आहे...माहित नाही किती दिवस जगेन...खरंतर मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं होतं रे...भरपूर जगायचं होतं...पण आता ते शक्य नाही...हो, मी पण खूप प्रेम करते तुझ्यावर...तुला शब्दात सांगू नाही शकत इतकं...खूप आधीपासून...पण बघ ना, नियतीचा खेळ...आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी इतकं प्रेम केलं पण ते निभावण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही...कळलंच नाही कधी गुंतत गेले तुझ्यात...तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी सोनेरी क्षण आहे...ते प्रत्येक क्षण मी माझ्या हृदयात जपून ठेवले आहेत ", ती हुंदके देत देत बोलत होती...बोलायलाही नीट जमत नव्हतं तिला...अडखळत बोलत होती..रोहनने तिच्याकडे पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली....दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सगळे मित्र अवाक होऊन पाहत होते...कोणालाच जुईच्या आजाराबद्दल माहित नव्हते...

      पार्टी नंतर सगळे आपापल्या घरी गेले...जुईबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटत होतं...कोणीच काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतं... रोहनने जुईला घरी सोडलं...एवढा वेळ कोणीच काही बोललं नाही...

     जुई घरी आली...ओक्सबोक्शी रडू लागली...झालेला सगळा प्रकार तिने आईला सांगितला...

"आई, रोहनने prapose केलं मला....आणि मी नाही म्हणाले त्याला...खरं ऐकल्यावर तो काही न बोलता निघून गेला... काय चालू असेल त्याच्या मनात..तो सोडून जाईल का ग मला...इतके दिवस तो नव्हता सोबत तेव्हा त्याच्या आठवणींनी छळलं आणि आता त्याच गप्प बसणं त्रास देतंय...

    इकडे रोहनची अवस्था काही वेगळीच होती...त्याने मनाशी काहीतरी ठरवले होते... कॉलेजची परीक्षा जवळ आली होती...त्याने परीक्षेची तयारी चालू केली...जुई देखील तिला जमेल तसं आपली तब्येत सांभाळून अभ्यास करायची...काही दिवस दोघांचा काहीच contact नव्हता...जुईला कळून चुकले रोहन आपल्याला विसरला...बरंच झालं...वरवरून जरी ती दाखवयाची की तिला रोहनची आठवण येत नाही पण आतून ती पूर्णपणे त्याच्याच विचारात असायची...तिच्यावर उपचारपण चालूच होते..अश्यातच परीक्षा संपली...

     काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला...दोघेही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले होते...जुईला अजून शिकायचं होतं...पुढचे शिक्षण घेण्याचे ठरवले...या काळात जुईला कळलं की रोहनला नोकरी लागली...ती खूप खुश झाली...चला,रोहन आपल्या मार्गावर लागला...कधीतरी तिला प्रश्न पडे की रोहनला माझी आठवण येत असेल का...किती दिवस झाले त्याला पाहिलं नाही... त्याचा आवाज नाही ऐकला या विचाराने अश्रू गाळत बसायची...

      8-9 महिने उलटले...जुईची प्रकृती खालावत चालली होती...दरम्यानच्या काळात तिचे operation झाले..पण तिची प्रकृती सुधारत नव्हती...तिची दृष्टी कमी झाली होती...बोलताना त्रास होतं होता..तिला सतत कोणीतरी सोबत लागायचं..आधारासाठी.....जुईचा वाढदिवस आला होता...सगळ्यांनी ठरवले होते...तिचा वाढदिवस साजरा करायचा...जसा रोहनने केला होता...तिला surprise द्यायचं...

       वाढदिवसाच्या दिवशी तिला सर्वकाही आठवत होतं...रोहन...कुठेस तू...तिच्या डोळ्यात पाणी तरळलं...इतक्यात सगळे आले...cake,gifts आणि बरंच काही घेऊन...तिला आश्चर्य वाटलं....ती आवरायला गेली...आईने तिची तयारी करून दिली.. ती आली...आईने तिचं औक्षण केलं...ती cake कापणार इतक्यात तिचं लक्ष दाराकडे गेलं...कोणीतरी उभं होतं...ती व्यक्ती जवळ आली...

रोहन....तिच्या तोंडून निघालं....जुईला विश्वास बसत नव्हता...रोहन तिच्याजवळ आला..त्याने तिला मिठी मारली...रोहनने तिला surprise दिलं आणि पुन्हा त्याने तिला विचारले, लग्न करशील माझ्याशी????

सगळेच अवाक होऊन बघत होते...जो रोहन इतके महिने कोणाच्याच संपर्कात नव्हता, आज तो आला आणि त्याने जुईला लग्नासाठी विचारलं...

जुई, तुला वाटलं असेल मी तुझ्या आजारपणाबद्दल ऐकून तुला सोडून गेलो...एकटीला सोडून गेलो...नाही ग...मी गेलो खरं...ते स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी...तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला घरी सोडून गेलो तेव्हा एक निर्णय घेतला होता... लग्न करेन तर तुझ्याशीच...जगातली सगळं सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेन....त्यासाठी मला स्वतःला काहीतरी बनाव लागेल...इतके दिवस स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवलं...परीक्षा दिली...पास झालो.. एका कंपनीमध्ये job ला लागलो...आणि बघ...आज मी आलो....तुला माझी बनवायला....जुई, मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय...आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन...बोल, करशील माझ्याशी लग्न...आजही जुई शांतच होती...आजही अनपेक्षित घडत होतं...ती रडत होती.आनंदाश्रु होते ते....

       रोहन आणि जुईचे लग्न झाले...जुईच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता...सतत तोल जायचा तिचा..रोहन तिची खूप काळजी घेई..तिच्याशी खूप गप्पा मारायचा...तिला काय हवं नको ते बघायचा...रोहनच्या घरच्यांचा विरोध होता दोघांच्या लग्नाला...पण दोघांच्या प्रेमापुढे विरोध काय टिकणार...

      तिचे उपचार सुरु होते...तिच्या मेंदूची गाठ पूर्णपणे निघाली नव्हती.. डॉक्टरांनी दुसरे operation करायला सांगितले आणि 2-3 महिन्यांनी gamma Rays ची treatment घावी लागणार होती...

     Operation चा दिवस उजाडला...जुईला operation theatre मध्ये नेण्यात आले...तिचं operation पण झालं...रोहन खूप खुश होता...आता जुई पूर्णपणे बरी होणार... पण नियतीला हे मंजूर नव्हतं...

   जुई नाही वाचली...ती गेली...रोहनला कायमच सोडून...

   आज 2 वर्ष झाली...जुईला जाऊन...पण रोहनच प्रेम अजूनही तितकंच आहे...किंबहुना ते दिवसागणिक वाढत गेलं...तो दर वर्षी तिचा वाढदिवस साजरा करतो...जसा तिला आवडायचा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance