sonali chandanshive

Others

3  

sonali chandanshive

Others

भाकरीचा तुकडा एक अंधश्रद्धा

भाकरीचा तुकडा एक अंधश्रद्धा

4 mins
359


    आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रीतीरीवाज, परंपरा यांचा एक अनमोल ठेवा आहे. आणि आजही ह्या साऱ्या रीतीरीवाज आपण नियमाने काटेकोरपणे पाळतो. पण आता बदलत्या जीवनशैली नुसार काही रीतीरीवाज बंद करणे गरजेचे आहे कारण ह्याच रीती आज अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.पण यामध्ये चूक आपलीच आहे कारण आपल्याला त्या रीतीरीवाजाच्या मागचे वैज्ञानिक कारणेच माहिती नाहीत त्यामुळे ती रीत आजही आपण पाळतो. अशीच एक रीत भाकरीचा तुकडा ओवाळून टाकून नजर / दृष्ट काढायची या रीतीचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊ या.


       फलटणची देविका पुण्याला इंजिनिअरिंगला अँडमिशन घेते. तिथे तिची ओळख अमेयशी होते अमेय हा देविकाचा एक वर्षे सिनयर होता. ओळखीची मैत्री आणि मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर होते. पुढे दोघांचेही इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतात पण अमेय हा दुसऱ्या जातीचा असल्यामुळे देविकाच्या घरातून विरोध होतो. देविका खूप समजावते आई- वडिलांना पण पण ते आपल्या विरोधावर ठाम असतात. त्यामुळे शेवटी देविका पळून जाऊन अमेयशी लग्न करते.


      पळून जाऊन लग्न केल्यामुळे देविकाचे आई वडील तिच्याशी संबंध तोडतात. लग्नानंतर देविका आणि अमेय दोघेही पुण्यातच स्थायिक होतात. दोघांचा संसार खूप सुखाचा आनंदाचा चालू असतो अशातच लग्नानंतर दोन वर्षानी त्याच्या सुखी संसाराच्या वेलीवर फुल उमलते. मुलगी होते त्यांना. देविका अमेयबरोबर सुखी आहे हे तिच्या आई-वडिलांना जेव्हा समजते तेव्हा त्यांचा तिच्यावरचा राग हळूहळू कमी होऊ लागतो त्यातच देविका ला मुलगी झाल्याचे कळताच राग पूर्ण पणे मावळतो आणि तिचे आई-वडील लगेच धावत पुण्याला येतात डिलिव्हरी नंतर देविकाला विश्रांतीसाठी माहेरी घेऊन जाण्यासाठी. जावई म्हणून अमेयचाही मानपान करायचा असतो म्हणून ते अमेयला सुध्दा दोन- तीन दिवसांसाठी घेऊन जातात.


        फलटण ला गेल्यावर देविकाची आई देविकाला आणि अमेयला बाहेर दारातच दोन मिनिटे थांबण्याची विनंती करते.देविकाच्या हातात बाळ सुध्दा असते. तेवढ्यात देविकाची काकू दृष्ट काढण्यासाठी भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन येते आणि वहिनी औक्षण करण्यासाठी आरतीचे ताट घेऊन येते.

       देविकाची काकू देविका,अमेय आणि बाळाची दृष्ट काढण्यासाठी भाकरीचा तुकडा ओवाळत असते तोच 

"हे काय करत आहात तुम्ही ?असे बोलत अमेय मागे सरकतो."

"अहो जावईबापू , ती दृष्ट काढत आहे, लग्नानंतर पहिलांदाच तुम्ही येत आहात त्यामुळे असे दृष्ट काढायची असते हि एक रीत आहे" देविकाची आई अमेलला म्हणते.

"मामी असे भाकरीचा तुकडा ओवाळून टाकण्यामागे एक वैद्यकीय कारण आहे दृष्ट काढणे वैगरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत" अमेय देविकाच्या आईला सांगतो.

"जावईबापू पूर्वी पासून चालत आलेली रीत आहे आपली , काहीतरी शास्त्र असेल म्हणूनच आपले वडिलधाऱ्यांनी आपल्याला हा वारसा देवून गेले असतील ना ,आता ती अशी अचानक बंद केली तर काहीतरी अघटित घडेल , दृष्ट काढून घ्या माझी विनंती आहे तुम्हाला" देविकाचे वडील अमेय ला म्हणतात.

"मामा काही अघटित घडणार नाही, हिच मानसिकता अंधश्रद्धेला वाढवते या रीतीमागचे खरे कारण मी सांगतो सगळेजण ऐका. पूर्वी प्रवास करण्यासाठी आतासारखी वाहतुकीचे साधने नव्हती चालत प्रवास करावा लागत असे किंवा पालखी, घोडागाडी असे साधने होती तुम्हाला माहित असेलच , त्याचबरोबर पूर्वी तेल, तुप असे पदार्थ ही लोक भरपूर खात होती आतासारखी डायटिंग चे खुळ त्या काळी नव्हते आणि त्याबरोबरच पूर्वी आतासारखी हाँटेलसु्द्धा नव्हती त्यामुळे प्रवासादरम्यान जेवण करण्यासाठी आपण घरातून जेवण बांधून घेत होतो.


आता ह्या प्रवासादरम्यान आपल्या जवळ असणाऱ्या त्या अन्नाच्या वासाने माशा, जीवजंतू येत असत तेव्हा ते लोक घरी पोहचल्यावर एका भाकरीच्या तुकड्यावर तेल, तूप, चटणी टाकून तो तुकडा त्या व्यक्तीवरून ओवाळून टाकत त्यामुळे आपल्याभोवती ज्या माशा, जीवजंतू होते त्यांना त्या उघड्या भाकरीवरचा तेलाचा, तुपाचा, चटणीचा वास येतो आणि ते त्या तुकड्याकडे आकर्षित होतात. 


आता त्या भाकरीच्या तुकड्यावर तेल, तुप, चटणी टाकणे बंद झाले आहे. पण पूर्वीचे लोक टाकायचे कारण ती त्यावेळी गरज होती." अमेय खूप शांतपणे हे सारे समजावून सांगत असतो. तेवढ्यात देविका पण मध्ये बोलते

"हे खरे कारण आहे आई आणि हे कारण मी तुला आधी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तु कधी माझे ऐकूनच घेत नव्हती, आता प्रत्येकवेळी प्रवासातून आल्यावर असे भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणे बंद झाले आहे पण तरीसुद्धा लग्न झाल्यावर जेव्हा नवरी पहिलांदा येती-जाती ला येते तेव्हा ही रीत आजही पाळली जाते. ती सुद्धा बंद होणे गरजेचे आहे आता."


देविकाचे हे बोलणे ऐकताच अमेय पुन्हा अजून सविस्तर सांगतो "नव वधू-वर येतात- जातात किंवा शुभकार्यच्या वेळी आपल्याबरोबर शिदोरी असते हि शिदोरी खुप तेलकट- तुपकट असते त्यामुळे तर ह्या शिदोरीच्या वासाला तर लगेच माशा, जीवजंतू आकर्षित होतात म्हणून आजसुद्धा नव वधू- वर यांची ही अशा पध्दतीने दृष्ट काढण्याची रीत चालू आहे." 

"निदान बाळाची तरी काढू दे" देविकाची आई म्हणते

"नको;अग आई आता मस्त पैकी AC गाडीतुन आपण आलो आहोत शिवाय सोबत कोणते आँईली पदार्थ पण नाही आणि असले तरी ते गाडीतच सुरक्षित असले असते मग आता का काढायची दृष्ट " देविका म्हणते.

"लग्नानंतर पहिलांदा माहेरी येत आहे तु शिवाय जावईबापू आणि माझी नात पण आज पहिलांदाच माझ्या घरात येत आहेत मग असेच कसे घ्यायचे घरात तुम्हाला" देविकाची आई थोड्यांशा नाराजीच्या स्वरात बोलते.

"मामा-मामी खरंच हे हि रीत पाळणे सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या भावनांचा आदर आहे मला हवे तर फक्त औक्षण करून आमचे स्वागत करा मग तर झाले."अमेय म्हणतो.


त्यानंतर देविकाची आई स्वतः त्या तिघांचे औक्षण करून त्यांना घरात घेते.


Rate this content
Log in