sonali chandanshive

Inspirational Children

3.4  

sonali chandanshive

Inspirational Children

सुरूवात नव्या मैत्रीची

सुरूवात नव्या मैत्रीची

6 mins
286


मैत्री हे नाते सर्वांच्याच खूप जवळचे असते. त्यामुळे ह्या बदलत्या काळानुसार आई-वडिलांना मुलांशी मैत्री करून त्यांना निसंकोच पणे सगळ्या गोष्टींची समज करून देणे खूप महत्त्वाचे असते .पण जेव्हा आई-वडील त्यांना समजून सांगायला संकोच करतात तेव्हा त्यांचा त्रास हा मुलांना (मुले-मुली दोन्ही) आपल्या कथेतील नायिकेला(स्वानंदी)अशाच प्रकारे एका त्रासाला समोरे जावे लागते.


       स्वानंदीची मोठी बहीण शहाणी झाली.त्यानंतर तीला लांब बसविले,अथंरून-पाघंरून वेगळे दिले, पाणी वेगळे दिले, जेवण ही लांबून वाढले जात होते, दिवसभर ती एका कोपर्यात बसून राहायची.स्वानंदीला तीच्या आईने ठणकावून सांगितले होते दिदि जवळ जायचे नाही तीला शिवायचे नाही म्हणून पण स्वानंदी ला हे कळत नव्हते की दिदि ला असे का वागवत आहेत त्यामुळे ती सारखी आई ला विचारायची की काय झाले आहे दिदि ला तेव्हा आई तीला दिदिला कावळा शिवला आहे असे सांगायची.त्यानंतर दर महीन्याला हा नित्यक्रम चालू झाला आणि प्रत्येक वेळी स्वानंदी हा प्रश्न विचारायचीच आणि तीला प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळायचे.आणि या दरम्यान पाळी हा शब्द तीच्या कानावर सारखा पडत होता.


         दरवर्षी उन्हाळाच्या सुट्टीत स्वानंदी तीच्या आजोळी म्हणजेच आईच्या माहेरी जात असे तीच्या आजोबांचा म्हणजेच आई च्या वडीलांचा वाढदिवस मे महीना मध्ये म्हणजेच उन्हाळा सुट्टी मध्ये असतो त्यामुळे स्वानंदी ची मावशी(उषा) सुध्दा दरवर्षी येत असते.स्वानंदी चे दोन मामा तीथेच असतात.सुट्टी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे लोक एकत्र जमतात त्यामुळे दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने घरी सत्यनारायण ची पूजा केली जाते आणि स्वानंदी ची आई ,मावशी आणि दोन मामा असे चौघे भावंडे मिळून त्यांचा वाढदिवस मोठा साजरा करतात.


         या वर्षी योगायोगाने स्वानंदी च्या मोठ्या मामीला (वर्षा) आणि स्वानंदीच्या मावशीला (उषा) वाढदिवसाच्या दिवशी पाळी आलेली असते त्यामुळे दोघींना लांब बसावे लागते आणि तेव्हा नेहमीप्रमाणे स्वानंदी आणि बरोबरीच्या सगळ्याच मुलांना (मुले -मुली) कावळा शिवला असेच सांगितले असते. सत्यनारायण पूजेसाठी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जवळचे पाहूने देखील यायचे.तेव्हा येणाऱ्या पाहून्यामध्ये असणार्या बायका वर्षा आणि उषा यांची चौकशी करायच्या तेव्हा मात्र घरातील मोठे (स्त्रिया) त्यांना पाळी आली असे सांगात होते आणि या बद्दल थोड थोडीफार चर्चा करत होते. या वेळी अनेक वेळा स्वानंदी च्या कानावर पाळी आली हा शब्द येत होता.


       मला कावळा शिवला आहे असे सांगतात आणि हे मोठे पाळी आली असे का बोलतात?,पाळी येणे म्हणजे नेमके काय असते?ती कशी येते? मला ते कावळा शिवला असे खोटे का सांगतात?असे अनेक प्रश्न स्वानंदीला पडतात .


       ती तिच्या आईला जाऊन विचारते पाळी म्हणजे काय? ती कशी येते?


"तू कुठे ऐकला हा शब्द?" तिची आई रागात विचारते.


"मी नेहमीच ऐकते हा शब्द तुम्हा मोठ्यांकडून सांग ना आई पाळी म्हणजे काय असते आणि तु मला कावळा शिवला असे खोटे का सांगते"? स्वानंदी आईला म्हणते. तेव्हा तिची आई तिला खूप रागावते,"तुला किती वेळा सांगितले आहे मोठ्याचे बोलणे ऐकत जाऊ नकोस. "तिचा कान धरून आई तीला रागावत बोलते.


"आई गं सोड ना खूप दुखतो कान, मी नाही मुद्दाम ऐकले तुम्ही सगळे बोलताना मी तीथेच असते तेव्हा ऐकू येते.स्वानंदी बोलते.


"आता या पुढे आम्ही मोठे बोलत असताना तिथून निघून जायचे, तिथेच ऐकत बसायचे नाही, आणि हे असले प्रश्न तुला काय करायचे आहेत आज विचारलीस ते ठिक आहे या पुढे जर कधी कोणालाच विचारलीस तर खुप मार देईन मग"स्वानंदीला रागवत तीची आई बोलते.


       दोन-अडीच महीन्यानंतर स्वानंदी शाळेत गेल्यावर ती मोठी होते. तिच्या अंगावरच जे जाऊ लागते (ब्लडींग होते). तिचे सगळे कपडे त्याने भरतात. कपड्यावर मोठेमोठे डाग पडतात आणि पांढऱ्या रंगाच्या गणवेशामधून ते स्पष्ट दिसू लागतात. वर्गात सगळ्या मुली आणि मुले सुद्धा तिला सांगू लागली तुझ्या कपड्याला सगळे रक्त लागले आहे म्हणून. मला कुठे काही लागले नाही तर हे रक्त कसे यायला लागले याचा विचार ती करू लागली आणि आता हे रक्ताने गहाण झालेले कपडे पाहून घरी आई मारेल याची तीला भीती वाटू लागली. वर्गात बऱ्याच मुली ह्या वयात आलेल्या होत्या त्या तिला सांगायचा प्रयत्न करतात पण ती काहीच न ऐकता रडू लागते तेव्हा तिच्या मैत्रिणी लगेच लेडीज स्टाफरूममध्ये घेऊन जातात. शाळेतील सगळा लेडीज स्टाफ इमर्जन्सी म्हणून एक पॅडचे पाकीट स्टाफरूममध्ये ठेवतात. तिला एक पँड देतात.


"हे काय आहे मॅडम" स्वानंदी विचारते. कदम मॅडम तेव्हा तिला समजावून सांगतात. आता आशा आवस्थेत तीला एकटीला घरी कसे पाठवायचे म्हणून तीच्या आई ला तिचा एक ड्रेस घेऊन शाळेत बोलावून घेतात. स्टाफरूममध्ये अजून 4 मँडम असतात त्यांची आपापसात चर्चा चालू होते हिला काहीच कसे माहीत नाही तिचा ड्रेस किती भरला आहे. हिच्या आईने हिला काहीच कसे सांगितले नाही असे ते आपापसात बोलत असतात. 


"जाधव मॅडम तिला डेट म्हणजे काय हेच माहीत नाही आणि हे ब्लडींग का होत आहे हे सुद्धा माहीत नाही म्हणून तर ती घाबरून रडत आहे म्हणूनच तिला इथे घेऊन आल्या बाकीच्या विद्यार्थीनी "कदम मॅडम म्हणतात.


स्वानंदी फ्रेश होऊन आल्यानंतर तीला जाधव मॅडम विचारतात" तुला पाळी, एम सी म्हणजे काय काहीच माहित नाही का?"


"एम सी म्हणजे काय माहीत नाही पण पाळ येणे माहीत आहे."


"अगं मग तुला आता कसे कळाले नाही पाळी आलेली तुझे कपडे बघ किती भरले आहेत तरी तुला कळले नाही का पाळी आलेली", कदम मॅडम विचारतात.


म्हणजे? स्वानंदी प्रश्नानार्थक नजरेने विचारते कारण तिला पाळी येणे म्हणजे कावळा शिवणे हेच माहीत असते.


"अगं तुला पाळी येणे माहीत आहे तर तुला आता कसे कळाले नाही पाळी आलेली ?"कदम मॅडम पुन्हा विचारतात.


"एक मिनिट मॅडम तिला आधी पाळी म्हणजे काय हे विचारा मला वाटते तिला काहीतरी दूसरेच माहीत आहे भावे मॅडम म्हणतात आणि स्वानंदीला विचारतात काय आहे पाळी म्हणजे?


"पाळी म्हणजे कावळा शिवणे "स्वानंदी म्हणते. तिचे हे उत्तर ऐकून सगळ्या मँडमला नवल वाटते.


"तुला हे कोणी सांगितले?"भावे मँडम विचारतात. आईने सांगितले स्वानंदी म्हणते. हे तिचे उत्तर ऐकून जाधव मँडम शांत होतात आणि एकाकी होऊन विचार करतात 


"जाधव मँडम असे एकदम शांत का झालात तुम्ही कसला एवढा विचार करत आहात.? भावे मॅडम विचारात.


"विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही भावे मॅडम, आता पहा ना ही वयात आलेली आहे, वयानुसार विचारांची आणि समजून घेण्याची प्रगल्भता हिच्यात आलेली असणारच पण तरीसुद्धा हिला हिच्या आईने काहीच सांगितले नाही. ही एकच मुलगी नसेल अजून अशा कितीतरी मुली असतील ना." जाधव मँडम म्हणतात. तेवढ्यात स्वानंदी ची आई येते.


"नमस्कार मॅडम " स्वानंदी ची आई म्हणते


नमस्कार, या बसा, आधी तिचा ड्रेस द्या तिला,पूर्ण ड्रेस भरला आहे तिचा"कदम मँडम म्हणतात. स्वानंदी ड्रेस घेऊन चेंन्ज करायला जाते.


"तिचे वय किती आहे हो ?जाधव मॅडम स्वानंदीच्या आईला विचारतात.


"चौदावे चालू आहे मॅडम"स्वानंदीची आई सांगते.


"चौदावे चालू आहे तर तिला तुम्ही एमसीविषयी काहीच कसे सांगितले नाही. समजून घेण्याचे वय आहे तिचे" जाधव मॅडम म्हणतात.


"मँडम आता ह्या विषयावर कसे सांगायचे तुम्हीच सांगा आणि असे या विषयावर सांगणे बोलणे बरे दिसते का? पाण्यात पडले की बरोबर पोहता येते तसे ज्या त्या वेळी जे ते घडले तर ते ही आपोआप कळतेच की आता आपल्या कोणी सांगितले का? पण नंतर समजलेच ना ."स्वानंदी ची आई म्हणते.


"आता आपल्याला कोणी सांगितले नाही म्हणून आपण ही सांगायचे नाही असे कुठे आहे का?आता काळ बदला आहे. आताच्या काळात आईला मुलीची मैत्रीण होणे गरजेचे आहे. आई म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून समजून सांगायला पाहिजे. तुम्ही तिची अवस्था पाहिली का? ती खूप घाबरली आहे, तिचे कपडे सगळे भरले आहेत वर्गात मुलांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली. आता तिची आताची ही अवस्था चांगली होती का तिला सगळे सांगणे चांगले होते." जाधव मॅडम म्हणतात.


"बरोबर आहे मॅडम तुमचे मी सांगायला हवे होते चुकले माझे."स्वानंदी ची आई म्हणते.


"आम्ही अजून तिला काही सांगितले नाही आता तुम्हीच तिला तिची मैत्रीण होऊन समजावून सांगा सगळे." कदम मॅडम म्हणतात.


"हो मॅडम नक्की, येऊ आता " स्वानंदीची आई म्हणते. स्वानंदीला तिची आई घरी घेऊन जाते.


     स्वानंदी घरी गेल्यानंतरही स्टाफरूममध्ये सगळ्या मॅडमची या विषयावरच चर्चा चालू असते. तेव्हा जाधव मॅॅडमला एक कल्पना सुचते. शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईचा पालक मेळावा घेऊन आणि त्यांना समजावून सांगायचे की जशा मुली वयात येतात तसे त्यांच्या आईने त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे आणि त्यांना मैत्रीण म्हणून मनमोकळेपणे निःसंकोच होऊन सांगितले पाहिजे. ही सध्या काळाची गरजसुद्धा आहे.


जाधव मॅडमची कल्पना सगळ्या मॅडमला आवडते आणि ते अशाप्रकारे पालक मेळावा घ्यायचा ठरवितात. 


~~~~~~~~~~~~~~~~~~

सोनाली चंदनशिवे

सोलापूर


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational