Shrikant Dixit

Fantasy Others

2  

Shrikant Dixit

Fantasy Others

बंध रेशमाचे

बंध रेशमाचे

2 mins
180


इतिहासाची पाने चाळता चाळता आठवांचे पुस्तक 📖कधी बनलं हे कळलेच नाही..अन् ती वेळ आली..हो चंदेरी क्षणांची!!.. पहाता पहाता ही नात्याची विण 💕💕अधिकच घट्ट झाली. हो हा एक रुपेरी अध्याय अगदी ह्रदयस्थ ❣️जपून ठेवावा..कधीच न विसरण्यासाठी..!! या अध्यायातील प्रत्येक पान हे सुवर्णाक्षरानी लिहून ठेवलंय.. चार ओळी म्हणाव्या वाटतात...


नाते तुझे माझे

एक एक क्षण 

गुंफुनिया सखये

जगलो मनोमन


आठवते ती पहिली वहिली भेट..!! दारातील पारिजातकाच्या झाडाला घट्ट बिलगून उभी होतीस. ती धवल केशरी फुले जणू तुझ्यावर वर्षाव करतच होते. परिधान केलेले गुलाबी वस्त्र देखील त्या फुलांनी भारावून गेले होते. हरणाक्षी नयन मात्र माझा वेध घेत होते. हो दूरूनच पाहिले नकळत ती पापण्यांची हालचाल मनाला भुरळ घालून गेली. हो.. पाहूनी मजला अचंबित झाली होतीस..!! गोर्या गालावरून जास्वंदी वार्याच्या झोक्याबरोबर मोरपीस 🦚फिरावे तसे चाळे करत होते. अलगद जास्वंदीचा रंग गालावर कधी उतरला हे समजलं नाही गं!!..म्हणतात ना...


"First impression is last impression."


खल्लास...!! मनापासून आवडलीस..समोर जाऊन उभारलो मी पण तू भानावर असशील तर ना!!.. गेटवर हाताचा कोपरा ठेऊन अशी थाटात उभा होतीस ना.. काय सांगायचे??.. 


"शशशूककक शशशूककक" असं म्हणायची वेळ आली..हरवून गेली होतीस माझ्यात!!.. एकदम भानावर आलीस चेहरा गोरामोरा झाला होता. लगेच घरात धूम ठोकलीस..


मग बासुंदी पुरीचा बहारदार बेत.. आता या रौप्यमहोत्सवी वर्षात समजले सासूबाईंनी बासुंदी पूरी का खायला दिली... नातं आपले मधुर व घट्ट रहावे ही प्रांजळ इच्छा होती. जरी माझी मुलगी कधी रागाने पुरीसारखी फुगून बसली तरी तिला समजून घ्याव.. 

पण काही म्हणा...


पहिल्याच भेटीत नजरेला नजर भिडली

नजरेतच नजर मिसळून गेली..

गळ्यात माझ्या हार घालूनीया 

हारासम बिलगून गेली..


मग या सोनपावलांनी माझ्या आयुष्यात वाजत गाजत आलीस. हो तो अविस्मरणीय सोहळा... अगदी आयुष्याच्या दारावर तोरण बांधून साजरा केला... ती मोहक... तो सुगंध, ते हास्य, तो आनंद सारंच कसं माप ओलांडताना दारातून आत घेऊन आलीस. तुझं हसणं म्हणजे शुभ्र मोत्यांचे मनोहारी दृष्य! एक एक पान पलटता एक एक पैलू साकारत असताना या संसाराच्या रथाची जीवनसंगिनी म्हणून उत्तम भूमिका पार पाडली आहेस. मग हा संसाराचा रथ हाकताना अनेक समस्येला जोडीने सामोरी गेलीस. संसाराच्या रोपट्यावर एक सुंदर गुलाब 🌹फुलून आला.. बंध रेशमाचे अधिकच घट्ट झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy