Rutuja kulkarni

Romance Fantasy Thriller

3  

Rutuja kulkarni

Romance Fantasy Thriller

छेडल्या तारा - भाग ४

छेडल्या तारा - भाग ४

7 mins
449


'टीक.. टीक..!!', करत घड्याळाने तीन वाजल्याचा टोल दिला आणि पुन्हा एकदा मिहिकाची विचारांची तंद्री भंग पावली. 

"छे... छे... हे आजं कायं होतं आहे मला सकाळपासून?? मी एवढा का विचार करतेयं आजं? खरेतरं हे गेल्या दोन वर्षांपासून असचं तर आहे वरूण आणि माझं नातं, पण मगं आज का एवढा त्रास होतोयं",  अशी कैक प्रश्नांची साखळी आजं मिहिका च्या मनांला अस्वस्थ करतं होती, तिला उत्तरे मागतं होती या प्रश्नांची. मिहिका ला जणू आजं श्वास गुदमरतो आहे, असेचं जाणवतं होते, खूप त्रास होतं होता. म्हणून चं ती पटकन उठली बेडवरून आणि बेसीन मध्ये जाऊन जोरजोरात तोडांवर पाणी मारले आणि हॉल मध्ये सोफ्यावर येऊन पंख्याखाली बसली. डोळे बंद करून तिने एक दीर्घ श्वास घेतला. पाच ते दहा मिनिटे ती तशीचं सोफ्यावर बसली होती. मगं ती हळू चं वरूण ज्या दुसर्‍या बेडरुम मध्ये बसला होता, त्या बेडरूम च्या दरवाज्याजवळ गेली आणि आवाज होणार नाही अशा पद्धतीने दरवाजा तिला दिसेल असा उघडला. लॅपटॉप वर क्लायंट शी बोलणारा खुर्ची मध्ये बसलेला वरूण तिला दिसला. काही चं न बोलता ती तशीचं मागे फिरली,आणि पुन्हा सोफ्यावर येऊन बसली.    


"मिहिका... हा चं तो वरूण आहे का गं तुला भेटलेला??आणि ही चं ती कॉलेजमधली मिहिका आहे का बिनधास्त असणारी??",  राहून राहून तिचे मन तिला सतत हे प्रश्न विचारतं होते.आणि मिहिका शांत बसून या शांततेत आणि तिच्या एकटेपणातं त्याचे उत्तर शोधतं होती. पण तिला काही केल्या त्याचे उत्तर मिळतं नव्हते. आजं खूप एकटे वाटतं होते तिला प्रथम चं. म्हणून लॅपटॉप वर काहीतरी पहावे या उद्देशाने तिने तिचा लॅपटॉप उघडला. पेन ड्राईव्ह लावून ती त्यामध्ये काही फिल्म्स शोधतं होती, तेव्हा त्यामध्ये तिला, वरूण आणि तिचे चे काही फोटोज दिसले लग्नानंतरचे. आणि सहज तिचा हातं एका फोटोवर येऊन रेंगाळला. तो फोटो मालदीव मधला होता. आणि त्या फोटोकडे पाहून तिला ते लग्नानंतर चे सुरूवातीचे दिवस आठवले आणि एक सोनेरी आठवणींचा तो नजराणा तिच्या डोळ्यांसमोरून जाऊ लागला.  लग्नाच्या आधी आणि लग्नामुळे दोघांची ही आँफिस ची कामे पेंडिंग राहिली होती. तरीही लग्नानंतर आँफिस ची काही कामे पूर्ण करून तर काही कामे अर्धवट राहिलेली असताना ही वेळ काढून लग्नाच्या पंधरा दिवसानंतर पण ते मालदीव ला फिरायला गेले होते. खरेतरं तो काळ वरूण च्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा होता, तरीही वरूण ने वेळ काढला होता. दोघांनीही आयुष्यभरासाठी तिथे कैक अशा आठवणी जमा केल्या होत्या. कित्येक अविस्मरणीय असे क्षण आणि दिवस होते ते खरोखर. मालदीव वरून आल्यावर जरी दोघेही कामामध्ये व्यस्त झाले होते, तरीही दोघांनी ही छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचले चं होते. वरूण, आँफिस आणि घरची सगळ जबाबदारी सांभाळून मिहिका हे सर्व करतं होती. वरूण च्या आई बाबांचे मिहिका शिवाय पान ही हलत नव्हते, आणि गार्गी आणि मिहिका तर खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. हसत खेळत लग्नाचे ते वर्ष त्यांच्या प्रेमाने फुलले होते. दिवस, महिने आणि बघता बघता त्यांच्या लग्नाला एक वर्ष ही होऊन गेले होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या दिवशी वरूण ने मिहिकाला नवी कार भेटं दिली होती. सर्रकन एक वार्‍याची झुळूक तिला स्पर्शून गेली आणि ती स्वतःशीच,     


"छे.. पुन्हा विचार.... पुन्हा आठवणीतं रमले मी..", असे म्हणतं मिहिका फोटोंवरून हातं फिरवतं क्षणभर हसली आणि तिला कळायच्या आतं, डोळयांतून आसवे तिच्या चेहर्‍यावर आली.  'हे फोटोज म्हणजे काळं असतो, तुम्हाला एकाचं वेळी तुमच्या भूतकाळातील, आणि वर्तमान काळातील आठवणींचा एकत्र असा संच देणारा'.. ', हे अगदी खरे आहे याची आजं मिहिका ला प्रचिती आली. म्हणून थोडावेळ तिने त्या अश्रूंना वाटं दिली. नंतर लॅपटॉप बंद करून ती बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली. एव्हाना घड्याळामध्ये संध्याकाळचे सहा वाजले होते. ती स्वयंपाकघरात गेली,जणू वरूण घरात नाही आहे या अविर्भावात चं. तिने तिच्यासाठी तिला आवडते तशी थोडी स्ट्रॉन्ग अशी कॉफी बनवली आणि कॉफीचा वाफाळणारा तो मगं घेऊन ती तिच्या बेडरूम च्या बाल्कनीमध्ये आली. एव्हाना सांजेचे रंग नभांतल्या सूर्यासवे मिहिका च्या मनांवर ही आपली छाप सोडतं होते. आजं कित्येक दिवसांनी जणू तिने हा सूर्य पाहिला होता. नभामध्ये घिरट्या घालणारे ते पक्षी पाहून तर तिला तिचे आजोळ आणि लहानपण आठवले. सहजं तिचे खाली लक्ष गेले तेव्हा, तो गाड्यांनी खचाखचं न भरलेला, ट्राफिक मध्ये न अडकलेला, तो निर्मनुष्य रस्ता जणू आनंदाने उड्या मारतोयं असे चं भासले. ही अशी शांतता कित्येक वर्षात अनुभवली चं नव्हती, या लॉकडाऊन मुळे कित्येक वर्षांनी तिने या शांततेचा आवाज ऐकला होता.   "एरवी जगण्याच्या शर्यतीत धावताना किती कायं कायं हातांमधून निसटून जातं ना.. अगदी या शांततेचा आवाज सुद्धा.. आणि आपण स्वतः सुद्धा. खरचं आजं गिटार वर हातांचा तो रेशमी स्पर्श झाला तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीने मायेने कुशीतं घेतले आहे, असेचं काहीसे तिला भासतं होते. या जगण्याच्या शर्यतीत धावताना जशी ही शांतता निसटून गेली, तशीचं माझी गिटार, जिला मी माझी सावली म्हणायचे ती ही निसटून गेली का या काळाबरोबर, शर्यतीमध्ये धावण्याच्या नादातं?? ", हा प्रश्न मिहिका च्या मनाला हेलावून गेला. बहुतेक हा नभीचा सूर्य मावळताना रंगाच्या छटेसोबत मिहिका च्या एक एक प्रश्नांची उत्तरे चं देतं होता. उत्तरे देता देता तो मावळतीचा सूर्य मिहिका ला भूतकाळात घेऊन जातं होता पुन्हा आणि तिच्य ही नकळतं ती भूतकाळात पुन्हा रमतं होती.


          लग्नाच्या वर्ष आनंदाने सरले. लग्नाच्या वर्षभरानंतर मिहिका ला जॉब मध्ये प्रमोशन मिळाले. शिवायं याबरोबर ती वरूण ला ही त्याच्या कंपनीसाठी मदतं करायची कधी कधी. वरूण ची कंपनी आता यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचली होती आणि आता कामानिमित्त वरूण चे परदेशी दौरे चालू होते. त्यामुळे मिहिका च्या जबाबदारीतं आता अजून भर पडली होती. सुरूवातीला पाच दिवसांसाठी असलेले हे दौरे करून आता वरचेवर वाढू लागले आणि मिहिका मात्र कामाच्या गर्दीमध्ये हळू हळू दिसेनाशी होऊ लागली.खरेतरं मिहिका आणि वरूण च्या प्रेमामध्ये हा असा दुरावा या आधीही वरूण शिक्षणासाठी गेलेला तेव्हा आला होता, परंतु त्यावेळी त्यांची निदान फोन वर तरी भेटं व्हायची. परंतु आता मात्र त्यांची फोन वर ही भेटं व्हायची नाही. जेव्हा मिहिका वरूण ला फोन करायची तेव्हा वरूण कामामध्ये असायचा आणि वरूण जेव्हा फोन करायचे तेव्हा मिहिका सोडून त्याचे सगळ्यांशी बोलणे व्हायचे, आणि कधी मिहिकाशी बोलणे झाले चं तर अगदी मोजके चं व्हायचे, त्यांच्या प्रेमावर दुराव्याने जणू पडदा घातला होता गैरसमजुतीचा वर्ष आणि काळाबरोबर हा गैरसमज अजून चं वाढतं गेला. वरूण परदेशातून आला तरी त्याचे काम चालू असायचे, त्यामुळे मिहिका चिडायची कधी कधी. आणि जेव्हा वरूण ला वेळ असायचा तेव्हा मिहिका कामामुळे थकून झोपलेली असायची. मगं वरूण ला वाटायचे मिहिका ला त्याच्यासाठी वेळच नाही.


दोघांच्या ही मनांत एकमेकांबद्दल अढी निर्माण झाली होती, पण कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हते. वरूण च्या घरच्यांना हे सगळे दिसतं होते म्हणून चं आग्रहाने वरूण आणि मिहिका च्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना दोन दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवले. सुरूवातीला नाही नाही म्हणत दोघेही गेले नाईलाजाने. त्या दिवशी संध्याकाळी आवरून वगैरे दोघेही असचं बाहेर फिरतं होते. तेथे असणाऱ्या जोडप्यांकडे पाहून दोघांनाही त्यांचे सुरूवातीचे दिवस आठवले. मिहिका वरूण ला काही बोलणार ईतक्यात चं वरूण चा फोन वाजला. त्याच्या कपंनीमध्ये सर्व्हर मध्ये प्रोब्लेम झाला होता आणि काही महत्त्वाच्या फाईल डिलीटं झाल्या आहेतं असे त्याला त्याच्या मॅनेजर ने सांगितले आणि लग्नाचा वाढदिवस सोडून ते तसेच आल्या पावली परतं फिरले. मिहिका ला वाटले वरूणला यायचे चं नव्हते, म्हणून मगं तिच्या मनांत अजून गैरसमज निर्माण झाला. त्या रात्री घरी जाताना गाडीमध्ये दोघांचे ही खूप भांडण झाले. वरूण मिहिका ला घरी सोडून तसाचं कंपनी मध्ये गेला. वरूण च्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती त्यांना काही नाही बोलली पण आजं ती प्रचंड दुखावली गेली होती. वरूण ची वाटं पाहतं पाहतं ती झोपी गेली. दुसर्‍या दिवशी मिहिका उठली तेव्हा वरूण बँग भरत होता. त्याला तसे पाहून मिहिका म्हणाली , "तु कुठे निघाला?",   तेव्हा वरूण म्हणाला , "अगं.. तो प्रोब्लेम झाला ना, खूप मोठं नुकसान झालं आपलं म्हणून मी लंडन ला जातोयं, त्या कंपनीकडून डील चे पेपर्स परतं आणायला.",  हे ऐकून मिहिका रडायला लागली, तेव्हा वरूण म्हणाला, "अगं रडू नको ना मिहू.. हे बघं मी हे आपल्यासाठी चं करतोय ना. मला माहिती आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या पण आता हे थोडं महत्त्वाचं आहे असं म्हणून तो निघून ही गेला ",    


त्या दिवशी मिहिका खूप रडली. वरचेवर कामामुळे वरूण आणि मिहिका मध्ये हा दुरावा वाढतच गेला. आता यशामुळे वरुण ला सुरूवातीला स्वतःबद्दल असणाऱ्या गर्वाने आता अहंकाराची जागा घेतली होती. वरूण ला वाटायचे आपली कंपनी असताना मिहिकाने जाॅब का करावा? तर दुसरीकडे मिहिकाला वाटायचे, वरूण माझी प्रतिभा कमी करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे दोघांचाही गैरसमज वरचेवर ईतका वाढला की, घरच्यांसमोर नवरा बायको म्हणून वागणारे ते बेडरूम मध्ये मात्र अनोळखी असल्यासारखे वागायचे. जे काही बोलणे व्हायचे थोडेफार तेव्हा एकतर वरूण बोलायचा आणि मिहिका ऐकायची किंवा मिहिका बोलायची आणि वरूण बोलायचा. हळू हळू ते बोलणे ही एकतर्फी झाले. त्यांच्या प्रेमाची जागा आता इगोने घेतली होती. ते एकमेकांसोबत होते ही नव्हते ही. यातं लग्नाची पाच वर्षे कधी उलटली ही त्यांना ही कळले नव्हते. सहा महिन्यांपूर्वी मिहिकाला मुंबईमध्ये कामानिमित्त शिफ्ट व्हावे लागले आणि वरूण ची हया नव्या कंपनीचे काम ईथेच होते त्यामुळे गेले सहा महिने ते मुंबई मध्ये रहातं होते. वरूणचे आई बाबा गार्गी च्या शिक्षणामुळे त्यांच्यासोबत आले नव्हते. मुंबईत येऊन जरी सहा महिने झाले होते, तरी मिहीका आणि वरूण च्या मध्ये परिस्थिती आहे तशीचं होती. आता तर ते दोघे कामांत गर्क बुडाले होते फक्त रात्री चं दोघांची भेटं व्हायची.    


"बापरे... हा पाचं वर्षांंचा काळ एखाद्या फास्ट फॉरवर्ड गाण्याप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहिला नाही का..?? खरचं पुढे जाताना मागे काहीतरी राहून जाते चं.. वरूण आणि मी आजं किती पुढे आलो, यश, पैसा, हवी ती स्वप्न सगळे काही मिळाले पण हे मिळवताना आमचं प्रेम, आम्ही दोघे ही मागे चं राहिलो. कित्येक क्षण निसटून गेले हातातून नाही.आमच्या प्रेमाने आमची साथ सोडली, आणि पुढे धावताना मी ईतकी खरचं हरवून गेले होते का, की माझी सावली असणारी, माझी ओळख असणारी माझी ही गिटार ही माझ्यापासून दुरावली गेली?", या प्रश्नाने मिहिका चे मन सुन्न झाले. आता जणू मावळतीच्या सूर्यासोबत तिच्या मनावरच विचारांचं मळभसुद्धा हळूहळू दूर होत होतं.    

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance