Rutuja kulkarni

Romance Tragedy Classics

3  

Rutuja kulkarni

Romance Tragedy Classics

त्यांच्या प्रेमाची गोष्ट

त्यांच्या प्रेमाची गोष्ट

4 mins
972


"अगं.. कायं वेडं लागलं आहे का तुला?? एवढं छान लग्नाचं स्थळ आलं आहे आणि तु हे कायं वेड्यासारखे बोलत आहेस याचे तुला तरी भान आहे का..?? अगं समाज कायं म्हणेल?? आपल्या समाजात हे असे प्रकार चालतं नाहीत आणि तुला आम्ही आणलेल्या मुलाशी चं लग्न करावे लागेल.", आज त्या दोघींना एकमेकींच्या मिठीत पाहून तिच्या आईने तिला चांगलेच खडसावले तसे ती ने ही तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली घरच्यांसमोर आणि मगं तिच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्यावर जे काही तिला सुनावणे चालू केले ते अजूनपर्यंत चालू चं होते. अखेर तिचा संयम तुटला चं एकदाचा आणि घरच्यांसमोर तिचा हात हातात घेऊन चं तिने बोलायला सुरुवात केली.


"हो.. आहे माझं प्रेम हिच्यावर...अगदी मनापासून आणि मला ही च्या शिवाय इतर कोणासोबतही इतका आनंद नाही मिळतं, मगं मी का करू लग्न इतर कोणाशीही? तुम्हाला का कळतं नाही मला मुलं कधी आवडली चं नाहीत. फक्त ही मुलगी आहे म्हणून माझं तिच्यावर असलेलं प्रेम एका क्षणांत चुकीचं, आणि खूप लाजिरवाणं ठरलं तुमच्यासाठी. अगं आई तु चं तर मला राधा कृष्णाबददल सांगताना, 'प्रेम खूप पवित्र असते..', असे म्हणायची मगं आज चं हे इतके अपवित्र वाटतं आहे तुला कारण फक्त आम्ही दोघी मुली आहोतं आणि माझं एका मुलीवर प्रेम आहे म्हणून. अगं प्रेम असं ठरवून नाही केले जातं ते मुक्त असते अगदी कोणावर ही प्रेम जडते आणि मी आजारी असल्यावर जितकी तु माझी काळजी घेत असतेस तितकीचं काळजी तिला आहे माझ्याबद्दल किंबहुना थोडी जास्त चं. तुम्हाला पटतं नसेल तर मी हे घर सोडून जाईल पण मला हिच्या सोबतचं रहायचे आहे आणि ही सोबत नसेल तर मी जिवंत ही नाही राहू शकतं.. ", 

एकीकडे ती तावातावाने हे सगळे घरच्यांना बोलतं होती आणि दुसरीकडे ती फक्त तिला पाहंत उभी होती. अखेर शब्दावर शब्दं वाढतं राहिले आणि शेवटी तिने तिचा इतकावेळ हातामध्ये गुंफूण ठेवलेला हात धरून घराबाहेर पाऊल टाकले ते कायमसाठी चं कारण तिला फक्त आयुष्यभरासाठी तिची सोबत हवी होती आणि हे तिच्या घरच्यांना कधीचं पटणार नाही हे तिच्या लक्षात आलेले.


घरातून बाहेर पडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते घरच्यांना तिचे प्रेम कळले नाही म्हणून आणि दुसरीकडे हिच्या डोळ्यात ही अश्रू होते पण ते आनंदाचे. तिने टॅक्सी ला हात केला आणि समुद्रकिनारी सोडायला सांगितले.

कारण आता तिला माहितं होते नेमकी कुठली गोष्ट तिला शांत करेल ते. टॅक्सी मध्ये ही ती फक्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडतं होती आणि तिने ही मुक्तपणे रडू दिले तिला. समुद्र किनारा आला तशा दोघीही टॅक्सी मधून उतरल्या आणि तिने तिच्याकडे पाहून चं एक हास्य दिले तिला.


गेले तासभर त्या समुद्र किनारी येऊन बसल्या होत्या आज मात्र डोळ्यातून त्या दोघी एकमेकींशी खूप बोलतं होत्या कितीतरी वेळ. त्या फेसाळणाऱ्या लाटा...तो अथांग पसरलेला समुद्र आणि तो चंचल वारा.. सारं वातावरण चं एकदम धुंद करणार होतं. एकीकडे समुद्र किनारी बसलेले कितीतरी जण ते धुंद वातावरण आणि ते मावळतीचे रंग मनांत साठवून घेतं होते आणि त्या दोघी मात्र हातात हात गुंफूण एकमेकींच्या डोळ्यात हरवल्या होत्या मघाशीपासून. अगदी काही वेळापूर्वी चंं त्यांच्या आयुष्याने एका नव्या वळणाची वाटं धरली होती. एकमेकींच्या डोळ्यात आज त्यांना फक्त आणि फक्त आनंद चं दिसतं होता.


इतक्या वेळापासून तिच्या हातामध्ये गुंफलेला हात हळूच काढून तिने आता तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळे मिचकावतं तिला शाश्वती दिली पुन्हा एकदा.

ती : मी आहे तुझ्याबरोबर कायम.. आणि तुझं माझ्या सोबत असणं चं मला पुरेसे आहे जगण्यासाठी. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. ", ती चे हे बोलणे चं खूप पुरेसे होते तिच्यासाठी. आता ती घरच्यांनी बोललेले सारे काही विसरून तिने तिच्या कपाळावर एक चुंबन दिले आणि तिच्या मिठीत विसावली ती. आता तिला घरच्यांचा, अवतीभोवती असलेल्या लोकांचा आणि या समाजाचा ही विसर पडला होता कारण तिला जगण्यासाठी हवं असलेलं प्रेम द्यायला ती सोबत होती आता कायमस्वरुपी तिच्या आणि त्यांचे हे प्रेम त्या दोघींसाठी खूप पवित्र होते. त्यामुळे समाज किंवा लोकांची भिती आता त्यांना उरली नव्हती.


या मावळतीच्या सूर्याबरोबर चं त्यांनी या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या होत्या आता आणि उद्यापासून उगवतीच्या सूर्याबरोबर त्यांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू होणार होता आता.  ही गोष्ट फक्त या दोघींची चं नाही आहे कारण आपल्या समाजात अजून या दोघींसारख्या कितीतरी जणी आहेत ज्या अजूनही त्यांचे प्रेम कधी समाज तर कधी घरचे लोक यामुळे व्यक्त करू शकतं नाहीतं तर कुठे यांच्या सारख्या दोघींना समाजाच्या त्या नजरांचा रोज सामान करावा लागतो केवळ त्या दोघी मुली आहेत म्हणून आणि त्यांचे एकमेकींवर प्रेम आहे म्हणून.


मुळात प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या मध्ये चं होऊ शकते फक्त ही आपल्या समाजाची असलेली कल्पना चं खूप चूकीची वाटते मला आणि मगं त्यामधून एखाद्या अशा दोघी एकमेकींसोबत राहू लागल्या की आपल्या समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागतो,

पण मला मुळात चं वाटत की हा रोष कशासाठी??

अरे.. प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे पाखरांसारखं मुक्त असतं ते कोणावरही होऊ शकतं.

या निसर्गावर, इथल्या झाडांवर आणि फुलांवर, एखाद्या प्राण्यावर, एखाद्या पदार्थावर, अगदी सूर्य आणि चंद्रावर सुद्धा प्रेम होऊ शकतं.

जितक्या सहजतेने स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रेम होऊ शकते आणि समाज ही स्वीकारतो तसे चं प्रेम जर दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये झाले तर बिघडले कुठे?

का आपण प्रेमाला कधी जातींमध्ये, कधी स्त्री आणि पुरुष यांमध्ये बांधून ठेवतो, मुळात लोकांना हे कळतं का नाही की प्रेम कधीचं कुठल्या साच्यात बांधले जाऊ शकतं नाही

कारण


प्रेमाला कुठलीही सीमा नसते

क्षितिजा इतकचं हे प्रेम न संपणार असतं

प्रेम म्हणजे एक अल्हाददायक सुखाची पालवी असते

प्रेम म्हणजे त्याग

समर्पण

तडजोड

प्रेम म्हणजे एक अनामिक ओढं असते

प्रेम हे वार्‍याच्या लहरींसारख आणि पाखरांसारख मुक्त असतं

आणि हे प्रेम खूप आनंददायी असतं...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance