Ashvini Dhat

Inspirational

3.2  

Ashvini Dhat

Inspirational

डाँ . बाबासाहेब आंबेडकर

डाँ . बाबासाहेब आंबेडकर

2 mins
9.7K


*महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर*

"शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे

ते जो पिणार तो माणूस

गुरगुल्याशिवाय राहणार नाही"

"शिका!संघटीत व्हा!संघर्ष करा"

श्रेष्ट चितंक, तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदेमंत्री

भारतरत्न डॉ. आंबेडकराचे हे शैक्षणिक विचार आजही आपल्याला प्रभावित करतात.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडिल रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ साली झाला. बालपणी त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांचे वडील दक्ष असत. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंपदा होतीचं म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी होती.

शिक्षणाची भीमगर्जना करताना शिक्षणाचे महत्त्व अगदी मार्मिक शब्दांत सांगितले आहे. आपल्या खडतर जीवनप्रवास आलेल्या अनुभवातून शिक्षणाचे महत्व त्यांनी सांगितले आहे.

शिक्षणाने माणूस समृध्द होतो.शिक्षक हे समाज घडविण्याचे प्रभावी शस्त्र बनू शकते.शिक्षणामुळे माणसाला आपल्या कर्तव्याची व हक्काची जाणीव होते. आदर, क्षमाभाव , विनयभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे.शाळेत जाणाऱ्या मुलांना नुसती बाराखडी शिकवून उपयोग नाही मुलांमध्ये संस्कार ही रुजायला

हवेत शाळा म्हणजे उत्तम आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत याची जाणीव देखील या प्रकियेत शिक्षकांना असायला हवी.राष्ट्रहीत. समाजहीताचे भान ठेवणारे खरे शिक्षण असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते.

आज शिक्षणक्षेत्रात अनेक प्रभावी ,प्रयत्नशील आणि गुणवत्तायुक्त शिक्षक आहेत ,त्यामुळे बाबासाहेबांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल असे वाटते.

महात्मा जोतिबा फुले ,सावित्रीबाई फुले या सारख्या अनेक नेत्यांनी दिलेली प्ररणाशक्ती आज कोणाला शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला लाभलेले महान देणगी आहे. त्यांच्या प्रभावी विचारांचा उपयोग समाजनिर्मितीत झाला तर नक्कीच समाजपरिवर्तन घडून

येईल.भारतरत्न डॉ. आंबेडकर सांगायचे कोणालाही कमी लेखू नका कारण जर घुळीचा कण डोळ्यात गेला तर प्रंचड वेदना होतात कारण एखाद्याकडे असणाऱ्या सुप्त गुणांचा अंदाज येत नाही.भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालनारे खरे मार्गदर्शक होते त्यांचा भ्रष्टाचार, अनिती ,अत्याचार व अन्यायाला प्रखर विरोध होता.जातीभेदासारखी कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समझत .

भारतरत्न डॉ. आंबेडकराचे विचारांत राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठाने भरलेले होते.ते स्त्रियांचे ,शेतकरी बांधवांचे, श्रमजीवी दलितांचे कैवारी होते.स्त्रीयांना समान हक्क मिळावेत म्हणून त्यांनी अनेक चळवळी केल्या.भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे लेखन विपुल प्रमाणात प्रसिध्द आहे. त्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत लेखन केले आहे.देशाच्या सामाजिक आर्थिक,राजनैतिक ,कायदा ,

शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचा जनक असेही संबोधतात त्याचे तब्बल ६४ विषयावर प्रभुत्व होते.एवढ्या साऱ्या विषयावर प्रभुत्व असणारे ते जगातील एकमेव व्यक्ती होते.

अशा महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगाला मिळालेली देणगी आहे. अशा महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्र्वास घेतला आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला .अशा भारतरत्न आंबेडकरानां शतदा प्रणाम!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational