ƦƲSӇƖKESӇ M KADAM PATIL

Crime Inspirational

4.0  

ƦƲSӇƖKESӇ M KADAM PATIL

Crime Inspirational

देवाचे अस्तित्व?

देवाचे अस्तित्व?

9 mins
864


भाग - 1

या जगामध्ये काही जण देवांवर विश्वास ठेवतात तर काही जणांना देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. सर्वांचे आपापले विचार असतात. 

असो. तर मी आहे जोनास आणि मी एफबीआय (FBI) मध्ये गेली 10 वर्षे काम करतोय.  जेव्हा माझी बदली झाली आणि मी मियामी आलो तेव्हा माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले. यापूर्वी असे प्रकरण कधीच सोडवले नाही. आणि नास्तिक असल्याने मला हे सर्व समजू शकले नाही. मिसुरीमध्ये जेव्हा मला पहीली केस प्राप्त झाली आणि जेव्हा मी आणि माझी टीम गुन्हेगाराच्या ठिकाणी पोहोचलो . एका झाडावर 10 मुली लटकत होत्या. प्रत्येक मुलीच्या डोक्यावर क्रॉस मार्क होते. ते दृश्य पाहून मला खूप भीती वाटली. मी या केसचा तपासकर्ता (investigation officer) होतो. मला धैर्याने काम करावे लागणार होते . पण ते दृश्य पाहून मी विचार करीत होतो की एवढी भयंकर अशी कृती कोणी कशी करू शकते. ऑफिस मध्ये परत आल्यानंतर आणि माझ्या सहकारयांशी याबद्दल बोलल्यानंतर मला कळाले की मियामीमधील ही तिसरी वेळ आहे असे घडल्याची . पूर्वी देखील दोनदा दहा मृतदेह झाडावर सापडले होते. दर तीन दिवसांनी मियामी मध्ये असं काहीतरी घडलं. मुलींचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत होते. मला आणि माझ्या संपूर्ण टीमला काहीच समजत नव्हते . मुलींना ज्या प्रकारे मारले गेले ते पाहून असे दिसून आले की कोणत्यातरी मनोरूग्ण (psycho) चे काम असेल पण अजून कोणत्याही निष्कर्ष काढला जाऊ शकत नव्हता. त्याच्या डोक्यावर जो क्राॅस (✝) होता अस वाटत होत की हे सगळे झालेले खुन धर्माशी जोडलेल आहेत आणि खुनी त्या क्राॅस ने आम्हाला काही तरी सांगत असावा.

.......

 झाडाखाली एक ट्रक थांबला. एक माणूस ट्रक मधुन बाहेर आला. त्याने ट्रकमधून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला , दोरीने बांधला आणि झाडावर लटकावला. त्याने अशाप्रकारे दहा मृतदेह झाडावर टांगले. नंतर तो माणूस ट्रकमध्ये बसला आणि तेथून निघून गेला. ट्रक महामार्गावरून खाली उतरला आणि खडबडीत रस्त्यावर गेला. तो थोडा पुढे गेल्यानंतर थांबला. तिथे फक्त एक घर होते, तो त्या घरात गेला आणि घराचा दरवाजा उघडला आणि आत गेला, घर लखलखीत दिसत होते, ती व्यक्ती स्वयंपाकघरात गेली आणि फ्रीजमधून बिअर बाहेर काढली आणि एका खोलीत गेला. त्या खोलीत पलंगाच्या अगदी समोरच एक पुस्तक शेड होते, त्याने पुस्तकातील शेडची सर्व पुस्तके बाहेर काढली आणि पुस्तकाच्या शेडच्या मागे एक छिद्र होते. त्या छिद्रात चावी ठेवून त्याने दरवाजा उघडला. त्या दाराच्या मागे एक पायरया होत्या , जे तळघरात उतरत होत्या . तो माणूस तळघरात उतरला तिथे दहा मुलींना बांधले होते. - 

.......

 "शआआआआआआआ. . ओरडू नकोस, नाहीतर मी हा चाकु ने तुझे शरीर दोन भागांत विभागले जाईल" तो माणसु मुलीकडे बघून ओरडाला . त्या माणसाने एका मुलीला त्याच्याकडे खेचले आणि त्या मुलीला म्हणाला , " बोलव तुमच्या देवाला , तो तुम्हाला  मदत करायला आला आहे काय?" मुलगी खूप घाबरली होती, ती मोठ्याने ओरडत होती. त्या माणसाने विजेचे कटर चालू केले आणि मुलीच्या डोक्यावर क्रॉस(✝) चिन्हांकित केले. सर्व मुलींच्या डोक्यावर क्रॉस चिन्हांकित केल्यावर त्या माणसाने सर्व मुलींना चाकुने गळाकापुन ठार मारले. सगळे तळघर रक्ताने लाल झाले होते. 


भाग - 2

मी जरा संध्याकाळी चहा प्यायला एका हाॅटेल मध्ये गेलो असता त्या हाॅटेल मालकाने मला विचारले, " जेंटलमॅन, शहरातील हत्याकांड बद्दल आपले काय मत आहे ?,आणि ते पण मियामी मध्ये जिथे खुप कमी गुन्हे घडतात."

"आता कोणालाही धर्म आणि देव यांची भीती वाटत नाही, आता लोकांना या शहरात भीती बाळगण्याचे नवीन कारण बनले आहे." मालक म्हणाला . 

" ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी घर, अन्न आणि कपड्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे एखाद्याला भीतीदेखील असावी लागते देवाची नाहीतर नाही पण पोलीसांची तरी." मी बोललो .

   " पण हा माणूस मुलींना का मारतोय ?" हाॅटेल मालकाने पुन्हा विचारले.  

"हेच मला तर मला शोधायचे आहे." मी उत्तरलो. 

 " आपण कोण ? " हाॅटेल मालक म्हणाला. " मी या केसचा तपासकर्ता (investigation offi.) आहे. 

माझ नाव जोनास आहे आणि मी FBI मध्ये काम करतो ". मी त्याला म्हणालो. 

 "ओहह! माफ करा सर मला माहिती नव्हत " मालक म्हणाला. 

 "तर सर, तुम्हाला काय वाटते, कोणी गुन्हा केला असेल ? " 

 " हे पाहा, मला या क्षणी काहीही माहित नाही. पण लवकरच खुनी पकडला जाईल ." मी एवढे बोललो तोच एक ट्रक हाॅटेलच्या बाहेर थांबला. ट्रकमधुन माणूस बाहेर आला आणि हाॅटेलमध्ये आला. तो माणूस माझ्या जवळ उभा राहिला आणि एक कप काॅफी मागितली. त्या माणसाच्या कपड्यांकडे माझी नजर पडली . त्याच्या कपड्यावर रक्त होते .  

 "सर, तुमच्या कपड्यांवर रक्त आहे. " 

 "होय, मी मटनाच्या दुकानात काम करतो. बरेचदा माझ्या कपड्यांना रक्त लागते " तो अज्ञात माणूस मला म्हणाला.  

" माफ करा, मी फक्त तुम्हाला सांगत होतो " मी म्हणालो .  

 "हरकत नाही " . तो म्हणाला 

काॅफी पिल्यानंतर तो माणूस त्याच्या ट्रककडे गेला. आणि निघून गेला.  

बरेच पुढे गेल्यावर ट्रक झाडासमोर थांबला. तो माणूस ट्रकमधून खाली उतरला आणि सभोवताली नजर फिरवली . आजूबाजूला बघितल्यावर त्या व्यक्तीने मुलींचे मृतदेह ट्रकमधून बाहेर काढले.  मृतदेह दोरीने बांधून झाडाला टांगली गेली. त्या माणसाने दहा मृत मुलींना झाडावर टांगले.

.......

   थोड्या वेळाने मी देखील बारमधून बाहेर पडला. मी त्याच मार्गाने आपल्या घराकडे निघालो ज्या मार्गाने ट्रक गेला होता. . बरेच पुढे गेल्यावर , मला ते झाडाला मृतदेह टांगलेले दिसले. मी आपली कार झाडाच्या खाली रोखली.आणि लागलीच स्टेशन ला कळवले. त्या दहा मृत मुलींच्या कपाळावर क्राॅस(✝) होते . मला खुप भीती वाटत होती. हे चौथ्यांदा घडत होते मियामी मध्ये. 


भाग - 3

: सेंट मेरी चर्च , मियामी ....

संध्याकाळचे सहा वाजत आलेत. चर्च चा पाद्री मनातल्या मनात जप करत होता. 

" देव चर्चमध्ये आहे असे तुम्हाला का वाटते?" मागुन आवाज आला म्हणुन पाद्री ने मागे वळून पाहिले. 

एक उग्र चेहरा असलेली व्यक्ती लाकडी बाकावर बसून बोलत होती.

" होय येथे देवाचे वास्तव्य आहे " पाद्री म्हणाला.  

" मग काही दिवसापूर्वी चर्चमध्ये मुलीवर बलात्कार कसा झाला? " - माणसाने विचारले.  

" माझ्याकडे उत्तर नाही " - पाद्री म्हणाला. 

  "तर याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जगात देव नाही. जर चर्चमध्ये देव असता तर ती मुलगी वाचली असती. तुम्ही हे सगळं घडल्यानंतर नास्तिक झाले असते तर बरं झालं असतं,  फादर ". - तो माणूस म्हणाला. 

 "आपण देव नाही असा विचार का करता? " पाद्री म्हणाला. 

" मला वाटत नाही की अस देव वगैरे काही आहे .आपण या जगात जगण्यासाठी जन्माला आलो आहोत. आणि आपण कसे जगायचे ते आपल्याला ठरवावे लागेल ".- तो माणूस उत्तरला 

  " जर आपण गुन्हे केले तर देव नक्कीच आपल्याला शिक्षा करतो "- पाद्री म्हणाला .

 "बरं आपणास काय वाटते ? की त्या बलात्कार केलेल्या आरोपी ला देवाने शिक्षा केली? " - त्या माणसाने विचारले. 

" होय नक्कीच " - पाद्री म्हणाला .

 " नाही, अमेरिकन कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली " - माणूस म्हणाला.

" बरं, मग तुम्हाला ते 10 -10 मुलींच्या हत्या होत आहेत ते माहितच असेल ". - त्याने विचारले. 

 " होय, माहित आहे मला " - पाद्री म्हणाला.     

 " आणि मुलीच्या डोक्यावर क्रॉस मार्क होता " - तो माणूस . 

 होय मला माहित आहे - पाद्री.  

" ते क्राॅसचे चिन्ह देवाचे आहे, बरोबर ? "     - तो माणूस 

" हो नक्कीच आहे " - पाद्री 

 " तर मग देवाने या सर्व खूनांना परवानगी दिली " - तो माणूस म्हणाला 

" म्हणजे "- पाद्री .

" याचा अर्थ असा आहे की देव यासारखी कोणतीही गोष्ट नाही." - तो माणूस. 

 " पण तुम्ही हे कसं सिद्ध कराल? " - पाद्री 

 " कारण , मीच त्या चाळीस मुलींना ठार मारले आणि त्यांच्या डोक्यावर क्रॉस काढले आणि नंतर त्यांना झाडावर टांगले." तो माणूस म्हणाला. 

 " आपण या सर्व खून केले आहेत ? " पाद्री ने विचारले. 

" होय " -तो माणूस. 

 " पण का, तू त्या निर्दोष मुलींना निर्दयपणे मारलस. " - पाद्री

 " अर्थातच त्या मुली निर्दोष होत्या, परंतु मला त्या मुली ठार मारून हे सिद्ध करायचे होते की  देव अस्तित्वात नाही." - तो माणूस म्हणाला. 

 " आपण मानसिकरित्या आजारी आहात ." पाद्री म्हणाला. 

 " आपण असे म्हणू शकता कारण हा आपला शेवटचा दिवस आहे. " तो माणूस म्हणाला. 

 " पण का ? मी काय केलं? " - पाद्री

" ओह , तुम्ही काही नाही केलं फादर . मला हे बघायचंय की तुमचा देव तुम्हाला वाचवण्यासाठी येणार की नाही? ". तो माणूस म्हणाला .

एवढं बोलून त्या माणसाने पाद्री ला खाली पाडले आणि त्याच्या गळ्यात सपासप चाकू दोन तीन वेळा घुसवला . नंतर त्याने ते पाद्री चे रक्त हातात घेतले आणि सेंट मेरी च्या पुतळयावर ऊडवले. 


भाग - 4

मियामी एक अतिशय सुंदर शहर आहे. शहरातील हवामान थंड असते.

मियामी मध्ये सुंदर रस्ते, सुंदर निसर्ग सगळ आहे. 

आणि ही गोष्ट आहे दोन पुरुषांची , दोन नास्तिकांची कहाणी. एक मनोरूग्ण (psycho) आहे आणि दुसरा एफबीआयचा अधिकारी आहे. एकाला हे सिद्ध करायचे आहे की देव अस्तित्वात नाही. आणि दुसरा एका सीरियल किलरला शोधत आहे जो मुलींना ठार मारत आहे. आपण एखाद्यावर विश्वास ठेवणे कधी बंद करतो ?  

 या प्रश्नांचे सरळ उत्तर आहे - जेव्हा एखादी व्यक्ती आपला विश्वासघात करते तेव्हा.  

  एक पिता ज्याचा देवावर खूप विश्वास आहे . परंतु जेव्हा त्याच्या लहान मुलीचा देवाचे वास्तव्य असलेल्या चर्चमध्येच बलात्कार होतो तेव्हा त्याचा देवावरील विश्वास तुटतो. त्या घटनेमुळे त्याच्या मनाला गंभीर दुखापत झाली , तो यापुढे देवांवर विश्वास ठेवणार नाही. देवा सारखी कोणतीही गोष्ट नाही हे त्याला सिद्ध करायचे आहे. 

 एफबीआयमध्ये बर्‍याच दिवस काम केल्यावर जोनास ला जग कसे आहे हे चांगलेच समजले होते . ज्या गोष्टी सिद्ध (proved) झालेल्या आहेत त्यावरच तो विश्वास ठेवतो. 

 जोनास पण नास्तिक आहे. 

हया दोन व्यक्ती ज्या एकमेकांना ओळखत नाहीत. दोघांचे विचार मात्र समान आहे, परंतु कार्य वेगळे आहे. एक हुशार आहे तर दुसरा मानसिकरित्या आजारी आहे.

(Follow me on Instagram-  @itsme_rmk) 

भाग - 5. 

मियामी एफबीआय ऑफिस समोर एक ट्रक थांबला. एक माणूस ट्रकमधून खाली उतरला आणि आत गेला. 

 तो माणूस जोनास समोर येऊन बसला.

 "मी एकूण चाळीस मुली आणि चर्चच्या पाद्री या सर्वाना ठार मारले आहे आणि मी माझ्या गुन्हाची कबुली देण्यासाठी आलो आहे." - तो माणूस म्हणाला. 

  मी खुर्चीवरून ताडकन उठून उभा राहिलो. "काय ? आपण हे सर्व खून केले आहेत? " - जोनास

 होय - तो माणूस

  जोनास ने लागलीच त्याला काॅलर ला पकडुन लाॅकअप मध्ये आणले आणि त्याचे हात बांधून खुर्चीवर बसवले. मग स्वतः त्याच्या समोर खुर्ची घेऊन बसला.

 "तु इतक्या सहजपणे गुन्ह्याची कबुली देत आहेस. तू आहेस कोण ?" - जोनास  

 "माझ नाव लिओ आहे " - तो माणूस उत्तरला. 

"आम्हाला वाटले की तुला पकडण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु तु स्वतः आपला गुन्हा कबूल करत आहेस"   - जोनास

 "मी हे गुन्हे लपविण्यासाठी केले नाहीत, मला संपूर्ण जगाला दाखवायचे होते." - लिओ "तुम्हाला कोणताही मानसिक आजार आहे का?" - जोनास

 "होय, मी एक नास्तिक आहे." - लिओ "नास्तिक होणे हा काही आजार नाही, मी देखील नास्तिकच आहे."- जोनास

 "तर मग तुम्हाला हे सर्व खून पाहून चांगले वाटले असेल ना ?" - लिओ

"तु मानसिकरीत्या आजारी आहेस" - जोनास

"मी नाही, तुम्ही सर्व आहात." - लिओ

  "त्या निष्पाप मुलींना तू का मारलेस ?" - जोनास

 " मी फक्त त्या मुलींना मारले कारण मला हे सिद्ध करायचे होते की या जगात देव वगैरे काही ही नाही. - लिओ

 "पण याच कारण काय आहे. तू नास्तिक आहेस, मग तुला हे करण्याची काय गरज आहे" - जोनास 

 "बर ऐका," - लिओ. त्याने जोनास ला सर्व काही सांगितल.

 "जर देव असतो तर त्यांने माझ्या मुलीला वाचविले असते. - लिओ . 

"पण हे करुन तुला काय मिळणार आहे".- जोनास

"मी हे सर्व केले कारण देवावर कोणावर विश्वास ठेवू नये. आपण पण नास्तिक आहात, याविषयी आपल्याला काय वाटते?" - लिओ

 "मी देवावर विश्वास ठेवत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला असे सिद्ध करायचे की देवच नाही, आपल्या मुलीसोबत अगदी वाईट झाले आहे, मी तुझे दुःख समजू शकतो. परंतु आपण त्याहूनही वाईट गोष्ट केली आहे." - जोनास

 "मला जगाच काही घेणं देणं नाही, मी आता स्वतःसाठी जगतो. माझ्या मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर मला कोणाची पर्वा नाही. आणि मी शिक्षेला घाबरत नाही." - लिओ म्हणाला.

Nice - जोनास म्हणाला.


भाग - 6

आपण धार्मिक असल्यास आपण अस्तित्त्वात नसलेल्या एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि देव अस्तित्त्वात नाही हे सिद्ध करण्याची गरज नाही. ही गोष्ट सिद्ध झाली आहे जेव्हा मनुष्य हुशार झाला, त्याने देवाला तयार केले. तुम्ही धार्मिक आहात, तर मग तुम्ही भ्याड असणे आवश्यक आहे. कारण धर्म आणि देवाचे कार्य माणसाला घाबरविन्याच च आहे. लोकांनी देवाचा चांगला उपयोग केला आहे जसे की पैसे कमावण्यासाठी, घाबरवण्यासाठी, लोकांना वेगळे करण्यासाठी, इत्यादी. 

देव तर सर्वांचे चांगलेच पाहतो. मग त्याने वाईट गोष्टी का निर्माण केल्या.  

जगात काही ना काही कारणासाठी युद्ध होतात . लाखो लोक मारले जातात. लढाईत सैनिकांना कैदी बनविले जाते आणि त्यांचे काय होते हे आपणास चांगले माहित असते.त्याच युद्धात स्त्रियांची स्थिती पण आपण शब्दांत सांगु शकत नाहीत. हिटलरने ज्युस लोकांचे काय केले, भारतातील उच्च जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांना कस वागवतात हे देखील तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. जर देव तिथे असेल तर त्यांनी हे सर्व का थांबविले नाही?  

बिग बॅंगच्या (Big Bang theory) दरम्यान, युनिवर्समधील सर्व जागा आणि उर्जा तयार झाली. या विशाल स्फोटात सर्व दिशेने वस्तू फेकल्यामुळे जागेचा विस्तार झाला. जसजसे ब्रह्मांड थंड होत गेले , त्यात एकत्रितपणे आकाशगंगा, तारे आणि ग्रह तयार झाले . होय, जगाचा जन्म अशाप्रकारे झाला. आणि ही सर्व नैसर्गिकरीत्या चालू असलेली प्रक्रिया आहे. यामध्ये कोणाताही देव सामील नाही.

आता तुम्हाला नास्तिकलोकांन बद्दल काय वाटते? 

 देशाच्या घटनेला (constitution) फाॅलो करा. कोणताही धर्मोपदेश, शास्त्र वाचण्याची गरज नाही. जर तुम्ही एखादा गुन्हा केला तर तुम्हाला नक्कीच शिक्षा मिळेल. देशात कायदा नसता तर कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झाली नसती. कारण देव कोणालाही शिक्षा करीत नाही. 

 - ही कबुली लिओ ने न्यायाधीश समोर दिली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime