Sarita Sawant Bhosale

Inspirational Children

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational Children

एका आईचा ब्रेक चिमुकल्यासाठी

एका आईचा ब्रेक चिमुकल्यासाठी

3 mins
196


    रियाचं लग्न ठरलं तस तिची आई रोज तिच्या मागे लागायची, अग रिया आता घरकाम शिकून घे. जेवण बनवायला शिकून घे. सासरी जाऊन तिथे फक्त अस बसून नाही ना चालणार...तू नोकरीत कितीही मोठ्या हुद्यावर असलीस तरी घरकाम कोणत्या बाईला सुटलं नाही. मी म्हणते तू आता लग्न होईपर्यंत नोकरीतून जरा ब्रेक घे. सगळं नीट शिकून घे म्हणजे सासरी आमचा उद्धार नाही व्हायचा. सासर किती चांगलं असलं तरी आपल्या जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पाडाव्या लागतात ग. रिया मात्र खूप महत्वकांक्षी. इंजिनिअरिंग करून बाबा नको म्हणत असताना नोकरी करत करतच तिने MBA पूर्ण केलं आणि नामवंत कंपनी मध्ये नोकरीवर रुजू झाली.


   दिवसरात्र कष्ट घेऊन, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून...कामात स्वतःला पूर्ण झोकून देऊन ती मॅनेजर पदापर्यंत येऊन पोहचली. हा यशाचा टप्पा नक्कीच सोप्पा नव्हता. यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती आणि आता लग्न ठरतंय...घरातली काम शिकायची म्हणून ती तिच्या करिअरमध्ये ब्रेक घेणारच नव्हती. लग्न ठरवताना तिने रोहितला म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना ठामपणे सांगून टाकलं होतं की नोकरी सोडणं कोणत्याही परिस्थितीत मला शक्य होणार नाही. माझं करिअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तिथे मी तडजोड करणार नाही. रोहित आणि त्याच्या घरच्यांचे विचारही आधुनिकच होते त्यामुळे त्यांनी रियाची अट मान्य केली. लग्न झाल्यानंतर रियाने तस नोकरी सांभाळूनही घराची जबाबदारी उचलली. खूपच समजूतदारपणे आणि निरपेक्षपणे तिने सासरच्या माणसांची मन जिंकली. उच्चशिक्षित, महत्वकांक्षी असली तरी सुसंस्कारी होती. आपल्या करिअरसोबत आपलं घर, संसार हे आपलंच आहे आणि ते प्रेमाने जपलच पाहिजे हे तिला समजत होत म्हणूनच तिच्या बाबतीत सासरकडून कधीही कोणतीही तक्रार न येता कौतुकाचे शब्दच तिच्या माहेरी पोहचायचे तेव्हा आईला भरून पावायचं.


   लग्नाला एक वर्ष झालं असेल की नवीन पाहुण्याची चाहूल रियाला लागली. रिया खूप खुश झाली. अजुन एक जबाबदारी सक्षमपणे पेलण्यास ती तयार झाली. घर,ऑफिस आणि आता हे गरोदरपणही उत्तमरीतीने सांभाळलं. सासरची माणसं आणि रोहित होतेच तिच्या मदतीला. तिला आधार द्यायला. नवव्या महिन्यात ऑफिसची सगळी काम आटोपून तिने सुट्टी टाकली. 


काही दिवसांनी गोड परीच आगमन रिया आणि रोहितच्या जीवनात झालं. सगळेच खूप खुश झाले. रियाही परिचे लाड करण्यात, तीच बालपण जगण्यात मग्न झाली. परी मध्ये ती इतकी एकरूप झाली की ऑफिसची सहा महिन्यांची सुट्टी संपत आली हे तिच्या लक्षातच आलं नाही. काही दिवसांनी आता ऑफिसला जाव लागेल..परीला घरी एकटीला ठेवून.. कशी राहील परी माझ्याशिवाय..तिला तर सतत मी समोर लागते. माझ्याशिवाय तिच पानही हलत नाही...अजून किती लहान आहे..माझी आठवण आली तर तिला बोलताही येणार नाही आणि घसा कोरडा होईपर्यंत रडून रडून छकुली माझी झोपून जाईल. माझंही मन लागणार आहे का परीशिवाय ऑफिसमध्ये... तसे आई बाबा घरी परीला नीट सांभाळतीलच पण या वयात तिला आईची जास्त गरज आहे. तासाला तिला दुध पाजायला लागतं... भूक लागली आणि मी नसेन तर किती अस्वस्थ होईल ती आणि माझाही जीव ऑफिसमध्ये कासावीस होऊन जाईल. तिचं हे नाजूक हसणं, तिचे बोबडे बोल, तिने टाकलेलं पहिलं पाऊल, तिने आई उच्चारलेले पहिले बोल,दुडूदुडू धावणं हे सगळंच पाहायला मी नसेनचं घरात. तिला मोठी होताना माझ्या डोळ्यांनी पाहायचंय मला...तिचे लाडिक खेळ,तिचं रुसणं,गाणं म्हणणं,रडणं,नाचणं सगळचं फार जवळून अनुभवायचय मला. तिचं बालपण तिच्यासोबत मलाही जगायचंय जे मी ऑफिस जॉईन केल्यानंतर शक्यच नाही.


   बस्स ठरलं माझं...मला ऑफिस,नोकरी,ते पद,प्रतिष्ठा पुन्हाही मिळेल पण परीच बालपण जगायला परत नाही मिळणार. तिलाही आता माझ गरजेचच असलेलं आईपण परत नाही मिळणार. माझ्या परिसाठी मी माझ्या करिअरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणारच. तिला माझी आणि मला तिची आता खूप गरज आहे आणि यासाठी माझा ब्रेकही तितकाच जरुरी आहे. दुसऱ्याच दिवशी या महत्वकांक्षी रियाने ऑफिसमधे राजीनामा दिला आणि स्वतःचा पूर्ण वेळ परीसाठी, एक परिपूर्ण आईपण अनुभवण्यासाठी दिला.


   रिया सारख्या तुमच्या माझ्यात खूप जणी आहेत ज्या महत्वकांक्षी तर खूप आहेत पण सोबत त्यांना आईपण एन्जॉय करायचंय...बाळाचं बालपण हरवू द्यायचं नाही...बाळासोबत स्वतःलाही लहान होऊन त्याचा प्रत्येक क्षण जगायचाय कारण हे सुरेख क्षण एका आईच्या आयुष्यात पविचाराने अशा अनेक रिया छोटासा ब्रेक घेतात आपल्या चिमुकल्यासाठी. 


तस प्रत्येक आईला आपल्या बाळासोबत पूर्ण वेळ राहावं वाटत असते पण काहींना कधीतरी आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे बाळ लहान असतानाही नोकरी करावी लागते पण अशा सख्याही जमेल तस कामातून ब्रेक घेऊन बाळाच बालपण जपण्याचा,त्याला आंनदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational