Sheetal Ishi

Thriller

4.0  

Sheetal Ishi

Thriller

हिरकणी (भाग-1)

हिरकणी (भाग-1)

3 mins
251


साधारणपणे एक पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. राधा एक सर्वसामान्य घरातली मुलगी. घराची परिस्थिती फारच बेताची त्यामुळे 22 व्या वर्षीच तिचे लग्न लावण्यात आले. नवरा एका कारखान्यांमध्ये कामाला होता. लवकरच त्यांच्या संसार वेलीवर एक कळी उमलली. मुलगी साधारण सहा महिन्याची झाली होती. राधा नावाप्रमाणे राधा होती. पाहता क्षणी सर्वांना आपलेसे करणारी, सगळी कामे चुटकी सरसे बाजूला करणारी ,हुशार आणि चपळही तेवढीच रुपवान होती. नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात डबा घेऊन तो कामाला गेला. राधा त्यादिवशी घरातली सर्व कामे आवरून बाजारात जायला निघाली. अचानक तिचे लक्षात आले की लाईट बिल भरायचे राहिले आहे. आपली सहा महिन्याची सखी होती रस्त्याने जात असताना तिला एक लक्षात आले की कोणीतरी गाडीवरून तिचा पाठलाग करतो आहे. एका हातात कडेवरती सखी होती. संशयाने जरा तिने मागे वळून पाहिले. खरोखर कुणीतरी मागून येत होता .तिने दुर्लक्ष करून ती चालू लागली. थोड्याच वेळात ती गाडी तिच्याजवळ येऊन उभी राहिली त्या बाईक वरचा माणूस राधाशी बोलू लागला ,"तुम्ही ते पटवर्धनांची बहीण का? " तिने नाही सांगितले आणि पुढे चालू लागली तो माणूस परत तिच्याजवळ येऊन बोलू लागला, "तुम्ही आमक्याची सून का? " तिने नाही सांगितले आणि पुढे चालू लागली तर माणूस गाडी घेऊन पुढे निघून गेला काही अंतरावर जाऊन तो पुन्हा थांबला एका फोर व्हीलर जवळ थांबला काहीतरी त्यांच्यामध्ये इशाराने बोलले झाले आणि तर टू व्हीलर वाला माणूस परत पुन्हा राधा जवळ आला आणि मग राधाशी बोलू लागला राधाला आता संशय आला होता. पण आजूबाजूला कोणी नसल्यामुळे ती जरा घाबरली होती काय करावे तिला सुचत नव्हते हातामध्ये एवढीशी सखी होती सगळ्यात जास्त जीव तिचा अडकला होता तो सखी मध्ये. तिला संकटाची चाहूल लागली होती. हृदयाची धडधड वाढली होती. कपळावर घाम यायला लागला होता. पुन्हा तो माणूस काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिला गाडीत बस म्हणून सांगत होता. त्या माणसाने सखीला ओढण्याचा प्रयत्न केला .तिने एकदा ओरडून त्या माणसाला नाही म्हणून सांगितले .जोराचा धक्का देऊन तिथून पळू लागली. झपाझप पावले टाकू लागली .जवळच एक चांभार तिला दिसला आता कुठे तिला धीर येऊ लागला होता कुठेतरी आपल्याला मदत मिळेल हे तिला लक्षात आलेले होते बाजूला तिला दगडे पडलेली दिसली जवळच काही काठ्याही होत्या गाडीवाला माणूस तिच्या अधिकाधिक जवळ येऊन तिला सोबत ओढण्याचा प्रयत्न करत होता ती जीवाच्या आकांताने ती काठ्यांपर्यंत पोहोचली एका हातात सखी होती आणि दुसऱ्या हाताने काठी उचलून जी त्या माणसाच्या पाठीत घातली आणि जो ओरडायला सुरुवात केली तो माणूस घाबरून पळू लागला आजूबाजूला माणसं गोळा झाली होती झालेला प्रकार सखीने सर्वांना सांगितला मदतीसाठी आलेली माणसे त्या माणसाच्या मागे पळाली. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती पण तो माणूस फोर व्हीलर मध्ये बसून निघून गेला होता इकडे राधाचे अश्रू थांबत नव्हते जीवाच्या आकांताने सखीला कवटाळून ती हमसून हमसून रडत होती. दुःखाच्या अश्रूंसोबतच आनंदाचे अश्रू ही एकत्र झाले होते आजच्या आधुनिक हिरकणीने स्वतः सोबतच आपल्या तानुल्या सखीचाही जीव वाचवला होता. धन्य ते मातृत्व धन्य ती आधुनिक हिरकणी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller