Anjali Bhalshankar

Action Fantasy

2  

Anjali Bhalshankar

Action Fantasy

हतबल जनता नि निर्ढावलेले शासन?

हतबल जनता नि निर्ढावलेले शासन?

4 mins
63


लाज आहेत हे सारेच राजकारणी आणि त्याहून मूर्ख जनता जी जातीजातीत, तुकड्या तुकडयात बाटली आहे ज्याचा अतिरेकी गैरफायदा घेऊन हे मुठभर राजकारणी एकटे तीस कोटी जनतेला वेठीस धरत आहेत.देशात शिक्षणापासून रोजगारा, पर्यंत व शेतकरयांपासून, बलात्कारयांपर्यंत कीतीतरी दाहक समस्या आहेत.आजही कोटयावधी बालके शिक्षणा पासून वंचित आहेत. शाळा आहेत तीथं विद्यार्थी नाहीत.गळके छत पडकया भींती पाण्याचं पाणी स्वच्छता गृह,निकृष्ठ दर्जाचा पोषक आहार दर्जाहिन शिक्षण आशा कित्येक समस्या आहेत.दुसरीकडे कोट्यावधी रूपयांची निधी मंदीरासाठी जातोय. कित्येक सुविधांचा अभाव आहे.देशाचं भविष्य बालकांच्या विकासावर अवलंबून आहे.यासाठी कोणता नालायक राजकारणी आवाज ऊठवतोय?तरूण सुशिक्षित बेरोजगारांना नोकर्या साठी मरमर करावे लागतय अगदी चतुर्थ श्रेणी पासुन अतिउच्च पदांच्या नोकरीसाठी जागा निघालयाच तर कुवत असुनही ओळखी आभावी संधी मिळत नाही किंवा मग मधले दलाल सेंटीग करायला आहेतच .आधी शिक्षणावर पैसे खर्च करायचे, मग नोकरीसाठी वरिष्ठ कनिष्ठ सारयानांच खुष करायला काही लाख रुपयांची तरतुद करायची .ज्यांना मतदान करून सत्ता दिली त्यातले कीतीजण या तरूणांसाठी आवाज ऊठवतात तावातावाने, सभेत भाषण करून जातींचे राजकारण करून तरूणांची माथी भडकावणारया कर्मठ नेत्यांनी या तरूणासाठी,त्यांच्या समस्यां साठी संसदेत विधानभवनात इतकयाच पोटतिकडीने आवाज उठवायला नको !!हि गोष्ट तरूणांनी ही नेत्यांच्या सभांना दारूमटणांच्या पार्टयांना काही रकमेच्या अमिशाला भूलून जाण्या अगोदर हजारदा विचार करायला हवा.आज कित्येक लोक फुटपाथवर रहातात लहान लहान मुल सिग्नल वर छोटयामोठया वस्तु जीवावर ऊदार होऊन विकतात. शिक्षणापासून वंचित रहातात.अलपवयीन मुलीपासून आगदी वृध्द महिले पर्यंत बलात्कार करून मारून टाकलया जाते.यापैकी कित्येक गुनहेगांराचे राजकीय लागेबंधे असतात. तरूणापुढेही अनेक समस्या आहेत. शिक्षणासाठी नोकरी साठी कुटुंबापासून कितीक दूर रहातात. त्यांच्या साठी सुरक्षित अशा वस्तीगृहांच्या सोयी सरकारने करायला हव्यात.महीलांच्या सुरक्षिततेचे कायदे आणखी कडक व गुनहेगाराःच्या अपराधयाच्या कोर्टाने दिलेलया शिक्षेची विना जामिन तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे.आजही पोरींना पोटातच मारले जातेय हुंडयासाठी बळी दिले जातात अगदी उच्च शिक्षित कुटुंबातील स्रीयाही कौटुंबिक हिसाचाराच्या बळी पडतात.कित्येक मुली काय मुलं सुद्धा लैंगिक अत्याचाराचे शिकार होतात.वस्ती पातळीवर झोपडपट्ट्या मध्ये आठवी नववीतलया विद्यार्थ्यांनासुदधा धड पाढे पाठ नाहीत ना इंग्रजीचे एक वाकय लीहीता येत हे शिक्षण कुठुन कुठे चालले आहे.आजच्या प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाची हि अवस्था असलेले विद्यार्थी उच्च शिक्षण कोणत्या बेसवर पुर्ण करणार विविध शिक्षणाच्या परदेशात, देशात संधी ऊपलब्ध आहेत. असतीलही पंरतु तिथ पर्यंत नककी कोणती मुल पोहोचतात सहाजिकच ज्यांची आर्थिक व बौधिक पातळी सिद्ध आहे. काहीजण गरिबीतही जिद्दीने पुढे जात रहातात ते ही पुढ पैशाअभावी नडवले जातात.हे क्षेत्रातले मोठे अपयश आहे पुणयासारखया शहरात ही अवस्था आहे .तर गावपातळीवर वर बोलणे नकोच!कुठे आहेत महिला व बालकलयाण विभाग मंत्री त्यांची जबाबदारी किती? प्रमाणात निभावतात?रोजगार शिक्षण ऊपासमार जास्तीत जास्त कष्ट व मोबदला कीती?सर्वसामान्य मनुष्य भाकरीच्या मागे धावतोय आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न वस्र व निवारा यासाठी झगडतोय.तरूण आपल्या भविष्यासाठी नोकरीसाठी वनवन करतोय शेतकरी अवकाळी, नापीकी, पाणी व बदलत्या हवामानाच्या आसमानी संकटांशी झुंजतोय दुष्काळाने हतबल होतोय कधी ओला तर कधी कोरडा,दुष्काळ. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय.त्या शेतकरयांच्या मदतीला कुठले नेते धावतात वा जनतेचयाच लुटलेलया पैशातुन काही हजार कोटींच्या संपत्तीतला जरासा वाटा मदत म्हणून शेतकरयाला देतात काय?ऊलट त्यांच्या नावावर आपलेच इमले भरत आहेत. हे लोक ज्यांना तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या पदाचा,अधिकाराचा, स्वार्था साठी शक्य तितका वापर करतात.स्त्रीयांचे आपल्या न्यायहककासाठीचा हजारो वर्ष सुरू असलेला संघर्ष एकविसाव्या शतकातही संपलेला नाही.मोठमोठे पुढारयांची नावे स्रीयांच्या शोषण, लैंगिक अन्याय, व आपल्या पैशाचा वापर करून स्रीयांच्या अब्रूंचा बाजार मांडतात त्याच्यांच कडे सामाजिक न्याय वगैरे तत्सम पदे असतात. तक्रार होऊनही राजीनामा देणयाची नैतिकता हि दाखवत नाहीत. इतके कोडगे नेते जगात कुठेही सापडणार नाहीत. सर्वसामान्य जनता तळागाळातील शोषित पिढीत अशिक्षित लोक तरी गरीबीची लाज बाळगत नाहीत परंतु सुशिक्षित,गरीब व मध्यमवर्गीय समाज दोन्ही बाजूंनी दडपून जातो घराणयाची, आडणावांची, इभरत राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो झाकली मुठ ठेऊन एकेक दिवस कंठतो.थोडेफार शिक्षण झालेले लोकही कोंडमारयात जगतात.सामाजिक प्रश्नावर अज्ञान अंधश्रद्धा यावर बोलायला गेले की आपल्याच परीचितांमध्ये परके केले जातात मुद्दा हा की तळागाळातील गरीब समाज व्यवस्था आजही भुख गरीबी सह अंधश्रद्धेच्या सोबत जगत आहे. अज्ञानात अडकली आहे आणि त्याचाच पुरेपुर फायदा इथल्या राजकारणी लोकांच्या स्वार्थाच्या , एक सक्षम स्रोत बनला आहे. तुम्ही आम्ही, तुमचे त्यांचे इकडचे, तिकडचे, खालचे वरचे, असे माणसांचे विभाजन आजही सुरूच आहे मग जातीवादी वकतवय करून भोंगे, चालीसा, देऊळे नि मशीदी,उच्च कनिष्ठ असली हत्यार वापरुन लोकांच्या भावनांना हात घालत असतील तर दोष कोणाचा आहे??? नक्की.मंत्री आमदार खासदार आज केव्हाही कुठेही जाऊन हनुमान चालीसा महणनार. कुठल्या नेत्याने विशिष्ट समाजाला टारगेट करून मंत्र विधी यावर आक्षेपार्ह विधान केले, मग त्यासाठी ठराविक लोक रस्त्यावर उतरणार. गर्दी करणार. त्या गर्दीला थोपवायला दंगल,व काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मग आख्खी पोलीस यंत्रणा त्या कामी लागणार. आता पोलीसांचे कर्तव्य समाजातल्या गुनहेगारीला चोरया खुन दरोडयांना रोखणयाचेच आहे! मग समाजातले सगळयात मोठे चोर दरोडेखोर गुंड भाइगिरी,जातीयवादी कटटर लोक राजकारणीच आहेत असे म्हणने व मानने वावगे बिलकुल ठरणार नाही.समाज!कोट्यावधींचा समाज आज काही हजारात असलेलया आपणच निवडून दिलेलया शासन कर्तया लोकप्रतिनिधींच्या भोंगळ कारभाराने व्यथित झाला आहे.हे नक्की!!अज्ञानात सुख असत! म्हणतात ते खोटे नाही कारण माणूस डोळे असुन आंधळा, कान असुन बहीरा, व तोंड असुन मूका, होऊन जगु शकतो त्याच्या दृष्टीने तो दिवसभर कष्ट करून रात्री अन्नाला लागतो व शांत झोपी जातो उद्याच्या भाकरीची चिंता फक्त.पंरतु शिकली सवरलेली विचारी तरूण पीढीला या व्यवस्थेचा कंटाळा आलेला आहे. त्यांना नको आहे धर्म नी जातीचा खेळ.त्याना नको आहेत दंगे अशांती राडा.एक उज्वल भविष्य देइल काय कुणी राजकारणी या पीढीला?? की मंदीर मशीदी वेद पुराण अन मंत्र धर्म च्या फसव्या पाशात अडकवून रस्त्यावर दंगे करायला प्रवृत्त करून अंधार कोठडीतच जाणार देशाच भविष्य का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Action