vishwanath shirdhonkar

Action

4  

vishwanath shirdhonkar

Action

मराठी कथा - केंडलमार्च !!!!

मराठी कथा - केंडलमार्च !!!!

11 mins
23.1K


" मला निघायला हवं. आज संध्याकाळी जंतरमंतरवर फार मोठ्या निदर्शनाचा एक कार्यक्रम आहे

. आजच्या परिस्थितीत स्त्रियांना समाजात एक वेगळच आव्हान मिळालेले आहे . स्त्रियांनी हे आव्हान स्वीकारायला हवं . आमच्या संस्थेची मी अध्यक्ष आहे . देशातल्या तरुणींची मी आवाज आहे . मी निदर्शनामध्ये नाही जाणार तर  मग कोण जाणार ? " अचानक मिसेस सिन्हा उठून उभ्या राहिल्या . 

- " नो मिसेस सिन्हा . नेहमी काही ना  काही बहाणा असतो तुमचा . जिंकल्यावर मधेच उठून जायचं . अजून खेळ संपलेला नाही . दुपारचे तीनच वाजलेले आहेत . सिन्हा साहेब तर रोज रात्री उशिरा घरी परत येतात . मग तुम्हाला कसली घाई ? बसा . पूर्ण वेळ 

थांबा . " मिसेस तुलींनी मिसेस सिन्हांचा हात धरून त्यांना खाली बसविले . 

- " नाही तर काय ? " हातातल्या पत्यांना फेटत मिसेस शर्मा म्हणाल्या , "  मिसेस सिन्हा आपली किटीपार्टी नेहमीच बिगडवून टाकतात. पण आज असं नाही चालणार . तुम्हाला असं खेळ अर्धवट सोडून नाही जाता येणार . आज मी  होस्ट आहे , आणि आपलं असं ठरलेलंच आहे की होस्टचा निर्णय सर्वांना मान्य असेल . " 

- आता नाईलाजाने मिसेस सिन्हा परत सोफ्यावर बसल्या , " वाटा , पण मी खरचं सांगते मला निदर्शनामध्ये जायचं आहे . केंडलमार्चचा फार मोठा कार्यक्रम आहे . "

- " तुम्ही एकट्या तिथं नाही गेलात तर केंडलमार्च काही थांबणार नाही . " आता मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या . 

- " मिसेस श्रीवास्तव , तुम्हाला कळतंय का तुम्ही काय म्हणताय ते ? " मिसेस सिन्हा भडकल्या , " आमच्या कॉलनीतल्या महिला मंडळाची मी अध्यक्ष आहे . स्त्रियांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांच्या विश्वस्तमंडळात मी आहे . मला न जाऊन कसं चालेल ? आमच्या महिला मंडळाद्वारे देखील केंडलमार्च व निदर्शनामध्ये सामील होण्याची बातमी कव्हर करण्यासाठी मिडियाला मीच तर बोलाविले आहे . आता वेळेवर मीच नसणार तर माध्यमांवर कोणी इतरच दिसणार . म्हणजे सगळी मेहनत वाया जाणार . " मिसेस सिन्हांच्या बोलण्यात नाराजी होती .

- " काळजी करू नका. सिन्हा साहेब संचार मंत्रालयात आहेत हे सर्व मिडियावाल्यांना ठाऊक आहे . तुम्हाला नाही दाखविणार तर मग कोणाला दाखवतील ते ? पण नेहमीच चांगली रक्कम जिंकून कसं काय जाऊ शकता तुम्ही ? " मिसेस शर्मा म्हणाल्या.  

- " मिसेस शर्मा कमाल करता तुम्ही ! केंडलमार्चची गंभीरता नाही समजत का तुम्हाला ?"

मिसेस सिन्हा रागाने म्हणाल्या . 

- " तुम्हाला समजत न इतकंच  पुरेसं आहे आम्हा सर्वांसाठी . आता तीन वाजलेले आहेत .

नेहमी प्रमाणे खेळ पाच वाजेपर्यंत चालेल . हवं तर खेळ संपल्यावर आम्ही सर्व सरळ तुमच्या सोबत येऊ . पण तुम्हाला अर्धवट खेळ सोडून उठून जाता येणार नाही . " मिसेस शर्मा ठामपणे म्हणाल्या .  

- " शो . " अचानक मिसेस वर्मा आनंदाने ओरडल्या . " शो s शो s शो s किती वेळ फालतू गप्पांमध्ये वाया घालविणार आहात तुम्ही सगळ्याजणी ? " मिसेस वर्मांजवळ चांगले पत्ते आले होते . सर्वांनी आपापले पत्ते दाखविले . मिसेस वर्मांनी सगळे पैसे गोळा केले . व वाटण्यासाठी पत्ते मिसेस तुलींच्या हातात दिले . 

- " मिसेस तुलींनी सर्वाना पत्ते वाटले व म्हणाल्या , " काही म्हणा मिसेस वर्मा यू आर लकी ! "

- " किती उशिरा माझा नंबर आलेला आहे ठाऊक आहे का ? "

- " मी पत्यांसाठी नाही म्हणत आहे . त्युमच्या घरी ना कोणाची काही कटकट नाही हो . "

- " आता सासू सासरे आमच्या लग्नाच्या अगोदरच वारले होते . मुलबाळ आम्हाला झालचं नाही . मग काय तुम्ही मैत्रिणीच आपला संसार . "  

- " म्हणूनच तर मिसेस वर्मा तुम्ही लकी आहात . " आता मिसेस श्रीवास्तव मधेच बोलल्या , " मिसेस तुलींना किती त्रास सहन करून सासूसासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवावं लागलं होतं . "  

- " हो ना . " मिसेस तुली म्हणाल्या , " तुम्हाला काय सांगू मिसेस वर्मा ,मिस्टर तुली तर माझ्या सोबतच होते पण आमचे इतर सर्व नातेवाईक सासूसासऱ्यांना आमच्याच जवळ ठेवण्यासाठी सतत आमच्याशी भांडायचे . किती सहन करायचं आपण ? शेवटी आपलीही  काही प्रायवेसी  असते की  नाही . सदैव आपल्या छातड्यावर कोणी तरी बसलेलं .! पोरांनाही सारखा त्रास . किती कटकट . नाही सहन होत हो . तसेही पोरं मोठी झालीच होती . मग काय उपयोग होता सासू सासऱ्यांचा ? शेवटी आम्ही सर्व नातेवाई कांशी कायमचे संबंधच तोडून टाकले आणि नंतर सासू सासऱ्या ना बळजबरीने वृद्धाश्रमात पाठवले . शेवटी आपलं स्वातंत्र्य महत्वाचं . "

- " अगदी खरं आहे मिसेस तुली तुमचं . " मिसेस शर्मा म्हणाल्या , " मला चांगलाच अनुभव आहे . आमच्या येथेही असेच रोज सासू सासरयांशी वाद व्हायचे . शेवटी मिस्तर शर्मांनी सासू सासऱ्यांना राहण्यासाठी इथं जवळच एक वेगळा फ्ले ट भाड्याने घेऊन दिला व सासू सासरे ही आनंदाने तेथे राहायला गेले . अडचण आणि अडगळ दोन्ही गेली आणि आम्ही आमचं स्वातंत्र्य असं  टिकवून ठेवलं . " 

- इतक्यात मिसेस सिन्हा यांच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला . त्यांनी मोबाईल कानाशी लावला व गोष्टी करू लागल्या , हेलो s ह s s लो , कमिंग एट सिक्स थर्टी शार्प ." इंग्रजीत सुरवात केल्यानंतर त्या हिंदीत बोलू लागल्या , " अहो स्त्रियांवर अत्याचार होत आहे आणि मदमस्त सरकार झोपलेलं आहे . आमचं हे निदर्शन झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठीच आहे . स्त्रियांचं स्वातंत्र्य व स्त्रियांची अस्मिता टिकवून ठेवणं हेच आमचं ध्येय आहे . समजलं का ? स्त्रियांच्या प्रत्येक लढ्यात आमची संस्था आघाडीवर आहे 

आज . कळलं का ? अहो , गर्दी तर व्हायलाच हवी . तुम्ही काळजी करू नका . आमच्या मंडळाच्या सर्वच स्त्रिया येतील . काय ….  म्हणता …. इंटरव्ह्यू …  ? अहो … नक्की … देईन . काय … म्हणता …. चर्चेसाठी ? च्यानलवर ? अहो त्यात विचारायचं काय … ? आहे मी अव्हेलेबल . येईन . नक्की येईन . दिवस आणि वेळ कळवा मला  . ओ के . ठेवू . " मिसेस सिन्हांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती .   

- " चला लवकर आटपा . मला इंटरव्ह्यू साठी तयार व्हयाच आहे . तुम्ही सगळ्याजणी येणार ना बरोबर ? " मिसेस सिन्हांनी विचारले . 

- " होय s होय ss आम्ही सर्व नक्की येणार आहोत . आणि मिसेस सिन्हा तुम्ही इथंच तयार व्हा म्हणजे तुमचा वेळ वाचेल . " मिसेस शर्मा म्हणाल्या . 

- " मला वाटतं मला घरी बाईला फ़ोइन करायला हवा . " मिसेस तुली मधेच म्हणल्या व त्यांनी मोबाईलव र घराचा नंबर लावला व बोलू लागल्या , " हेलो कमलाबाई , मला यायला थोडा उशीर होणार आहे . साहेबांचे काही मित्र घरी येणार आहेत . त्यांची आज पार्टी आहेत . पार्टी म्हणजे पार्टी . सर्व कांचेचे ग्लास स्वछ करून टेबलावर नीट तयार करून 

ठेव . त्यांच्या जेवणाचे हि बघ . आणि बेबी तिच्या बॉय फ्रेंड बरोबर गेलेली आहे . तिलाही यायला उशीर होणार आहे . लवकर झोपू नको . " 

-" मिसेस तुली , तुम्हाला कामवाली बाई चांगलीच मिळालेली दिसतेय . तुम्ही घरी नसताना देखील सर्व नीट व्यवस्थित सांभाळते . " मिसेस तुलींना इतकी चांगली काम वाली बाई मिळाली म्हणून मिसेस श्रीवास्तावांना हेवा वाटला . 

- " तीस हजार मोजले होते . कोणी म्हणे बांग्लादेशी देशी तर कोणी म्हणतं होतं बंगाली आहे . अहो दहाबारा वर्षाची होती तेव्हाच एका दलालाला रक्कम मोजून तुली साहेबांनी तिला घरी आणलं होतं . तिला तर तिचे आईवडीलही ठाऊक नव्हते . धड बोलताही येत नव्हतं . की काही काम येत नव्हतं . झाली आज वीस वर्ष . नाही तरी घर कामांसाठी आजकाल बायका मिळतात कुठं ? कमीत कमी हा प्रश्न तर सुटला . " मिसेस तुलींच्या 

चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते . त्यांना जणू जग जिंकल्यासारख झालं होतं . 

- "अहो पण हे बेकायदेशीर नाही का ? " मिसेस श्रीवास्त्ववांना मिसेस तुलींचा तोरा बघविला गेला नाही . 

- " आम्हाला इतकं मूर्ख समजून कसं काय चालेल मिसेस श्रीवास्तव ? " मिसेस तुलींना राग आला , " तिला विकत घेतल्या नंतर मिस्तर तुलींनी सर्वात अगोदर जे काम केलं ते म्हणजे तिला आमच्याच गावातली राहणारी दाखविली . तिचं नाव आम्ही कमलाबाई ठेवलं . नंतर तिचं राशनकार्डच काय पण मतदाताकार्ड देखील बनवून ठेवलं आहे . आणि आता तर तिचं आधारकार्ड आणि बँकेत खातं देखील आहे . "

- " पण मग स्त्री स्वातंत्र्याच काय ? " पत्यांचा खेळ निर्बाध सुरु होता आणि एक दुसऱ्याला खाली दाखविणं देखील  सुरु होतं .

- मिसेस श्रीवास्तव माघार घ्यायला तयार नव्हत्या . म्हणून  मिसेस सिन्हांना मधे बोलावं लागलं , " हे पाहा , वैयक्तिक वाद नको . मिसेस श्रीवास्तव तुमचीही मुलगी मुंबईला म्हणे कोणा मुलाबरोबर लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे . तुम्हाला चालतंय न ? हा तुमचा खाजगी प्रश्न झाला . आजच्या काळात सामाजिक प्रश्नांपेक्षा खाजगी प्रश्न महत्वाचे . आणि मूळ  प्रश्न स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा आहे . आणि महत्वाचं म्हणजे पुरुषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचाच आहे . स्त्रियांवर स्त्रियांकडून होणाऱ्या अत्याचाराचा नाही . महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या या शरीरावर आम्हाला आमचा अधिकार आणि ताबा हवा आहे . आमच्या मनाविरुद्ध आमच्या शरीराचा वापर करण्याचे क्रूर धाडस कोणत्याही पुरुषाला होऊ नये  यासाठी हा लढा आहे आणि इथं कायदा तोकडा ठरतोय म्हणून असली  निदर्शनं आहेत ."

- पत्यांचा खेळ रंगलेलाच होता . मिसेस शर्माच्या कामवाल्याबाईने गरमागरम भजी व  इतर खाद्यपदार्थांसकट कॉफी आणून ठेवली व मिसेस शर्मांना म्हणाली , " मेडम , मला थोडं लवकर जावं लागेल . तुम्हाला ठाऊकच आहे माझी सासू आजारी आहे . तिचं सर्व बिछान्यातच होतं . माझी सगळी कामं झालेली आहेत . मी निघू का आता ? " 

- " सासू तुझ्याजवळ राहते आणि तू तिचं सगळं करतेस ? मग तुझ्या सुनेच्या स्वाभिमानच आणि स्त्री स्वातंत्र्याच काय ? " मिसेस तुलींनी आश्चर्याने विचारले. - 

- " काय म्हणाला मेडम ? " कामवाल्या बाईला काहीच समजलं नाही . 

- " जाऊ दे तुला  नाही कळणार स्त्री स्वातंत्र्याचे आणि स्त्री स्वाभिमानाचे महत्व . " मिसेस तुली म्हणाल्या . 

- " मिसेस तुली , तुम्ही कशाला तिच्या मागे लागला आहात ? " आता मिसेस शर्मा मिसेस तुलींना म्हणाल्या व नंतर त्या कामवाल्या बाईला म्हणाल्या , " आम्ही आता खेळ आटोपतोच आहोत . असं कर सर्व आवरूनच मग तू जा . "

- " मिसेस शर्मा तुमच्या या कामवाल्या बाईला पण घेऊन चला ना बरोबार . मिडिया समोर , आणि माझ्या अवतीभोवती आपल्याच माणसांनी असलेलं बरं . शिवाय गर्दीही दिसायलाच हवी . " मिसेस सिन्हा म्हणाल्या . 

- " तिला नाही जमणार ते . ती आपल्या सासूची फार काळजी घेते . सासूसाठी अनेकदा ती माझं काम सोडायलाही  तयार असते . मग मीच तिला समजावते . आजकाल विश्वासाची माणसं मिळतात कुठं . ती अगदी घरच्यासाठी सांभाळते सर्व. " मिसेस शर्मा म्हणाल्या  .

- " आपल्या बरोबर आली असती तर खूप बरं झालं असतं . " मिसेस सिन्हा म्हणाल्या ,

" केंडलमार्च हा किती मोठा इव्हेंट आहे ! इट शुड बी ए ग्रेंड सक्सेस . माझा इंटरव्यू आणि नंतर मी चर्चेसाठी पण टीव्ही वर दिसणार आहे . हाऊ एक्साईटिंग ! "

- " पण मला असा प्रश्न पडला आहे की केंडलमार्चने काही साध्य  होणार आहे का ? आणि केंडलमार्चच का ? " मिसेस वर्माना मच प्रश्न पडला . 

- आता मिसेस सिन्हांना राग आला , " तुम्हाला ठाऊक आहे का की देशात काय परिस्थिती आहे ? "

- " तुम्हीच सांगा . इंटरव्ह्यू तुमचा . निदर्शनही तुम्हीच करणार . टीव्हीवरदेखील तुम्हीच दिसणार आहात . मग तुम्हालाच ठाऊक असणार सगळं . " मिसेस वर्मा हसत म्हणाल्या . 

- मिसेस सिन्हा जणू इंटरव्ह्यूची तयारी करूनच आल्या होत्या . 

- " तर मग ऐका . दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार . महाराष्ट्रातल्या  एका जिल्ह्यात तीन बहिणींचा बलात्कारानंतर खून . चालत्या गर्दीत बोरीवली रेल्वे स्टेशनवर भर दिवसा एका तरुणीवर अेसिड फेकण्यात आले . एका शिक्षकाने त्याच्याच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला . एका पित्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला व नंतर तिचा खून केला . सासूच्या संमतीने सासऱ्याने  व मोठ्या दीराने एका स्त्रीवर अनेक दिवस बलत्कार केला . चार गुंडांनी एका तरुणीला पळवून नेले . एका नवविवाहितेला तिच्या नवऱ्याने  व सासूने जाळून मारले . एका गावात सर्वांसमोर एका नेत्याने एका स्त्रीला विवस्त्र करून फिरविले . अनेक खासदार व आमदारांवर बलात्काराचा अरोप . काय आहे सर्व ? वर्तमान पत्र याच बातम्यांनी भरलेलं असतं . वाचायचा कंटाळा आलेला आहे."  

- " वर्तमान पत्रं वाचणं बंद करा . " मिसेस वर्मांनी थट्टेनं म्हटलं . 

- " मिसेस वर्मा हा थट्टेचा विषय आहे का ? " मिसेस सिन्हा चिडल्या . 

- " नाही . थट्टेचा विषय नसणारच . पुरुषांच्या बळजबरींना आला घालणं गरजेचं आहेच पण नुसतं ' केंडलमार्चच का ? " मिसेस शर्मा म्हणाल्या . 

- " मी म्हणते सगळे लोक केंडल मार्च काढत आहे ना … मग आपण का मागं राहावं ? "

मिसेस सिन्हा म्हणाल्या , " आजकाल फेशनच आहे केंडलमार्चची . सर्वात स्वस्त व सोपी निदर्शनं . तरुणांच्याही भारी आवडीची . "

- " अय्या ! खरचं की " मिसेस वर्मा  म्हणाल्या , " नवीन फेशनच म्हणा . काही वर्षांपूर्वी कुठं निघत होते असले केंडलमार्च ? " केंडलमार्चच्या प्रस्तावाने मिसेस वर्मा  रोमांचित झाल्या होत्या खऱ्या . 

- " पण काही म्हणा , रात्रीच्या वेळेस जळणारे प्रकाशमान केंडल्स खूप छान दिसतात . " मिसेस सिन्हा केंडलमार्चच्या कल्पनेत रमल्या , " आमचे हे म्हणतात , आजकाल मिडियावालेच सर्व काही ठरवितात आणि करवितात . ते गंमतीने म्हणतात देखील ' 

धर्मक्षेत्रे  , मिडियाक्षेत्रे . मिडियाच कर्ता  आणि मीडियाच करविता ' रोजरोज टीआरपीसाठी मिडियाला सर्व काही नवीन  गोळा करावं लागतं . टीव्हीच्या छोट्याशा परद्यावरच्या मैदानावरच सर्व निर्णय होतात आणि सर्व युद्ध देखील लढले जातात . जोवर दुसऱ्या युद्धाची नांदी होत नाही तोवर पाहिलं युध्द संपविण्यात येत नाही . "  

- " असं का . तुम्ही एक महत्वाची बातमी दिली . " मिसेस तुली म्हणाल्या , " आपण सर्वजणी टीव्हीवर दिसणार म्हणायचं . मिसेस सिन्हा तुम्ही पोरासारणाची वेळ कळवा . मी यांना सांगून कार्यक्रम रिकार्ड करवून घेईन . " 

- " त्यात काय एव्हढं . नक्की कळवेन . पण एक लक्षात ठेवायचं . मिस्तर सिन्हा जे नेहमी म्हणतात ते तुम्हा सगळ्यांना सांगते . प्रत्येक डे साजरा करणं , कोणताही इव्हेंट साजरा करणं , एखादे जन अन्दोइलन , एखादा मोर्चा व्यवस्थितपणे हाताळणे - जसं केंड ल मार्च वगैरे . हे सगळे बिझनेससाठी अं मलात आणलेले मार्केटिंग फंडे आहेत . या सर्व इव्हेंट मध्ये भावनिक रित्या सर्व सामान्यांना गुंत्वायाच्म असतं . पण आपण त्यात गुंतायाच्म नसतं . "

-" काय सांगता मिसेस सिन्हा तुम्ही . एक नवं ज्ञान नवं दर्शन तुम्ही दिलत आम्हा

सर्वाना . आता लोकांना भावनांमध्ये वाहताना बघायचं पण आपण स्वत:ला काठावरच ठेवायचं . खूप छान . आवडलं . पण मिसेस सिन्हा तुम्ही आज जिंकला आहात आणि तुम्ही टीव्हीवर पण दिसणार आहात . आणि केंडलमार्चच्या प्रकाशात चमकणार देखील 

आहात . मग केंडलमार्च संपल्यावर आम्हा सगळ्यांसाठी  आजचा डिनर तुमच्या कडूनच व्हायला हवा . " मिसेस वर्मा म्हणाल्या . 

"ओके . " मिसेस सिन्हा म्हणाल्या . त्या आज फार खुशीत होत्या .


Rate this content
Log in

Similar marathi story from Action