Shobha Wagle

Action

2  

Shobha Wagle

Action

जागो ग्राहक जागो

जागो ग्राहक जागो

2 mins
192


आज ग्राहक दिन म्हणजे २४ डिसेंबर. १९८६ साली २४ डिसेंबरला राष्ट्रपतींनी हा कायदा अमलात आणला. त्याची अमलंबजावणी व्हावी म्हणून बऱ्याच लोकांनी खूप कष्ट घेतले. या कायद्यानुसार ग्राहकाला फसवणे धोकादायक झालेय. जर ग्राहकाच्या लक्षात त्याची फसवणूक झाली हे ध्यानी आले तर ग्राहक तक्रार निवारण केंद्रात जाऊन आपली तक्रार दाखल करू शकतात. जर वाजवीपेक्षा जास्त किंमत आकारली, ट्रेंड मार्क चुकीचा, अथवा आऊटडेटेड असली तर त्या त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंद करायची.


आज जळी, स्थळी भष्टाचार मातलाय. जाहिरातीचा तर अतिरेक बघायलाच नको! वर्तमानपत्रे कमी म्हणून आज जाहिरातीचाच बाजारच मांडलाय सोशल मीडियावर. वेगवेगळे मॉल मूळ किंमतीपेक्षा चौपट किंमत लावतात आणि हे महाशय खरेदी करतात. त्यांना त्यांची प्रेस्टीज जपायची असते.

एकावर एक फ्री म्हटलं तर खरेदीला काही ताळतंत्र नसते. वस्तू खरेदी करताना घ्यायची ती काळजी आपण घेत नाही. ऑनलाईन वस्तू मागवतात. 

आपण फसलो हे कळूनसुध्दा काहीजण, कोण पडेल ह्या भानगडीत नकोच तो व्याप... असं म्हणून मूग गिळून बसतात.


अशिक्षित फसला तर गोष्ट वेगळी पण आज सुशिक्षितही जास्त फसला जातो आणि त्याच्या इज्जतीचा फालुदा होईल, आपल्या मित्र मैत्रिणीना कळेल, म्हणून तो गप्प राहतो. त्याचं दुसरं कारण त्याच्याकडे पैसे अमाप असतो. थोडे खाल्ले दुसऱ्याने तर फारसा फरक त्याला पडत नाही. दुसरी गोष्ट त्याने कमवलेला पैसा ही संपूर्ण त्याचा स्वतःच्या कष्टाचा नसतो तर त्यानेही भष्टाचाराने किंवा इकडचं तिकडं करून मिळवलेला! लाखात एक असेल त्याला कष्टांच्या पैशांची किंमत असेल व तो आपल्या कामातही ईमान राखत असेल.


जर आपण फसलो तर लगेच त्याची लेखी तक्रार नोंदवायची. आता कायदा कडक पाळला जातो. मीही मागे खूप वर्षापूर्वी फसले. मी तक्रारही नोंदवली पण माझी तक्रार पुढे सरकायला लाच खाणारे तेथे बसलेले. मग काय म्हणावे या दुर्दैवाला. पुढे कोर्टात... मग विचारायलाच नको. मी सामान्य माणूस कुठे खर्चणार पैसा? पण आता तशी वेळ नाही. आत तक्रारीची दखल घेतात आणि लगेच कारवाईही होते.


तर मग ग्राहका स्वतः सावधानी बाळग. खरेदी करतेवेळी नीट पारखून वस्तू घे आणि नजरेत फसवणूक आली तर लगेच ग्राहक तक्रार केंद्राला भेट दे.


जागो ग्राहक जागो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action