Shubhangi Tamhane

Inspirational Others

4.0  

Shubhangi Tamhane

Inspirational Others

जगाला हसवणारा तो मात्र दुःखी

जगाला हसवणारा तो मात्र दुःखी

6 mins
232


हेमंत ऋतू चे नुकतेच आगमन झाले होते ... नाम्या च एक छोटसं हाँटेल होते .... पुर्वी या हाँटेल मध्ये जेवणासाठी अनेकांच्या रांगा लागायच्या.... परंतु मागच्या काही महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणू मुळे सर्वत्र हाहाकार माजला होता.... लोकांचे कामावर या सगळ्या चा हळु हळु परिणाम होत होता... अनेक धंद्यात मंदी आली होती... लोक लाँकडाऊन च्या काळात खूप हलाखीचे दिवस काढत होते....कुणाला खायला मिळायचं तर कुणाला पुर्ण दिवस पाण्यावर जगावं लागत होते... त्या मुळे नाम्या ने दोन चार महिन्यानंतर आपले हाँटेल उघडले होते... मध्यंतरी लाँकडाऊन मुळे त्यांचे कामागार आपले सर्व सामान घेऊन गावकडे स्थाईक झाले होते...

 

नाम्या चे सुध्दा बर्या पैकी चांगलं चाल होत असच म्हणावं लागेल... आता त्याचा हाँटेल वर एकही गडी कामाला नव्हता त्यामुळे पदार्थ बनवणयापासून ते विकण्यापर्यत ची सगळी कामे एकट्याला खूप जड जात होतं पण आता नाईलाजा होता.... तशी गर्दी फारशी नसायची हाँटेल वर पण कोणीतरी सोबतीला असावं अस त्याला सतत वाटायच पण या कोरोना, लाँकडाऊन मुळे लोक जास्त घराबाहेर हि पडत नव्हती.... नाम्या ला वाटायचं कि आपण घरात बसून राहण्यापेक्षा काही तरी केलंच पाहिजे.... शेवटी पुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.... पण काही ना काही हालचाल केल्या मुळे थोडाफार मोबदला मिळत होता... त्यामुळे नाम्या मनातून खूप खूश होता..... असं चोवीस तास बिनकामाचे त्याला घरात बसणं खुपच कठीण झाले होते.....  आजचा दिवस ही असाच गेला.......

********************************************


असाच एक दिवशी नाम्या....... त्यांच्या मित्राच्या घरी जात होता.... नाम्या छान गाणं गुणगुणत रस्त्याच्या कडेने चालला होता तर त्याच्या सहज मनात आल की आपण त्या सर्कशीत काम करणाऱ्या विदुषकाची खूप जुनी ओळख होती त्यामुळे तिकडे एक फेरफटका मारावा आणि मग रंग्या (नाम्या चा दोस्त) कडे जावू... असा विचार करत ..... मोकळ पटांगण असलेल्या रानात एक दोन तंबू ठोकुन राहणार्‍या त्या विदुषक च्या घराकडे नाम्या ने झपाझप आपली पावले टाकतं निघाला...... तिथे जाताच त्याने आजूबाजूला असलेल्या सर्कशीतील वस्तू व कला सादर करणार्या सामाना कडे नजर टाकली तर सगळं शांत होतं.... आजुबाजुला कोणीही नव्हतं जस काही सगळे कलाकार आपापले सामान घेऊन गेले असावेत... अस दिसतं होत...... हळूहळू नाम्या मोकळ्या पटांगणात येऊन पोहोचला होता..... तिथे असणार्‍या झोपडी मध्ये डोकावून पाहत होता पण, तिथे कोणीच नव्हत... असच एक एक करत तो त्या विदुषका च्या झोपडी जवळ येऊन पोहोचला....

********************************************

विदूषक .......


दहा दिवस होत आले होते पण दिपक च्या पोटात एक ही अन्नाचा कण ही खाला नव्हता..... कस तरी पाणी पिऊन तो आणि त्याचे कुटुंब जीवन जगत होते...... दररोज दोन वेळे च्या जेवणासाठी काही तरी काम मिळेल म्हणून दारोदारी वणवण भटकत होता..... पण हाती मात्र काहीच लागत नसल्याने तो मात्र अगदी निराश होऊन जायचा.... कधी कधी तर त्याला हे अस जगणं खुपच असह्य व्हायचं... त्याच्या कुटुंबात फक्त ते तिघे जण राहत होते...... दिपक, त्यांची पत्नी पारू आणि दोन वर्षाचे ते गोडंस बाळ..... 

 

"हे बघ पारू , आपल्या कडे आता काहींच पर्याय नाही जगण्या साठी...... रोजच भुकेने मरण्यापेक्षा , आपण आता या क्षणी आपल्या तिघांचे आयुष्य संपवून टाकू म्हणजे आपली यातन कायमची सुटका होईल.... " दिपक आपल्या हाताकडे बघत म्हणाला.....

"अहो ! अस काय करतायसा धनी , आपण परयतन करून बघु व्हईल काय तर यवस्था ... तुम्ही नका चिंता, करू ...... " पारू तोडांला पदर धरून रडत रडत म्हणाली 😭

"अजून किती दिस वाट बघायची , इतके दिस झाले , सर्कशीतले खेळ बंद हायेता...... सगळे आपापल्या परीने गावी गेले.. ते तिथं जाऊन पोटापुरत कमवून खात असतील.... " दिपक म्हणाला....

"थोडे दिस वाट होईल सगळं नीट.... आपण दोघ मिळून काम करू.... " पारू म्हणाली......

"ते काय नाही आता जगून उपयोग नाय त्यापेक्षा हे विष पिऊन तिघं बी मरून जावू..... " दिपक, डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला....

अस म्हणतं त्या विषाची बाटली घेऊन पिऊ लागला, पारू त्याला खूप समजावत होती..... त्या दोन वर्षाच्या लेकराला कडवर घेऊन खूपच गयावया करत म्हणतं होती पण दीपक काही ऐकायला तयार नव्हता..... ते सगळं आता त्याच्या सगळं सहनशक्तीच्या पलिकडे होते.....ते दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडत होते .....

  

इतके रडत होते की त्याच्या आवाजाने दोन वर्षाचे लेकरू सुध्दा रडू लागले... इतका वेळ झोपडीबाहेर थांबून हे सगळं ऐकणारा तो क्षणाचा ही विलंब न करता आत मध्ये येतो....

************************

त्याला तिथे आलेला बघून दिपक ला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचार करत काही सा चेहर्यावरील भाव नार्मल करत त्याला नाम्याला तो आत येण्यास सांगतो.... (हो तो आपला नाम्याचं असतो)... नाम्या त्या दोघांना बघत...... दिपक च्या एक जोरात कानाखाली ठेवून देतो...... दिपक एका हाताने गाल चोळत त्याला विचारतो की त्याने त्याला अचानक का मारले ते......

 "नाम्या म्हणतो की, हे असं वागणं तुझ्या सारख्या हुशार कलाकारंना शोभत नाही ......"

"पण आता त्याचा काही उपयोग नाही ना ! सर्कसातील हे खेळ बघण्यासाठी आता या लाँकडाऊन मुळे कोणीही येत नाही? मग मी काय करायचं किती दिवस उपाशी राहू....

आमच्या सारख्या कलाकार च पोट हे दुसऱ्यांना हसवून आम्ही आमची पोट भरत होते.... आता ते ही बंद झाले त्यामुळे हा मार्ग निवडला..... मग मला कसलंच टेंशन नाही राहणार..... दोन वेळेचे भाकरी साठी वणवण भटकावे लागणार नाही.... " दिपक म्हणाला

"अस कायमच जीवन संपवुन काय झालं असतं! आज जे तू वागलास तेच उद्या तुझ्या सारख्या अनेक हुशार कलाकारांनी केलं असतं. देवाने तुला सगळ्या जगाला हसवण्याची कला तुला देणगी दिली आहे आणि तू त्यांचा आपमान करायला निघालास..... आज मला तुझा खुप राग येतोय.... मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती.".. नाम्या म्हणाला....


दिपक ला आता त्यांची चुक लक्षात आली होती.. त्यामुळे आता खुप रडत होता ... त्याला जाणीव झाली होती आपण खूप चुकीचं वागतोय.... आता त्याची त्याला लाज वाटतं होती कीं...पण आता त्याने मनातून ठरवलंच होत कीं प्रत्येक सकंटापासून दूर पळून जाणे हे योग्य नाही... आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी लढलं पाहिजे परिस्थिती कशीही असो....

    

माझ्या मुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला पण आता नाही मी पुन्हा एकदा नक्की प्रयत्न करेन..... 

अगदी कोणतेही काम करीन पण माझी कला सादर करून... दिपक ला पहिल्या पेक्षा खूप छान वाटतं असत... पारूला सुध्दा आनंद झाला होता...... 

" दिपक .... माझ्याकडे तुझ्या साठी एक काम आहे करशील का ? " नाम्या म्हणाला....

" हो नक्कीच करेन ! आता तू सांगून तर बघ " दीपक चेहर्‍यावर हसू आणतं म्हणाला.....

"माझे स्वतः चे एक हाँटेल आहे तुला तर माहिती आहे.. पण आता सध्या माझ्या मदतीला कोणी नाही.... त्यात तुम्हा कलाकारांची खेळ गावोगावी फिरून करता त्यामुळे तुला जेवण बनवता येत... तर त्यासाठी तु मला मदत करशील का? आता सगळे कामगार गावी गेले आहेत ..

तुला ही काम भेटलं आणि मला ही मदत होईल ....बघ तुला पटतंय का? " नाम्या म्हणाला ..

" हो मी हे काम नक्कीच करेन...... काय ग पारू... तुला चालेल का ? 😊 "दीपक अस म्हणतं पारू कडे एक कटाक्ष टाकला......

" व्हय जी...... करा तुम्ही मला काही प्रोब्लेम नाही 😊"दिपक कडे बघत गालात हसत म्हणाली ......

"मग उद्या सकाळ ये लवकर कामाला " अस म्हणतं नाम्या दीपक ची गळाभेट घेत तिथून जायला निघाली..nu..

      

तो मनातून खूप खूश झाला होता.... त्याला एका कुटुंबाला जीवनात प्रत्येक संकटात आपण कशाप्रकारे समोरे जायचं याबद्दल नाम्या नी एका कुटुंबाला चुकीचा निर्णय घेण्या पासून वाचवून पुण्याच काम केले होतं ..

   नाम्या आल्या पावली परत निघाला होता आपल्या मित्राला भेटण्यासाठी... जर तो दिपक च्या घराकडे गेला नसता खूप मोठा अनर्थ झाला असता... नाम्या ला हा विचार करूनच अगांवर सरकन काटा आला.....

*************************************

दिपक व त्यांची पत्नी पारू आणि दोन वर्षाचे ते गोंडस बाळाला बघुन आपण किती मोठं पाप करायला चाललो होतो यांची त्याला जाणीव झाली होती ..... त्याच्या मनात सहच एक विचार आला की आपण आपली विदुषकाची कला सादर करून इतरांना हसवण्याचे काम करतो... आपल्या याच गुणांन मुळे लोक आपल्या कडे आकर्षशित

होतात .... असंख्य लोक यांचे दुःख विसरण्यासाठी आपल्या कडे येतात.... आणि एवढा चांगला गुण.... दुसर्‍या ला हसवण्याचे काम आपल्याला दिले आहे ही एक प्रकारची मोठी देणगीच आहे .... दीपक मनोमन नाम्या चे खूप आभार मानतो.... 


       दुसऱ्या दिवसापासून अगदी जोमाने कामाला लागतो...... असचे बरीच कामे करून...हळु हळु दीपक एक कलावंत विदुषकाचे आयुष्य मार्गी लागते....  नाम्या च्या या सल्ला दिल्याने त्याच्या ही हाँटेल ची भरभराट होत असते ..... दिपक आपले काम करून लोकांना हसवणयाचे काम करत होता .....  अस होती एका विदुषकाची कथा.......


संदेश :- या कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की , आपल्या समोर कितीही मोठं संकट येऊ दया त्या पासुन लांब पळुन न जाता त्या संकटाचा खंबीर पणे उभे राहून सामना करा. प्रत्येक संकटात असताना आत्महत्या हा त्यापासून दूर जाणे हा पर्याय नाही. आयुष्य हे एकदाच मिळत त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि असेच प्रत्येकाच्या वाईट काळात एकमेकांना न घाबरता खंबीरपणे मदत करा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational