Kaustubh R

Inspirational

0  

Kaustubh R

Inspirational

जगू आनंदे

जगू आनंदे

2 mins
2.5K


जगू आनंदे

सगळ्याच गोष्टी बदलतात हे अगदी खरे आहे . माणसे ही .परिस्थीतीनुसार बदलतात . पण मला मात्र हे जमत नाही . कारण जर एखादी गोष्ट मनाने स्वीकारली तर परिस्थितीवर आपले वागणे बदलावे का ?काहीही प्रयत्न करून , परिस्थीती वर मात करून आपण परिस्थीतीला सुदधा नमवू शकतो . मनात असायला पाहिजे . अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात . पण जर मनातच नसेल तर मात्र काहीच शक्य नाही . त्यासाठी आतून ओढ असावी लागते . काही लोक कायम बुदधीने जगतात त्यांना मनाने जगता येत नाही . थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीत ते समरस होऊ शकत नाहीत . कोणत्याच आनंदाच्या उंच टोकाला ते पोहोचू शकत नाही .

म्हणूनच कधी कधी वेडयासारखे वागले तरी हरकत नाही . पण आनंद मनापासून मिळाला पाहिजे . कारण त्या आनंदाला कोणतीच सीमा नसते . कलावंत लोक जेव्हा देहभान हरपून एखादी कृती करतात तेव्हा ती कृती नक्कीच कौतुकास्पद ठरते . म्हणूनच मला वाटते कधी कधी नक्कीच एखाद्या गोष्टीत इतके बुडून जावे की सर्व जगाचे भान विसरुन जावे . भले त्यात दु:ख जरी मिळाले तरी हरकत नाही . त्यानंतर नक्कीच सुखाचा रस्ता असतोच . ते सुख खरे सुख .

कोणतीही गोष्ट मला वरवरची करायचे ठरवले तरी जमत नाही . खोटे खोटे वागण्यापेक्षा मला जी गोष्ट करायची ती अगदी मनापासूनच करावी असे नेहमी वाटते . मग मला आपोआपच त्या गोष्टीतून आनंद सुदधा खरा खराच मिळतो . आपण जसे आहोत तसेच राहावे . जेव्हा जे वाटेल ते प्रकट करून मोकळे व्हावे . असे वागत असताना आपल्याला कशाची भिती , दडपण वाटत नाही .

म्हणूनच कित्येकदा आपण जेंव्हा खोटे खोटे , वरवरचे किंवा एखादा मुखवटा घालून वावरत असतो तेंव्हा त्याचा त्रास आपल्यालाच जास्त होतो . आत' एक बाहेर एक वागणे म्हणजे दोन्ही डगरीवर पाय देऊन चालणे . मग निश्चितच आपल्याला काय वाटते ? किंवा आपल्याला काय करायचे आहे हेच आपण विसरतो .

त्यापेक्षा जसे आहोत तसेच राहावे . स्वत : लाही आनंदी ठेवावे त्याचबरोबर इतरांनाही आनंद , प्रेम देता येईल तेवढे देऊया .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational