Sandip Kamble

Others

2.8  

Sandip Kamble

Others

जळका वाडा

जळका वाडा

5 mins
264


भूत भूत आणि फक्त भूतच हो लहानपणापासून मनीषला भूताच्या कथा ऐकण्याची सवय होती.Serials पाहणे त्याला खुप आवडायच.े बघता बघता मनीष मोठा झाला ईजिंनिअरच्या दुस-या वर्षात तो होता पहीली सेमीस्टर झाल्यानतंर लगेच तो फीरायला मित्रांसोबत जाणार होता.तस ठिकाण नक्की नव्हत पण फीरायला जायच हे नक्की होत परीक्षा सपंल्यावर सागंली जिल्ह्यातील माळशेर गाव.गाव तस छान होत लोकसंख्या खुप कमी होती पण निसर्गाने नटलेल होत..मनीष मित्रांसोबत निघाला आई वडीलांच्या पाया पडून घरातून निघाला सोबत गणपतीची मुर्ती घेऊन निघाला मित्रांसोबत मुलगा पहील्यांदा ईतका लांब निघाला म्हणुन काळजी होतीच आईला.जाता जाता आईला टाटा करुन गेला..मनीष मित्रांसोबत एका Private गाडीने निघाला खर्च सर्वांनी केला होता.गाडी सकाळी दहा वाजता निघाल्यावर गावात पोहचायला चार पाच वाजले गावात गेल्यावर सर्वांना एक गोष्ट विचीत्र दीसली.सध्यांकाळी सहा वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपल्या घरी गेली होती..मनिषच्या मित्रांना काहीतरी खटकल तिथल्या एका सायकलवरुन येणा-या व्यक्तीला त्यांने विचारल काय ओ काका ही दुकान इतक्या लवकर बंद का???काका म्हणाले अरे आज 10 डीसेंबर आहे..हो मग काय होत मनीष म्हणालाकाका म्हाणाले अरे तुला माहीत नाही का???


मनीष म्हणाला नाही...काका म्हणाले पन्नास वर्षापुर्वी गावाच्या जवळ एक वाडा आहे त्या वाड्यात एक लग्न होत पण अचानक स्टोव्हचा स्फोट झाल्यांने त्या वाड्याला आग लागली आणि सर्वजण मेले..आजही त्या वाड्यातुन लग्नाचा आवाज तिथल्या जेवणाचा वास मेहंदीचा वास आजही येतो...रात्रीचा बैंडबाजा ऐकायला येतो...त्यामुळे आज सर्वजण लवकर झोपतात....मनीषला ही कथा खूप छान वाटली त्यामुळे त्याने ठरवल की आज ह्या वाड्यात जायच म्हणजे जायच..पण मनीषचे मित्र तयार नव्हते त्या वाड्यात जायला..आधी सर्व जण तेथे असलेल्या एका छोट्याशा हाँटेलमध्ये गेले दोन दीवसांसाठी रात्रीच जेवण करुन झाल्यावर मनीषन सर्वांना विचारले कोणी येणार का...सर्वांन कडून नकार आल्यावर मनीषने स्वतः एकट जायच ठरवल हातात Camera for video shooting and pic साठी त्याने घेतला.गणपतीची मुर्ती पाण्याची बाटली त्याने बॅगेत ठेवली आणि तो मित्रा़च्या नकळत तो निघाला..रात्रीचे साडे अकरा वाजले होते थंडी असल्यामुळे सर्व रातकीडे कुत्रे यांचे अवाज स्पष्ट येत होते हा वाडा तसा गावापासूध ल़ांब होता.पण गावक-यांना वाड्यातला बँडबाजाचा अवाज येयचा..


काही लोक तर जेवणाच्या सुगंधाने वाड्यात गेलेत पण परत नाही आले.. वाडा खुप जुणा असल्याने सर्व भिंती कुजलेल्या वाड्याभोवताली काहीच प्रकाश नव्हता फक्त काळोख होता मनीष रात्रीचे सव्वा बाराला तिथे पोहचला..एका हातात टाँर्च आणि दुस-या हातात कँमेरा होता तो वाड्याचा गेट खोलुन आत शिरला..सुकलेल्या पानावर पाय ठेवत तो गेला..त्यामुळे पानांचा अवाज झाला वाड्याच्या बाहेर दोन झोके एकमेकांत अडकुन पडले होते..अचानक थोडी थंडगार हवा आली आणि कसला तरी अवाज येऊ लागला ते झोके हालत होत सरळ नाही असे आडवे हालत होते..मनीषने त्या कँमेरात शुट केल आणि तो पुढे निघाला..दरवाजा अर्धा ऊघडा होता पण मनीषने दरवाजाला हात लावल्यावर तो दरवाजा वाड्याच्या आतल्या बाजुला पडला ईतक्यात मनीषच्या समोरुन एक काळ बकरु समोरुन गेल उजव्या बाजुला हे तेच बकरु होत जे मनीषने जेव्हा गावात आला तेव्हा ते आत जातांना पाहील होत कदाचीत ते तेच असाव..


मनीष आता वाड्याच्या आत आला होता तो डाव्या साईडला गेला हातातला कॅमेराने तो शुट करत होत.अचानक दोन तीन लहान मुलांच्या हसण्याचा अवाज आला होता.तो थोडा पुढे गेला ईतक्यात एक लहान मुल त्याच्या पाठीमागून गेले त्याने मागे पाहील तर कोणीच नव्हत..तिथे खुप मोठा झुबंर होता वरती रुम होते वर जायला शिड्या होत्या मनीष आता शिड्या चढुन वर जात होत होता अचानक त्याच्या समोरून ते बकरु आल..ते शिड्या ऊतरत होत त्याने विचार केला पण ते बकरू तिकडे गेल होत मग ईकडे कस आल मनीषला खुप भिती वाटली बकरु त्याच्याजवळ येणार तितक्यात ते गायब झाल हे त्याच्या कँमे-यात शुट झाल होत..हळु हळु तो वर चढत होता कॅमेरा चालु होता अचानक एका मुलीच्या हसणाच्या अवाजाणे त्याचा कँमेरा खाली पडता पडता वाचला काहीही झाल तरी भुताला पाहील्याशिवाय मी जाणार नाही अस मनीषने ठरवल होत..वरती गेल्यावर तिथे एक दोन रुम होते त्या रुम मध्ये लग्नाच्या सर्व वस्तु होत्या मनीष आत गेला..तो सर्व Record करत बँग खाली ठेवून तो जळालेल्या सर्व वस्तू पाहत होता होता..अचानक त्याला गरम गरम जिलेबीचा वास आला ते पाहण्यासाठी तो खिडकीत गेला त्याने बँटरी मारली बघतो तर काय तिथे खाली आचारी जिलेबी बनवत होते...हे अस मनीषने कधीच पाहील नाही आणि विशेष म्हणजे तेही बिना लाईटच..जेवण..हा एक धोक्याचा ईशारा होता मनीषला तिथुन लगेच निघायचे होत...


भूत पाहील्यावर तो घाबरला तर होता पण आता त्याला जायच होत रुमच्या बाहेर येताना तो बॅग आतच विसरला होता..तो रुमच्या बाहेर आल्यावर त्याने जे पाहीले ते भयानक होत ज्या शिड्यांनी तो वर आला त्या नव्हत्याच फक्त एका भितींवर ती रुम होती आता तो खाली कस जाणार हेच पाहत होता रुमचा बंद केलेला दरवाजा अचानक आपोआप खुलला..पिवळा शालु घातलेली एक मुलगी त्यातुन बाहेर आली..ती हळूहळू मनीषच्या जवळ येत होती तीने मनीषला खाली ढकलून दीले ईतक्या उचांवरुन पडल्यांने त्याचा एक पाय फ्रँक्चर झाला त्याला नीट ऊठता पण येत नव्हता त्याला पाणी पेयचे होते पण बॅग तर वर होती आता तो वर कसा जाणार गणपतीची मुर्तीही आत राहीली होती..समोरुन त्याच्या एका अर्ध शरीर जळालेली बाई आली ती दीसायला खुप भयानक होती हे पाहताच तो खुपच घाबरला देवाच नाव घेत तो बाहेर पडण्याच बघत होता पण अस नाही झाल..तो जितका पुढे जायचा तितकाच तो मागे येयचा आता हळूहळू घरातली जळालेली सर्वच माणसे त्याच्या समोर येत होती हे इतक भयानक होईल अस त्याला कधीच वाटल नाही.. तो हळूहळू सरकत सरकत बाहेर आला ती माणसे त्याच्या मागे गायब होऊन त्याच्या समोरुन येत होती आजुबाजुला कुठेच लाईटचा खांब नसताना ईतका प्रकाश आला कुठून..काही लहान मुल तेही जळालेली होती.खेळत होती..ह्या भुताकटीत आता आपला जीव जाईल असच त्याल वाटत होत..ते माणसे त्याच्यावर हल्ला करणार हे पाहताच त्याने डोळे मिटले..


जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते मनीषला जेव्हा जाग आली तो वाड्याच्य बाहेर पडला होता आपण कसे वाचलो हे त्याला माहीत नाही पण मृत्यूच्या दारात जाऊन आपण बाहेर आलो हा एक चमत्कार होता थोड्या वेळाने त्याचे मित्र त्याला शोधत शोधत त्याला नेयला आले आणि घरी घेऊन गेले...त्याच दिवशी तो आपल्या घरी पण गेला होता आई वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनापण आश्चर्य वाटल हा वाचला कसा..एक गोष्ट खरी ही होती की मनीषने भूत बघून मी घरी येणारच असा त्याने भुत पाहायला निघायच्या आधी त्याने दृढ निश्चय केला होता..त्याची Willpower इतकी होती की वाईट शक्ती त्याच काहीच वाकड करु शकल्या नाही...हाच निसर्गाचा नियम आहे..


Rate this content
Log in