Sandip Kamble

Horror

3.8  

Sandip Kamble

Horror

पोलीस चौकी

पोलीस चौकी

2 mins
494


.....साधारणता 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ही स्टोरी मला माझ्या काकांनी सांगितली होती. त्यावेळी माझे काका सीबीडि बेलापुर येथे पुलिस कॉर्टेर्स मधे राहात होतो. माझे काका पोलिस दलात असल्याने त्याना केव्हाहि वेळ प्रसंगी ड्यूटी वर जावे लागत असे. एक दिवशी रात्रि त्याना वायरलेस वर संदेश आला की एका ठिकानि मर्डर झाला आहे तर टाबोडतोब पंचनाम्या साठी जावे आणि सकाळ पर्यन्त बॉडी संभाळणे. ते सोबत एक पोलिस शिपाई ला घेऊन घटनास्तळी पोहोचले तर एक माणुस जंगलात मरुन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य ओरबडलेल्या खुणा होत्या. ते काम कोणा माणसाचे वाटत नवते. त्यावेळी लगेच गाड्या माणसे उपलब्ध होत नसत आणि मोबाईल पण नवते. रात्र खुप झाल्याने आणि जंगल असल्याने बॉडी च्या रक्षणाकरीता त्याना तिकडेच थांबणे भाग होते. त्या जंगला बद्दल त्यानी खुप दंतकथा ऐकल्या होत्या पण त्यांचा नाइलाज होता.

....रात्रि अचानक त्यांना वायरलेस वर सन्देश आला की त्यांच्या बरोबर असलेल्या पोलिसांच्या वडिलांची तब्बेत बिघडल्या मुळे त्याला घरी बोलावल होते. तत्पूर्वी त्यानी ठरवले की जंगलतील जवळील चेक पोस्ट मधे ती बॉडी ठेऊन ते तिथे बसणार होते. चेक पोस्ट वर रात्रि 8 नंतर कोणी थांबत नसे पण जंगलात थांबण्या ऐवजी तिथे थांबणे सुरक्षित असल्याने त्यांनी पंचनामा करून बॉडी तिथे नेली. तो दूसरा पोलिस काकांची स्कूटर घेऊन लवकरच येतो असे म्हणून निघुन गेला.

.....आता माझे काका आणि ती बॉडी असे दोघेच त्या भयानक जागेत उरले होते. माझ्या काकांचा रात्रि अचानक डोळा लागला होता तोच कसल्यातरि आवाजाने त्याना जाग आली. त्यांनी आजुबाजुल पाहिले तर त्याना अंधारात दोन लाल अंगारे सारखे चमकताना दिसले. त्यानी घबरून ब्याटरी पाडून पहिली आणि पाहतात तर काय तो मेलेला माणूस उठून बसला होता आणि काकांकडे भेदक अशा नजरेने पहात होता. ते पाहून काका खुप घाबरले तेव्हा तो दांत विचकाउंन म्हणाला की बरा सापडलास. तो आवाज त्याना जरा ओळखीचा वाटत होता. तेव्हा त्याना आठवले की काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या ऐनकाउंटर मधील एका आरोपिचा आवाज तसाच होता. त्यांनी बन्दुक चाचपडली पण ती मिळाली नाही. काका खुप घाबरले होते पण हे अस कस हेच त्याना कळत नवते. पण प्रसंगावधान दाखउन काही काळायच्या आत ते उठले आणि चौकिच्या बाहेर पडून त्यानी बाहेरून दाराला कड़ी घातली. तर दरवाज्यावर आतून धप धप असे आवाज येत राहिले. जिव मुठित धरून काका बाहेरच पहारा देत देवाचा धावा करीत राहिले.

.....सकाळी उजाड़ता उजड़ता तो पोलिस परत आला आणि तेव्हा त्याला काका बाहेर बेशुद्ध अवस्तेत दिसले. तोंडावर पाणी मारताच त्याना शुद्ध आली. तो पोलीस म्हणाला की त्याच्या वडिलांना काहीच झाले नवते कोणीतरी मस्ती केलि होती. नंतर त्यांनी दरवाजा उघडून पहिला तर तिथे ती बॉडी नवती. त्या दोघांना आचर्य वाटले. त्यानी कंट्रोल रूम ला तसे कळवले तर त्यांना अजुनच आचार्याचा धक्का बसला की तिथून असा सन्देश आला की अशा कुठल्याही प्रकारचा मर्डर चा सन्देश त्यांनी कुठेही प्रसारीत केला नवता....



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror