suraykant Khade

Tragedy

2  

suraykant Khade

Tragedy

काटे काळजात रूतले,पण.....!

काटे काळजात रूतले,पण.....!

4 mins
105


प्रेम सहसा सर्वांनाच होते.

काही आकर्षणातुन होते,

तर काहीच निर्मळ व न पाहता ही असत.

पण प्रेम करणं; म्हणण्यापेक्षा 'प्रेम होण' हे मनाला, मला महत्वाच वाटतं...

तसेच ते टिकवण व निभावणं पण,

पण प्रेम हे सहज होत नाही.

ते कोणत्या न कोणत्या आवडीतूनच होते

असच एकदा एकाला शब्दाच्या आवडीतून प्रेम निर्माण झाले.

त्यात मुलगा व मुलीगी पण दोन्ही एकमेकांच्या शब्दानुसार आवड दाखवुन, आवडीत नुसार सतत गुंतून राहीले.

काही दिवस हे तसेच चालत राहीले.

काही दिवस लोटल्या नंतर त्यांची जवळून भेट ठरली व भेटले.

दोघेही दिसायला सुंदर होते म्हणुन हळुहळु

त्यांची दोस्ती झाली व दोस्तीचे रूपांतर प्रेमात झाले.

दोघही एकमेकाच्या घट्ट प्रेमात पडले.

त्यांनी एक होण्याचे ठरवले.

म्हणजे लग्न करणे गरजे होत.

दोघेही सुशिक्षित होते, म्हणून मग त्या पालकांना विचारायच ठरवल.

आपले म्हणणे दोघांनीही समोर मांडले,

जाती तर प्रश्नच नव्हता.

मुल दोन्ही होतकरू होते, चांगले पण साधारण नौकरी करत होते.

याच दोघांवर घरची जबाब दारी ही होती.

काही दिवस हे विचारपुस चालुच राहीली.

कधी मुलीची आई तर कधी मुलाचा बाप थोडासा विरोध करायचे;

पण बाकीच्यांची हरकत नसल्याने त्यांना समजावुन सागून राजी करण्यात आले.

सर्व आंनदात होते.

भेटने बोलने चालू होते.

ईतक्या काय झाले की,

काही कारणाने मुलाची नौकरी गेली,

तो बेरोजगारी झाला.

मग मुलीच्या आई उठाव खाल्ला, की हा मुलगा तर नौकरीवर खाली झालाय,

मग आपल्या मुलीला कसा सांभाळेल ?

हा प्रश्न तिन पतीकडे मांडला व सरळच नकार दिला.

मुलगी तितकी ऐकन्यातच होती .

मुलाला दुसरी नौकरी मिळेना,

पण मुलीचे अतोनात मुलावर प्रेम होते .

ते भेटतच जायचे व दशा व्यक्त करायचे.

तितक्यातच मुलीच प्रोशन झाले तिला मोठ्या पोस्टवर काम मिळाले पगार (पैसा) भरपुर मिळू लागला.

त्यात याचे 'दैव' फुटल्या सारखेच झाले होते,

नौकरी मिळत नव्हती...

पण दोघ भेटत जायचे जरा थोड वेगळ्याच अनुभवातून,

वेगळ्याच विचारातून.....

आता मात्र घरच्यांचा विरोध वाढला, दोन्ही घरचे वेगळाच विचार करायला लागले.

नकार यायला लागला.

तक्रारी वाढत होत्या ,मुलाला घरचे समावु लागले, मुलीला आई अन आता बाबा ही विरोध करू लागले....

तितक्या तर मुलाचा जरा बाईक वरून पडल्याने जरा 'अँक्सिडेट' झाला .

ईकडे तिचे कामे वाढली वेळ भेटत नव्हती एकदाच ती उभ्याउभी भेटली मुलाने तिला, 'जास्त येत जाऊ नकोस !' अस सल्ला ही दिला....

बरचे दिवस लोटले.

मनात प्रेम आसूनही भेट होत नव्हती,

मन तळमळत होते, ती कामात व तो मनात व्यस्त होता.

वातावरण बदललेलं होतं.

पुढे तिची बदली दुर दुसऱ्या गावी झाली.

एकदा भेटली व ती रडत नजरेनं, भरलेल्या ह्रदयानं भेटुन गेली. आता मात्र तो पुर्ण खचला होता व ती गेल्यावर खोलीत रडत राहु लागला...

कुणाच्या समोर काहीच बोलत नसे.

काही दिवसाने त्याच्यावर परीणाम झाला.

काही केल्या बरा होई ना...

विचारच करत राहायचा बडबडायचा...

'बहुतेक पागल झाल्या सारखा'

तोवर ईकडे मात्र तिचे चांगले काम चालू असल्याने पोष्ट वाढत गेली, चांगली प्रगती होत गेली.

नतर तीच्याच कार्यालयातील एका मुलाने तीला पंसद केल व तिच्या आई बाबा कडे मागनी घातली,

ती गुपचुप आपल काम करत राहीली

तिला विचार पुस होऊ लागली तीचे कामातच मन होते.

काही वेळाने लग्नाचा फोर्स वाढला,

ती म्हणायची, 'मला आताच लग्न नाही करायच.'

खुप दिवस असच चालत राहीलं.

सगळे फोर्स कर होते,

म्हणून तिने, ' करा तुम्हाला काय करायच ते !'

अस सांगीतल.

अन पुन्हा कामात व्यस्त होत गेली.

दुसऱ्या मुलाची तिच समोरा समोर भेट होत होती ,

तीने त्याला पहिली सर्व हाकीकत सांगुन टाकली होती.(प्रेमाची)

तरी तो तय्यार झालेला होता.

मग भेट होत गेली आकर्षण वाढत होते.

आणखिन देव घेव चालू झाली.

साखपुडा ही पार पडला.

आता लग्न पक्क ठरलं.  

 पण एके दिवशी काय झाल की, 

तिचा एक मित्र काँलेजचा तिच्या कार्यालत कामा निमित्ताने आला आणि तिची भेट झाली.

तो त्याचाही (पहील्या मुलाचा) चांगलाच ओळखीचा होता.

.........;.....

त्याने तिला त्याती ही ईकड आल्या नंतरची 

सर्व हाकीकत सांगीतली.

तिला खुप वाईट वाटले.

ती रडली पण,

'काय करावे !' म्हणुन तिथुन घरी निघुन आली.

तेवड्यात आईने तिची विचारपुस केली.

ती जरा ओरडली, 'तुच केलस हे सर्व !'

आणि दार लावुन झोपली.

कोणाला काही कळलेच नाही काय होतय ते.

दुसऱ्या दिवशी ती कार्यालयात आली, ती त्या दुसऱ्या मुलाला भेटली व सर्व हाकीकत सांगीतली.

तो चांगल्या मनाचा होता, हळवा ही होता.

त्याला पण वाईट वाटले.

त्या दोघांनी ठवरले त्याला जाऊन भेटायचे व मदत करायची.

तसी त्यांनी तयारी केली....;

ते दोघे त्याला जाऊन भेटायला गेले पण तो दवाखान्यात अडमिट होता...

ते दोघे दवाखान्या त्यास जावुन भेटले

रूम बाहेर त्याची आई वडील व एक लहान बहीन बसलेली होती.

हिला पाहुन ते सारे रडू लागले....

परीस्थिती खाराब होती.

ती म्हणाली, 'तुम्ही रडू नका ! मी आले ना, आता सगळे ठिक होईल!'

ते दोघे त्याच्या जवळ गेले, तिने त्याला आवाज दिला, 'प्रदिप...! प्रदिप...!!'

त्याने मान वळवुन पाहीले.

त्याला बहुतेक आवाज ओळखल्या सारखा वाटू लागला. तो व्यकुळते नुसता पाहात राहीला.

त्या पाहुन तिचा ही कंठ दाटुन आला होता.

तो दुसराही तळमळत होता.

तिने त्याला पाणी पाजले, त्याने पाणी गटागटा पिले....;

ते दोघे नंतर डाँक्टरांना जाऊन भेटले.

ती डाँक्टरांना म्हणाली, ' काही करा ! कितीही पैसे लागू द्या, पण याला बर करा !'

आल्याले ते दोघे ही तेच म्हणत होते.

डाँ . म्हणाले, 'पैसे लागतील पण पैशानेच व दवाईन सगळेच बरे होतील अस नाही !'

बहुतेक त्यांना माहीत झालं असाव.

तिला समजले व म्हणाली,

'प्रयत्न तर करा !'

डाँ. हो म्हणाले. व उपचार सुरू झाले.

काही दिवसातच तो बरा झाला.

खाऊ, फिरू लागला...

नंतर काही दिवस ती व दुसरा आधुन मधुन भेटायला यायचे.

 एक दिवस ते दोघ पुन्हा त्याला भेटायला आले. (त्यांच लग्न झालेलं नव्हत. )

तो आता सर्व बरा झाला होता.

त्या दोघांना पाहुन तो खुश झाला.

त्याला बर वाटलं.

जवळ आल्यावर त्याने तिला विचारले, 'बरी आहेना तू !'

ती जरा बाजुला जाऊन रडू लागली,

दोघेही तिला समजावत होते,

पहिला म्हणाला, ' आरे ! आता मी बरा झालोय ! हेब बघ ! '

दुसरा पण, ' हो ! बघ ना ! तो बरा झालाय !'

 ती रडत राहीली बहुतेक तिला पुढच कळालं की कोडं पडलं, आता काय करवं? ते,

तितक्यात मुलीची आई आली नी तिने सर्वांना एक मेकाची महिती सांगीलती.... (ओळख पटवुन दिली)


--काटेच असतात 'ते',

 पायात काय,

 अन काळजात ते...

 नेहमीच रूततात ते...!

 सदा विचार करू चालावे,

 प्रेमात प्रेमानं प्रेमळ वागावे...!!

 

 -ईथे मी थांबतो ! 🙏❤🙏


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy