गोविंद ठोंबरे

Tragedy Inspirational

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy Inspirational

कळ

कळ

1 min
514


कळा गर्भाच्या पोटाच्या

कळा बाईच्या जन्माच्या

तिच्या बाईपणामागे

कळा तापत्या मातीच्या...१


कळा खळाळत जाई

लाल पाण्यात मोरीच्या

कळा दिसत नाहीत

भल्या घरी माणसाच्या...२


कळ तापता भाजता

चव चुल्ह्यावर येई

तिच्या हाताच्या फोडाला

कळ सांगायची नाही...३


कळ शेतात मातीत

जाते शिणून भागून

कळ काढाया जलम

घेते बाईच जाणून...४


कळ बाईच्या वाट्याला

भिंत उलतावी तशी

तिनं हसून घोटावं

जणू इवलं पोटूशी...५


तिच्या चांदव्यात सारा

सारा प्रपंच नाहतो

कळ सोसाया माणूस

माय माऊली मागतो...६


कळा भोगाव्या साहाव्या

कळा ठिगळ गाठीच्या

कळा चिंधी पोलक्यात

कळा जलम वारीच्या...७


विठू पेरतो सुगीचे

रासणीला दंग होई

माय अंकुराची होता

कळ गाभाऱ्यात जाई...८


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy