प्रणिता प्रणिता

Others

2  

प्रणिता प्रणिता

Others

कन्यादान : एक श्रेष्ठ दान....

कन्यादान : एक श्रेष्ठ दान....

1 min
76


कन्यादान हा हिंदू लग्नातील सर्वात मोठा विधी मानला जातो....आपल्याकडे लग्नामध्ये अनेक विधी असतात...

पण सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध विधी

आहे, तो म्हणजे कन्यादान... आई वडील

आणि मुलीच्या नात्याला अधिक महत्त्व देणारा हा विधी...या दोघांमधील नात अधिक घट्ट करतो....


घरात मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मी जन्माला आली....आणि लक्ष्मी जन्माला आली की, सर्वानाच आनंद होतो....पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हंटल जात.... मुलीच्या जन्मापासून किंवा लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपले जाते...वडील मुळीच नातही खूप खास असत....मुलीचे लग्न करताना अनेक विधी केले जातात...पण त्यात वडील मुळीच नात अधिक घट्ट करणारा विधी म्हणजे कन्यादान...पुण्यावचानाच्या विधीपासून सुरू झालेला विवाह सोहळाकन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो....


हिंदू धर्मातील लग्नसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे...

लग्नातील सर्वात महत्वपूर्ण संस्करापैकी

हा एक संस्कार मनाला जातो...कन्यादान

अर्थात दुसऱ्या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे असा अर्थ सहसा मानला जातो...पण कन्यादनाचा हा अर्थ नाही ...हिंदू लग्नामध्ये कन्यादान अत्यंत महत्त्वाचा आहे. यात मुलीचे वडील केवळ आपली मुलगी दन करत नाहीत,तर अग्निला साक्षी ठेवून आपल्या मुलीचे गोत्र दान करतात...यानंतर मुलगी आपल्या माहेरचे वडिलांचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या वंशाचे गोत्र धारण करते...म्हणून कन्यादानाला महत्व आहे...याशिवाय कन्यादान हे मोठे पुण्या समजण्यात येते....मंत्र चालू असताना मुलांकडून मुलीला कायम सुखात ठेवण्याचे वचन मागून घेतात आणि मुलीला सुरक्षित ठेवण्याचेही वाचन घेतात....


Rate this content
Log in