Dipali Gadekar-Agarkar

Others

3  

Dipali Gadekar-Agarkar

Others

माझं माहेर

माझं माहेर

1 min
374


' माझं माहेर' वाशिम जिल्ह्यातील कारंजा ( लाड )हे आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कारंजा या गावाला. जैनांची काशी म्हणूनही संबोधल्या जाते.' माहेर' हा शब्द कानावर जरी पडला तरी माहेरच्या बालपणीच्या आठवणी चा झरा ओसंडून वाहायला लागतो. येथे जास्तीत जास्त जैन लोकं वास्तव्याला असल्यामुळे आणि जैनांचे भव्य काच मंदिर, समवशरण, नंदीश्वर द्वीप, तसेच शिखर्जी च्या पहाडाची प्रतिकृतीच साक्षात दर्शन घडत असल्यामुळे गावाला जैन तीर्थाचे स्वरूप आले आहे आणि म्हणूनच त्याला जैनांची काशी असे म्हणतात.............

          हजारो जैन साधु संतांचे चरण स्पर्श झालेली पावन भूमी म्हणजे कारंजा ( लाड ) तसेच येथील नृसिंह सरस्वती ( दत्त्त) प्रसिद्ध गुरुु मंदिर हे ब्राह्मण बांधवाचे दैवत आहे. नृसिंह सरस्वतीी चा जन्मही येथे झालेला आहे. म्हणून हल्ली ह्या गावाला कारंजा दत्त ह्या नावानेही ओळखतात............... तसेच येथील ऋषी तलाव ही खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी  या तलावावर सात ऋषी स्नान करायचे. म्हणून त्याला सप्तऋषि तलाव म्हणतात. याा तलावातील कमळांच्या फुलांचे सुंदर दृश्य मनाला मोहून टाकतं. तसेच माझ्या आईच्या मागील भिंतीला लागून गुंडेचा वाडा  आहे . तेथेेेेेेेेेेेेेे गजानन महाराजांचं आगमन झालं होतं. त्याचा उल्लेख गजानन पारायण यामध्ये झाला आहे.

" करंज्या पुरी चा असे विप्र , उदरी तयाच्या असे हो कि दुःख दुःखातूनी पहा मुक्त झाला, नमस्कार माझा या गजानन महाराजांना"

 असं गजानन महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेलं माझं माहेर. असं हे धार्मिक तेच शालू पांघरलेल माझं माहेर........................


Rate this content
Log in