Dipali Gadekar-Agarkar

Others

2.8  

Dipali Gadekar-Agarkar

Others

सरप्राईज

सरप्राईज

2 mins
318


आज सकाळपासूनच अनघा जरा नाराजच होती. कारणही तसंच होतं. आज " महिला दिन" असून घरातील कोणीच तिला " महिला दिनाच्या " साध्या शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. नवरा गरम गरम जेवून ऑफिसला निघून गेला. मुलं नाश्ता करून आपला डबा सोबत घेऊन कॉलेजला निघून गेलीत. सासू सासरे ही जेवण आटपून आपल्या कामात व्यस्त झाले. आपले सर्व काम आटपून अनघाने ही नाराजीनेच आपलं ताट वाढलं. जेवण झाल्यावर सर्व आवरा सावर करून तीही थोडी बेडवर जाऊन पहुडली एरवी कामाच्या थकव्यामुळे दुपारी बेडवर पडल्या -पडल्या तिला झोप लागायची. परंतु आज काही केल्या तिला झोप येत नव्हती. पडल्या पडल्या लग्नापूर्वीच्या सुखद आठवणी तिच्या मनाला स्पर्शून गेल्या. दरवर्षी" महिला दिनाला " तिचे वडील ती आणि तिचे भावंड आईला उठल्याउठल्या " महिला दिनाच्या " शुभेच्छा द्यायचे. सोबतच काहीतरी गिफ्ट देऊन आईचा सन्मान करायचे... एवढाच सासूबाईंचा आवाज तिच्या कानावर पडला.... अनघा अनघ आणि पटकन ती विचारांच्या गर्दीतून बाहेर पडली...... आले आले आई...... सासुबाई म्हणाल्या अगं! अनोखा आत्ताच मला माझी मैत्रीण सुधा चा फोन आला होता. तिच्याकडे तिच्या नातवाच्या बारशाचा सोहळा आहे. तिने आपल्याला आमंत्रित केलं आहे. चल... लवकर तयारी कर आणि चांगली भरजरी साडी घाल ग! खरंतर अनघाची जायची अजिबात इच्छा नव्हती परंतु सासूबाईंच्या शब्दाला मान देण्याकरिता ती चटकन तयार झाली. आणि दोघीही निघाल्या. बाहेरून हॉलची झगमगाट बघून कार्यक्रम साधारण मोठाच असल्याचं जाणवत होतं...... दोघींनीही हॉलच्या आत मध्ये प्रवेश केला आणि काय आश्चर्य.. हॉल च्या आत मध्ये शिरताच अनघाच्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला. क्षणभर काय घडत आहे हे तिला कळलंच नाही. बघते तर काय?...... अनघाचा नवरा, सासरे, मुलं आणि सर्व जिवाभावाच्या मैत्रिणी तसेच जवळचे थोडे नातलग सर्वजण तिथे उपस्थित होते . सर्वांनी एका स्वरात तिच्यावर " महिला दिनाच्या " शुभेच्छांचा वर्षाव केला...... अग!आई तुला" महिला दिनाचं " स' सरप्राईज ' सुखद धक्का देण्याचा. प्लॅनिंग आजीचा होतं बरं का...... मुलांनी अनघाला सांगताच अनघाने सासूबाईंना घट्ट मिठी मारली आणि दोघीही आनंद अश्रूच्या सरित अश्रूच्या सरीत चिंब भिजल्या.


Rate this content
Log in